हिंगणघाट येथील स्वीमिंग पूल येथील घटना
हिंगणघाट : वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील मोहता स्वीमिंग पूल येथे 15 वर्षीय बालकाचा जलतरण तलावात पाण्यात बुडून मृत्यू झालाय.रेहान मेहनुद्दीन चौधरी असं मृत बालकाच नाव आहे.नवव्या वर्गात शिकणारा रेहान हा सायंकाळी आईसोबत स्विमिंग शिकायला हिंगणघाटच्या जलतरण तलाव येथे गेलाय. त्याचा स्विमिंगचा पहिलाच दिवस होता. या जलतरण तलावात असलेले पाणी हिरवे होते, त्यामुळे बुडालेल्या मुलाला शोधणे देखील कठीण झाले.



