गारांच्या तडाख्याने टरबुज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे नुकसान
शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात
वर्धा : अवकाळी पाउस, गारपीटने अल्लीपूर शिवारात पीक उद्ध्वस्त झालं. गारांच्या तडाख्याने टरबुज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अल्लीपूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर उगेमुगे यांनी तीन ते साडेतीन एकरमध्ये टरबुज पिकांची लागवड केली. जवळपास तीन लाख रुपये खर्च केला. पिकाचा थेट बांधावरून विक्रीचा सौदा झाला. सकाळी टरबुज तोडणार आणि व्यापारी घेऊन जाणार, चार पैसे पदरी पडतील, असं असताना मंगळवारी पहाटे गार झाली आणि पीक उध्दवस्त झालं. टरबुजाला अक्षरशः तडे गेले. दोन दिवसात रात्री गार झाली आणि त्यात पीक गार झालं.दीपक कलोडे यांच्या शेतातील डांगर मातीमोल झालं. अशीच स्थिती या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची आहे.



