अमर काळे दोन एप्रिल रोजी भरणार उमेदवारी अर्ज
वर्ध्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात बैठक
सर्वच मित्र पक्षातील नेते बैठकीत उपस्थित
वर्धा : महाविकास आघाडीची वर्ध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठीची महत्वाची बैठक आज वर्ध्यात महात्मा लॉन येथे झाली. या बैठकीत सर्वच स्थानिक नेते सहभागी झाले आहे. अमर काळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ही पहिली बैठक असून या बैठकीत लोकांपर्यत पोहचण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, नितेश कराळे, अमर काळे, शिरीष गोडे, सुधीर कोठारी, सुरेश देशमुख , अतुल वंदिले, मनोज चांदूरकर, सुनील राऊत हे सहभागी झाले होते. लोकशाही वाचविण्यासाठी ही उमेदवारी असून सर्वांनी एकत्र येत माजबुतपणे लढा देण्याची गरज या बैठकीत सर्वांनी बोलून दाखविली आहे.



