अमृतच्या योजना सर्वच दुर्बल घटकांसाठी..
वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेची बैठक दिनांक 22 जून 2024 रोजी वर्धा येथे संपन्न झाली. या अमृतच्या विविध योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉ. राम लोकरे यांनी केले आहे. सदर बैठकीस वर्धा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील माधवराव पंडित, नरेंद्र खरे, अटल पांडे, मकरंद उमळकर, प्रफुल्ल व्यास, अमोल गाढवकर हे उपस्थित होते. वर्धा येथील ब्राह्मण सभा अध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अमृतचे नागपूर विभागाचे समन्वयक देवदत्त पंडित यांनी बैठकीचा हेतू विशद केला. अमृतच्या मुख्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राम लोकरे यांनी अमृतच्या स्थापनेचा उद्देश सविस्तरपणे सांगितला.



