सेवाग्राम आश्रम येथे अभिनेता अमीर खान यांची भेट
पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला आले असता आश्रम परिसरात भेट देऊन घेतली माहिती
वर्धा : आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणारा बॉलिवूड अभिनेता अमीर खान याने सेवाग्राम आश्रमात भेट दिली. सेवाग्राम आश्रमात काही वेळ थांबून तेथील स्वयंसेवकांशी चर्चा केली. बापूच्या कुटीमधील विविध वस्तू आणि सेवाग्राम आश्रमाचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत असणारे स्थान याबाबत समजून घेण्याचा प्रयत्न आज अमीर खान याच्याकडून झाला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अमिरने आपण आधीपासूनच बापूंचे फॉलोअर आहोत, आणि आज सेवाग्राम येथे आल्यावर या स्थळाची ऊर्जा काय आहे हे कळले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.




