Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » मुख्यमंत्री पद म्हणजे काही क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पद नव्हे – उद्धव ठाकरे
अपडेट

मुख्यमंत्री पद म्हणजे काही क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पद नव्हे – उद्धव ठाकरे

breakingvidarbhaBy breakingvidarbhaApril 23, 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अमित शहा यांच्या घरणेशाहीच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचे सडेतोड उत्तर

वर्धा : अमित शहा हे आमच्या घरणेशाहीवर बोलतात, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून आम्ही युती केली,अशी टीका ते करतात, पण अमित शहा यांनी समजून घ्यावे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला यांच्या आशीर्वादाची गरज नाही आहे. मुख्यमंत्री पद म्हणजे काही क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्षपद नाही, ते काही जनतेतून निवडूण येत नाही. म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
या हिंगणघाट येथील टाका मैदानावर झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, आपचे खासदार संजय सिंह, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि भारत आघाडीचे स्थानिक नेते मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते, त्या दिवशी चैत्य एकादशी होती. त्यांनी एक अभंग म्हटला, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी… कुणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही. पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याचं रूप आहे, म्हणत उद्धव ठाकरे यांनी समोर बसलेल्या जनतेला विठ्ठल म्हणून संबोधले. मोदीजी यात जनतेत विठ्ठल आहे. याच रूप बघा ! हा आनंदात आहे की नाही ते बघा. याचं सुख पाहिले बघा तुमचं सुख नंतर बघा… आजवर तुमच्या सुखासाठी आम्ही झटलो. आणि पदरामध्ये धोंडे पडले. गद्दारांना 50 खोके मिळाले, मी गेलो असतो तर मला किती मिळाले असते. पण मला ते खोके नको आहे, मला हे समोर बसलेली जनता पाहिजे आहे, हे माझे वैभव आहे. मोदीजी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी यांच्यावर तुमचा जीएसटी नाही लागू होत.

आजपर्यत मोदींनी वातावरण खराब केले. मोदींनी संपूर्ण भारत देश आणि जगामध्ये हिंदुत्व बदनाम केले आहे. ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना तुरुंगात टाकता, सम्पूर्ण देशात जुलूमशाही चालली आहे. संविधान बदलायला निघाले आहे. मित्रपक्ष विजयी करायला आपण आज वर्ध्यात आलो आहे. मला असे वाटायचे देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशात एका पक्षाचे सरकार पाहिजे आहे, पण यापुढे देशात एकाच पक्षाचे सरकार येऊ देऊ नका. हे घरणेशाहिवर बोलत आहेत. मोदीजी घरणेशाहिवर कुणी बोलायचं ज्याचं घराण आहे त्यांनी तरी बोलायला पाहिजे. अमित शहा आमच्या घरणेशाहिवर बोलतात, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून आम्ही युती केली, पण अमित शहा यांनी समजून घ्यावे, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला यांच्या आशीर्वादाची गरज नाही आहे. पण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्षपद नाही, ते काही जनतेतून निवडूण येत नाही. म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

अमर काळे यांचे भाषण संपवून उद्धव ठाकरे यांना बोलायला लावले त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, अरे मला अभिमान वाटला, अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात, अरे असच तर मर्द पाहिजे न आपल्याला, मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे,नांग्या टाकणारा नकोय, नांग्या ठेचणारा पाहिजे, आजपर्यत जे झालंय… असे म्हणत उद्धव ठाकरे यांना सर्वांनी बोलण्याचा केला आग्रह… माझ्यानंतर उमेदवार अमर काळे बोलतील आणि येथून कुणी हलणारा नाही असे घेतले बसलेल्या जनतेकडून वचन घेतले.

 

केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे, ही डिटेक्टरशिप आहे – शरद पवार

नरेंद्र मोदींवर टीका केल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे, ही डिटेक्टरशिप आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (सप) अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी हिंगणघाट येथील जाहीर सभेत केली.

पवार म्हणाले, हे सरकार डिटेक्टर असून संविधान बदलायचे आहे, केजरीवाल यांना तुरुंगात का टाकले, मोदींवर टीका केली म्हणून त्यांनी मोदींविरोधात आवाज उठवला आणि मोदी हे सहन करू शकत नाहीत म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. ही डिटेक्टरशिप संपवण्यासाठी आमचा लढा आहे, असे ते राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारसभेत  शरद पवार बोलताना म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांच्या कार्याचे कौतुक करताना पवार म्हणाले, केजरीवाल यांनी दिल्लीसाठी खूप चांगली कामे केली आहेत, दिल्लीतील नागरिकांनाही त्यांनी अनेक फायदे दिले आहेत, पण मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्याची किंमत मोजावी लागली आणि आता ते तुरुंगात आहेत.
हे सरकार असेच राहिले तर एक दिवस सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल, याची मी खात्री देतो. संविधानाने दिलेले अधिकार सुरक्षित नाहीत. राज्यघटनेने आपल्याला अधिकार आणि शासनाचा मार्ग दिला आहे, मात्र त्याला हात घालण्याची योजना आहे, असे पवार म्हणाले.
दिल्लीहून येथे आलेले खासदार संजय सिंग केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केल्याबद्दल सहा महिने तुरुंगात होते, संजय सिंग ज्यांना समाजाची जाण आहे आणि ते संसदेत चांगले बोलतात, त्यांना त्यांच्या चांगल्या कामाची किंमत मोजावी लागली. समाजासाठी तो धोरणांवर टीका करतो.
breakingvidarbha

Post Views: 214
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (739)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.