पाच दिव्यांग बांधव उपोषणावर
म्हाडा वसाहतीत घर देण्याची केली मागणी
वर्धा : हिंगणघाट शहरात बांधण्यात आलेल्या म्हाडा वसाहतीत दिव्यांग बांधवांना घर द्यावे या मागणीसाठी कामगार नेते उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी हिंगणघाट येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. येथील दिव्यांग बांधवांनी गेल्या काही महिन्यांपासून अनेक निवेदने दिली. आंदोलन देखील केले,पण शासन दखल घेत नसल्याने दिव्यांग बांधवांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.
प्रवीण कावळे, प्रफुल उके , आकाश भोपळे, मनोज कोटकेवार, अमरसिंह गंगवार या दिव्यांगानी उपोषण सुरू केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग उपोषणाला बसले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंगणघाट येथे बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या वसाहतीत घर देण्याची मागणी होत आहे. येथे बांधण्यात आलेली घरे गेली कित्येक वर्षापासून विकल्या गेली नाही. प्रतिसाद मिळत नसल्याने म्हाडा वसाहतीमधील घरे रिकामी आहे. हिंगणघाट तालुक्यात दिव्यांग मोठ्या संख्येत आहे. दिव्यांग बांधवांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन, शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के आरक्षण आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहे. या आंदोलनात
मोठ्या संख्येत पाठिंबा द्यायला हिंगणघाट तालुक्यातील दिव्यांग बांधव उपविभागीय कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळी जमले होते. विविध घोषणा देत लक्ष वेधण्यात आले.
Post Views: 185


