Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Tuesday, October 27
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » स्वातंत्र्यानंतरचा काळ विधायक नेतृत्वाचा – शरद पवार
अपडेट

स्वातंत्र्यानंतरचा काळ विधायक नेतृत्वाचा – शरद पवार

breakingvidarbhaBy breakingvidarbhaAugust 17, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जेष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर

वर्धा : गांधी-विनोबांचा वारसा लाभलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यानंतर बापूरावजी देशमुख, बाबासाहेब धांदे, संतोषराव गोडे, केशवराव झाडे अशी विधायक नेतृत्व करणारी पिढी तयार झाली. त्यांनी जिल्ह्यात राजकारणासोबत समाजकारण करीत विधायक कामाचा डोंगर उभा केला. याच विधायक कामातून शहर तसेच ग्रामीण भागाचा विकास झाला. यात शिक्षण क्षेत्रात झालेले काम महत्वाचे ठरले. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले. वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगता सामारोह कार्यक्रमात बोलत होते.यावेळी मंचावर सुरेश देशमुख यांच्या पत्नी स्वातीताई देशमुख यांच्यासह या सांगता समारोहाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. ना. नितीन गडकरी, माजी खा. दत्ताजी मेघे, माजी मंत्री अनिल देशमुख, वर्धेचे खासदार अमर काळे, माजी खा. रामदास तडस, आमदार प्रकाश गजभिऐ, आमदार सुभाष धोटे हे मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हेच विधायक कार्य व समाजकारणाचा वारसा सुरेश देशमुख यांनी समर्थपणे चालविला. शिक्षणाच्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने बापुरावजींनी उभ्या केलेल्या संस्थेचा विस्तार करण्याचे काम सुरेशभाऊंनी केले त्यातून शिक्षितांची पिढी बाहेर पडली हे सुरेशभाऊंचे योगदान आपणास लक्षात ठेवावे लागेल. सहकार क्षेत्रातील आशिया खंडातील एक मोठी बँक असलेल्या राज्य शिखर बँकेचे नेतृत्व बापूरावजींनी केले व नंतर सुरेश देशमुख ब्यानी सुद्धा केले. एकाच कुटुंबातील सदस्यांनी दोन वेळा नेतृत्व करण्याचे दुसरे उदाहरण राज्यात नाही. माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धेचे माजी आमदार तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, सुरेश देशमुख यांचा गौरव केला. यावेळी शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन व पुष्पहार घालून सुरेश व स्वातीताई देशमुख यांचा सत्कार शरद पवार व नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच लोकांनी जमा केलेल्या कृतज्ञता निधीचा चेक त्यांच्या सुपूर्द केला.
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्त्वाचे आहे, राष्ट्रकारणात समाजकारण आहे त्यात खऱ्या अर्थाने सेवाकारण आहे. राजनीती, लोकनीती, धर्मनिती हे राजकारणाचे वर्णन आहे, पण सध्याच्या प्रचलित वातावरणात सत्ताकारण पावर पॉलीटिक्स यालाच लोक राजकारण समजतात. पण यापुढे जात दलित, शोषित, पिडीत, शेतकरी, शेतमजूर, असहाय्य अनाथ यांचा विचार करणारे नेतृत्व आणि कार्यकर्ता ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाची समाजाची आवश्यकता आहे, त्याच मालिकेत सुरेशभाऊ देशमुख बापूरावजींचा वारसा घेऊन जगले काम करीत राहिले. नम्रता, शालिनता, सुसंस्कृतपणा, सहजता, सह्दयता हे सूरेशभाऊंच्या स्वभावाची विशेषता आहे असेही गडकरी म्हणाले.

तर सुरेश देशमुख यांनी राजकारणात कुणी शत्रु नाही, त्यांचे व्यक्तीमत्व हे अजातशत्रु आहे असे खा. अमर काळे म्हणाले. याप्रसंगी दत्ताजी मेघे, अनिल देशमुख यांनीही आपल्या मनोगतातून सुरेशभाऊ देशमुख यांच्या कार्य व स्वभाव गुणांचा गौरव करुन त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना सुरेशभाऊ म्हणाले की, आमचे वडील गेल्यानंतर आम्हाला सांभाळुन घेण्याचे काम पवार साहेबांनी केले तर संकट काळात गडकरी साहेबांनी मदत केली. पवार साहेबांनी व लोकांनी मला भरपूर काही दिले, माझ्या पत्नीनेही मला मोलाची साथ दिली.
‘लोकनेता’ हा गौरवांक सुध्दा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री, राजेंद्र शिंगणे यांनी केले तर भूमिका डाॅ. विलास देशमुख यांनी मांडली, संचलन डॉ. प्रमोद नारायणे यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा नेते समीर देशमुख यांनी केले.
या समारंभास आयोजन समिती सदस्य हर्षवर्धन देशमुख (अमरावती), गिरीश गांधी (नागपूर), सुभाष धोटे (राजुरा) संतोषराव कोळपे (अकोला), अरविंद पोरेड्डीवार (गडचिरोली), राजेंद्र जैन (गोंदिया), प्रवीण देशमुख (राळेगाव) तसेच शेखर शेंडे, राजू तिमांडे यांच्यासह सुरेशभाऊंच्या नातवंडासह कुटुंबातील शरद देशमुख, समीर देशमुख, डाॅ. संदीप देशमुख, स्मिताताई देशमुख, प्रियंकाताई देशमुख, शितलताई देशमुख, डॉ. अनिता देशमुख, साहिल देशमुख, डाॅ. सोनम देशमुख, प्रा. दिलीप देशमुख व वर्धा जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक, व्यापारी व शिक्षण क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. विजय बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
breakingvidarbha

Post Views: 273
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (1,073)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (1,040)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (946)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (900)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (835)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.