राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
वर्धा: विज ग्राहकांना स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीला स्थगिती देण्याऐवजी प्रीपेड मीटरला कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हिंगणघाट येथे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी याबाबतचे निवेदन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.



