वर्धा : सेलू नजीकच्या चौकी येथील बृहस्पती मंदिराचे दर्शन करून अजनसरा येथे जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सची धडक वर्ध्याहून नागपूरला जाणाऱ्या एस टी बसला लागली. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहे. ही घटना केळझर येथील शहीद चौक येथे बुधवारी सकाळी घडली. ट्रॅव्हल्स ही नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथील प्रवासी घेऊन चौकी मार्गे आजनसरा येथे निघाली होती, केळझर मार्गे जात असलेल्या ट्रॅव्हल्सची केळझर येथे बसला धडक बसली.
कुंदन वनाडकर यांनी घेतलेले छायाचित्र
ट्रॅव्हल्स मधील 12 प्रवासी जखमी तर बसमधील चालकासह 4 प्रवासी जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमी मध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.जखमीना सेलू आणि सेवाग्राम येथील रुग्णालयात करण्यात आले दाखल , सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.