Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Monday, October 26
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » वर्धेत टायरच्या दुकानाला आग ;  तब्बल आठ तास अग्नितांड
अपडेट

वर्धेत टायरच्या दुकानाला आग ;  तब्बल आठ तास अग्नितांड

breakingvidarbhaBy breakingvidarbhaNovember 15, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जवळपास दीड कोटींचे नुकसान

वर्धा : वर्धा शहरातील पावडे चौक येथे असलेल्या एस मार्ट  मॉल आणि टायरच्या दुकानाला आग लागली आहे. एस मार्ट या मॉलच्या खाली तळघरात असलेल्या टायरच्या मोठ्या शो रूम  दुकानाला शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या  सुमारास अचानक आग लागली.  टायरच्या दुकानाला लागलेली आग सर्वत्र पसरली. टायर सतत जळत राहिले सोबतच एस मार्ट मध्ये असलेले तेलाचे पिंप देखील मोठ्या संख्येत जळाल्याने आग विझविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
 सकाळी 8 वाजता लागलेली आग सायंकाळी 4 वाजेपर्यंत धगधगत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी 60 ते 70 गाड्या पाण्याचा मारा केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली होती.
पावडे चौकात प्रवीण सेठीया यांचे एस मार्ट नावाची सुपर शॉपी आहे तर राजेश साहू यांचे त्याच इमारतीच्या तळघरात टायरचे होल सेल दुकान आहे. यासोबतच साहू यांची ऑईल आणि बॅटरीची एजन्सी आहे. या तळघरात टायरसोबतच आईल आणि बॅटर्‍याही ठेवून होत्या. दरम्यान, आज सकाळी 8 वाजता शॉर्टसर्किटमुळे साहू यांच्या दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. टायर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर निघत होता. दुकानाला लागूनच जनित्र असल्याने मोठी दुर्घटना घडू नये यासाठी वीज वितरण विभागाने परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता बंद केला होता. आगीचे रौद्ररुप बघता तेथे उपस्थित माजी खासदार रामदास तडस यांनी प्रशासनाला अलर्ट केले. निवडणूक प्रचाराचा काळ असतानाही घटनास्थळ गाठून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. वर्धा नगरपालिका, देवळी नगरपालिका, पुलगाव नगरपालिका, पुलगाव आगार आणि उत्तम गालवा येथील अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 9 वाजतापासून सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत अग्निशमनच्या बंबाने पाण्याचा मारा करीत ही आग आटोक्यात आणली. यासाठी जवळपास 60 ते 70 गाड्या यासोबतच राख वहन करणार्‍या कॅप्सूल ट्रकमध्येही पाणी आणून ही आग विझविण्यात आली.
तळघरात टायरच्या दुकानाला लागलेल्या आगीने वरच्या मजल्यावरील एस मार्ट सुपर शॉपीला कवेत घेतले. दुपारच्या सुमारास एस मार्टमध्ये ठेवून असलेल्या तेलाच्या जवळपास 100 पिंपाचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात शॉपीमधील सर्व किराणा व धान्य साहित्य जळून खाक झाले. या दुकानालगत असलेल्या स्टार बॅटरी नावाचे दुकान आहे. दुकान चालकाने सर्व साहित्य तत्काळ हलविले तर पुढील अनर्थ टाळण्यासाठी लगतच्या घर मालकांनी किमती साहित्य इतरत्र हलविले होते. आज दिवसभर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, सध्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना रिंगणात असलेल्या उमेदवारांनीही सोयीचा वेळ काढून घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. या अग्नितांडवात राजेश साहू यांचे दीड कोटींच्या जवळपास तर एस मार्टचे संचालक प्रवीण सेठीया यांचे 50 लाखांच्या घरात नुकसान झाले आहे.
breakingvidarbha

Post Views: 192
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (1,072)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (1,039)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (945)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (899)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (834)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.