आमदार पंकज भोयर नावाचं पोस्टर लावून केला निषेध
वर्धा ते सावंगी रस्त्यावर केले शिवसेनेच्या उबाठा गटाने आंदोलन
वर्धा : सावंगी कडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहे. या खड्डयात पावसाचे पाणी साचले जात आहे. दहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या आमदार पंकज भोयर यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही अवस्था झाली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना उबाठा गटाने आमदार पंकज भोयर यांचे फोटोचे आणि भाजप पक्षाच्या चिन्हाचे बॅनर लावून निषेध व्यक्त केला आहे. सावंगी हा मार्ग हॉस्पिटलकडे जाणारा असल्याने रुग्णांना या रस्त्यातून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आमदारांचे असे पोस्टर लावून आंदोलन केल्याने या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.



