जिल्ह्यातील संगणक टायपिंग संस्थाचालकांना दिली मतदान जनजागृतीची शपथ
वर्धा : मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयात जिल्ह्यातील संगणक टायपिंग संस्थाचालकांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये जिल्ह्यातील एकूण 25 शासनमान्य संगणक टायपिंग इन्स्टिट्यूट संस्थाचालकांना मतदान जनजागृती विषयी शपथ देण्यात आली.
भय व भितीमुक्त वातावरणात तसेच कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करणे तसेच वंश, जात, धर्म, पंथ इत्यादीचा भेदभाव न करता आम्ही लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान करू अशा आशयाची शपथ सर्व संस्थाचालकांनी घेतली. यावेळी नोडल अधिकारी उत्तम खरात, विज्ञान पर्यवेक्षक उषा तळवेकर, टायपिंग इन्स्टिट्यूटचे शेख व संस्थाचालक उपस्थित होते.
यावेळी संगणक टायपिंग इन्स्टिट्यूट मधील
सर्व विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती करण्याकरिता सर्व संगणक संस्थाचालक यांना सूचना देण्यात आल्या. तसेच दि. 22 मार्च रोजी जिल्ह्यातील 36 टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शपथ दिली जाणार आहे.


