वर्ध्यात वाळू घाटावर मोठी कारवाई
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये साती घाटावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रात्रीत अवैध उत्खनन करणाऱ्या रेती माफियावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. साती घाटामधून पोलीस आणि महसूलने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत 23 टिप्पर 2 पोकलंड, 3 बोट जप्त करण्यात आल्या. लिलाव नसलेल्या रेती घाटातून रेतीमाफीया राजरोसपणे अवैध रेतीचे उत्खनन करीत असल्याने ही कारवाई झाली.
हिंगणघाट तालुक्यातील साती येथील रेती घाटाचा लिलाव झाला नाही, पण येथे मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. महसूल प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मध्यरात्री धाड टाकली. येथे बोटीच्या सहाय्याने रेती उत्खनन सुरू होते. दोन पोकल्यांड देखील आढळून आले आहे. तर 23 टिप्पर येथे आढळून आले. येथे केवळ रेतीचा डेपोला परवानगी देण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी येथे कारवाईसाठी तत्परता दाखविली. रात्रीत धाड टाकून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध उत्खननावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रेती माफियांवर कारवाई करीत परवानगी देण्यात आलेल्या डेपोला बंद करण्यासाठी प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , पोलिस अधीक्षक नुरल हसन , पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण ,उपविभागीय अधिकारी शिल्पा सोना ले तहसीलदार सतीश मसाळ ,व महसूल टीम व पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सदर कारवाई करण्यात आली.
Post Views: 138


