सावंगी येथे चाळीस आशांचा सन्मान
वर्धा : आशा सेविका गावाचा कणा आहेत. आशा सेविका या गावात केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. सरकारने त्यांच्या मानधनात देखील आता वाढ केली, त्याची अंमलबजावणी लवकरच जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार असल्याचे आश्वासन जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी आशा वर्कर यांना दिले. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित आशा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.



