हिंगणघाट शहरात आभारी रॅली आणि सभेचे आयोजन
वर्धा: वर्धा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे हे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच हिंगणघाट शहरात आले. त्यामुळे शहरातील कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सर्वप्रथम त्यांनी शहालंगडी देवस्थान येथे दर्शन करून उपजिल्हा रुग्णालयात लगत असलेल्या शासकीय जागेची वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाहणी केली. जागा पाहत असताना आरक्षित काही जागा आढळून आल्या असून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आभार रॅलीला सुरुवात करण्यात आली. आभार रॅलीत खासदार अमर काळे प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांनी दिलेल्या शुभेच्छा स्विकारून सर्वांचे आभार मानत होते. शहरातील प्रमुख मार्गाने ही आभार रॅली काढत समारोह रॅली महावीर भवन येथे पार पडली.



