आर्वी वनपरिक्षेत्रात रानकुत्र्याचा कळप
वर्धा : आर्वी वनपरीक्षेत्र भागात भ्रमंती करतांना वर्धेतील वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकारे आणि पक्षी निरीक्षण प्रतिक पाल यांना तलावावर आपली तहान भागविण्याकरिता आलेला रानकुत्र्यांचा कळप दिसला. जवळच असलेल्या मंदिरात भाविक पूजा पाठ व आरती करण्यात दंग होते तर दुसरीकडे रानकुत्रांचा कळप तलावाकाठी दिसला. मानव आणि वन्यजीव यांच्या सहजीवनाचे हे उत्तम उदाहरण आहे. या मोठ्या संख्येत रान कुत्र्यांचा कळप दिसल्याने आर्वी येथील प्रादेशिक जंगलाचे महत्व अधोरेखित होत आहे.


