कारंजा येथे अपघातात एक ठार , तिघे जखमी
बाजार समितीचे सभापती राजेंद्र खवशी गंभीर जखमी
वर्धा : कारंजा घाडगे येथे नागपूर अमरावती महामार्गवर आज सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान दुचाकीला ओव्हरटेक करताना कारचा व दुचाकींचा अपघात घडला.अपघात इतका भयंकर होता की दुचाकीला काही अंतरावर घासत नेले. कारचा टायर फुटल्याने कार पलटी झाली.यात दुचाकीवरील राजू किंनकर व सभापती राजेंद्र खवशी गंभीर जखमी झाले. यात कार पलटी झाल्याने त्यातील महिला व पुरुष जखमी झाले आहेय.त्यांचे नाव कळू शकले नसले तरी त्यांना तात्काळ नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.दुचाकीवरील राजू किंनकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र खवशी यांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता राजू किंनकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सभापती राजेंद्र खवशी यांच्यावर उपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले आहे.या घटनेची नोंद वृत्तलीहेपर्यंत दाखल करण्यात आली नव्हती.राजू किंनकर यांच्या अपघाती निधनाने कारंजा तालुक्यात शोककळा पसरली.



