Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Tuesday, July 28
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » निसर्गानुभवसाठी बोर व्याघ्र प्रकल्प सज्ज
अपडेट

निसर्गानुभवसाठी बोर व्याघ्र प्रकल्प सज्ज

breakingvidarbhaBy breakingvidarbhaMay 21, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पाणस्थळावर वन्यजीव निरीक्षणासाठी मचाणी तयार

वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प निसर्गानुभव उपक्रमासाठी सज्ज झाला असून वन्यजीव निरीक्षणासाठी अभ्यासक व निसर्गप्रेमी नागरिकांकरिता विविध पाणस्थळांवर तयार करण्यात आलेल्या मचाणींची बांधणी पूर्ण झाली आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पात दिवसा आणि रात्री निसर्गानुभव घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना बुधवार, दि. २२ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात उपस्थित रहायचे आहे. या उपक्रमासाठी जुने व नवीन वनक्षेत्र तसेच हिंगणी, बांगडापूर व कवडस बफर या वनपरिक्षेत्रात नैसर्गिक पाणस्थळे तसेच कृत्रिम पाणवठ्यांजवळ ३५ मचाणी निर्माण करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी न केलेल्या निसर्गप्रेमी नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होता यावे यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत बोर येथील कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करता येणार आहे. सहभागी नागरिकांना बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या वाहनाने त्यांच्या मचाणापर्यंत पोचविण्यात येईल व दुसऱ्या दिवशी दि. २३ मे रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा त्यांना घेण्यासाठी वाहन पाठविले जाईल. या दरम्यान रात्रीच्या भोजनाची व्यवस्थाही मचाणीवर करण्यात येईल. नागरिकांनी सर्व नियम व अटींचे पालन करून सहभागी होण्याचे आवाहन बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी केले आहे.

निसर्गानुभवसाठी जाताना...

१. आधार कार्डची फोटो काॅपी (झेराॅक्स) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवावा.
२. ऑनलाईन फाॅर्म भरला असल्यास उत्तमच. फाॅर्म आपल्याकडे नसल्यास वेळेवरही भरून घेता येईल.
३. दुपारचे जेवण करून यावे. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था व्याघ्र प्रकल्पाद्वारे केली जाईल.
४. प्रत्येक मचाणीवर वनकर्मचारी राहणार असल्याने जास्तीचे खाद्यपदार्थ सोबत घेतल्यास सोयीचे होईल.
५. सुका मेवा, फळे किंवा ऊर्जा टिकवून ठेवणारे पदार्थ, पेयपदार्थ सोबत असू द्यावे.
६. प्रत्येक मचाणीवर थंड पाण्याची कॅन राहणार असली तरी पाण्याचा पुरेसा साठा स्वतःसोबतही असू द्यावा. पाणी जपून वापरावे.
७. कपडे निसर्गपूरक असावेत. पांढरे शुभ्र, भडक किंवा चमकदार कपडे नकोत. लांब बाह्यांच्या कपड्यांसोबतच रात्रीसाठी टी शर्ट, शाॅर्टस्, छोटी सतरंजी, चादर यासह दुपट्टा, टाॅवेल, कॅप, छत्री, शूज, गाॅगल, कॅमेरा, टाॅर्च, वही, पेन, आवश्यक औषधी, इत्यादी नेहमीच्या जंगलभ्रमंतीकरिता वापरत असलेल्या वस्तू न विसरता सोबत ठेवाव्यात.

प्रत्यक्ष प्रगणनेत सहभागी होताना…

१. पाणवठ्याजवळील आपल्या मचाणाकडे जाताना आणि येताना गाड्यांचे हाॅर्न वाजवू नयेत. गाडीतील रेडिओ, ट्रांजिस्टर बंद ठेवावा.
२. मचाणावर बसून असताना मोठ्याने बोलणे, गाणी म्हणणे, मोबाईलवर अथवा अन्य साधनांवर गाणी ऐकणे पूर्णतः टाळावे.
३. अत्तर अथवा कोणत्याही सुगंधी द्रव्याचा वापर शरीरावर अथवा कपड्यांवर करू नये.
४. प्लास्टीकच्या पिशव्या टाळाव्यात. चाॅकलेट अथवा बिस्किटांचे रॅपर, खाद्यपदार्थांची वेष्टणे, रिकामे डबे तसेच कोणत्याही प्रकारचे प्लास्टीक किंवा निरुपयोगी वस्तू जंगलात न फेकता आपल्या बॅगमध्येच ठेवाव्यात.
५. प्रगणनेत मांसाहार, धुम्रपान, मद्यपान पूर्णतः वर्ज्य आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.
६. कोणत्याही कारणासाठी जंगलात आग प्रज्वलित करण्यास मनाई आहे. उदबत्ती, कासवछाप अगरबत्ती देखिल लावू नये. ज्वलनशील पदार्थ तसेच शस्त्र सोबत नेण्यास सक्त मनाई आहे.
७. वन्यजीव (पशूपक्षी) पाणी पिण्यासाठी पाणवठ्याकडे येत असताना, पाणवठ्यावर पाणी पीत असताना शांतता बाळगावी.
८. पाणवठ्यावर येताना वन्यप्राणी सर्वाधिक सावधगिरी बाळगत असतात. त्यामुळे छायाचित्रण करावयाचे असल्यास प्राण्यांचे पाणी पिऊन झाल्यानंतरच करावे. मात्र, कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा वापर पूर्णपणे टाळावा.
९. सूर्य मावळल्यानंतर मचाणावरून खाली येण्याचे टाळावे. आवश्यक नैसर्गिक गरजा तत्पूर्वीच पार पाडाव्यात. मचाणावरून खाली येणे अत्यावश्यक असल्यास सहकाऱ्याला सोबत ठेवावे.
१०. रात्री वन्यजीव पाणवठ्यावर पाणी पीत असताना टाॅर्चचा वापर टाळावा. पाणवठ्यावरील नोंदी चंद्रप्रकाशात करणे अपेक्षित आहे. टाॅर्च आकस्मिक प्रसंगी वापरण्यासाठी सोबत बाळगावा.
११. प्रगणनेवरून परत येताना जंगलातील कोणतीही वस्तू अथवा वन्यजीव, वन्यजीवांचे अवशेष सोबत आणू नयेत, तसेच वनसंपदेला कोणतेही नुकसान पोचवू नये.
१२. पर्यावरणस्नेही आणि वन्यजीवप्रेमी म्हणून सर्वच सहभागी सदस्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे.
‘जंगलावरचा पहिला हक्क वन्यजीवांचा आहे, हे लक्षात असू द्यावे.’
— संजय इंगळे तिगावकर
सल्लागार समिती सदस्य, बोर व्याघ्र प्रकल्प
breakingvidarbha

Post Views: 143
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (998)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (980)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (873)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (831)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (777)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.