सोनेगाव रेती घाटातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
बोटीच्या साहाय्याने सुरू होते उत्खनन
वर्धा : देवळी तालुक्यात येणाऱ्या चना टाकळी येथे सोनेगाव बाई घाटामधून रात्री अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार टिप्पर, एक ट्रक, दोन ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलँड आणि इलेक्ट्रिक बोट जप्त करण्यात आली आहे. दोन कोटींपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तब्बल 21 जाणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी शुक्रवारी मध्यरात्रीत संयुक्त धाड टाकत ही कारवाई केली आहे.



