Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » वृक्ष दिंडीतून विद्यार्थ्यांनी केला वृक्ष संवर्धनाचा जागर
इतर

वृक्ष दिंडीतून विद्यार्थ्यांनी केला वृक्ष संवर्धनाचा जागर

breakingvidarbhaBy breakingvidarbhaJuly 16, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गिरड येथे वृक्ष दिंडीचे आयोजन : हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

आशिष इझनकर
वर्धा : गिरड येथे संकल्प एक लाख वृक्ष उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड व बीज रोपण मोहीमेचा समारोप वृक्ष दिंडीच्या आयोजनातून सोमवार ता.१५ रोजी करण्यात आला. वृक्ष दिंडीच्या कार्यक्रमात गिरड येथील ६ शाळेतील हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. मगन संग्रहालय समिती व वनविभागाच्या वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले . या वृक्ष दिंडीत विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष पालखी काढून दिंडीत सहभागी केली. तर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाविषयी संदेश देणारे फलक सर्वांचे आकर्षण ठरले होते.

गुरुकुल विद्या निकेतन येथून वृक्ष दिंडी काढण्यात आली. वृक्ष दिंडीचे संचालन विकास विद्यालयाच्या बँड पथकाने केले. यावेळी पोलीस स्टेशन, बुध्द विहार , शिवाजी चौक, झेंडा चौक, ग्रामपंचायत कार्यालय येथून वृक्ष दिंडी काढून गावातील व्यापारी संकुलन रस्त्याने मगन संग्रहालयात दखल झाली यावेळी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
संकल्प एक लाख वृक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुल विद्या निकेतनच्या अध्यक्षा सुषमा दुबे होत्या .तर जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका मायाताई चाफले, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत साबळे, विकास विद्यालयाचे शिक्षक उमेश वाणी , क्रीडा शिक्षक राजू कांबळे, समाजिक कार्यकर्त्या रेखाताई डरे ,जेष्ठ समाजसेवक बबन दाभणे, मगन संग्रहालयाचे समन्वयक गजानन गारघाटे यांची उपस्थिती होती.

यावेळी वृक्ष पालखी आणि वृक्षाचे पूजन करून पर्यावरणीय जयघोष करण्यात आला. बीज रोपण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम एक जन चळवळ निर्माण होण्याच्या हेतूने मगन संग्रहालय समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते .बीज रोपण , वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश घराघरापर्यंत पोहचेल. आणि विद्यार्थ्यात देखील पर्यावरणीय विचार रुजेल.असे मत कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना जेष्ठ सामाजिक बबन दाबणे यांनी बोलतांना व्यक्त केले.
तर विद्यार्थ्यांत पर्यावरणीय विषय रुजविण्यासाठी वृक्ष दिंडी सारखे उपक्रम नित्याने राबविण्याची गरज असल्याचे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुषमा दुबे यांनी व्यक्त केले.
यावेळी मिशन १० हजार वृक्ष लागवड जण मोहिमेत कार्यरत श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विष्णू ब्राम्हणवाडे , मंथन भांदककर, अथर्व शिवणकर, कृष्णा गुंडे , उन्नती पाणबुडे, शिवानी गिरडे, मनोज भांदककर यांना वृक्ष भेट देवून पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विष्णू ब्राम्हणवाडे यांनी केले.तर शंकर भिसेकर यांनी आभार मानले. वृक्ष दिंडीच्या यशस्वितेकरिता मगन संग्रहालयाचे सुरेश शेलोरे, प्रमोद आस्कर, शीलास गणवीर , शंकर भिसेकर , पवन झाडे, सचिन उरकुडे, विकास विद्यालयाचे शिक्षक किशोर बारोवकर, शिक्षक श्री. धुळे, शिक्षक श्री. महाकाळे , सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कदीर, विठ्ठल पिंजरकर , नीलिमा भुजाडे,सुनिता वैद्य , नीलिमा दाते यांच्यासह वृक्ष प्रेमी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

वृक्ष दिंडीत सहा शाळेचे हजारो विद्यार्थी सहभागी :
गिरड येथील गुरुकुल विद्या निकेतन , विकास विद्यालय , शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील कन्या विद्यालय ,विकास विद्यालय कनिष्ठ विद्यालय , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी होत वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.

विद्यार्थ्यांनी आठ हजार सिड बॉलची केली निर्मिती : 
संकल्प १ लाख वृक्ष कार्यक्रमातर्गत शाळेत विद्यार्थ्यांची सिड बॉल कार्यशाळा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वयंमस्फूर्तीने आठ हजार सिड बॉलची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना मगन संग्रहालय समितीच्या वतीने तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले होते. सदर सिड बॉल टेकडीवर रोहन करण्यात येणार आहे.

३५ हजार रोपांचे करण्यात आले रोपण: 
संकल्प एक लाख वृक्ष अंतर्गत १० जुलै ते १५ जुलै २०२४ पर्यंत आर्वी, फरीदपुर, मोहगाव , तावी , शिवणफळ , उंदीरगाव , जोगीणगुंफा , पिपरी, पिंपळगाव या गावात वृक्ष लागवड आणि बीज रोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शाळा परिसर , मशानभूमी, सरकारी कार्यालय, मंदिर परिसर ,झुडपी जंगल तसेच गावातील रस्त्यांनी तब्बल ३५ हजार रोपांचे रोपण करण्यात आले.

breakingvidarbha

Post Views: 253
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा

December 31, 2024

 सावंगी येथे आजपासून दोन दिवस बधिरीकरणशास्त्रावर परिषद

August 9, 2024

यशवंतच्या 125 गुणवंत विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षकांनी केले प्रोत्साहित

July 28, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (739)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.