महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणाच्या मुद्रकांची उपस्थिती
वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशनचे आयोजन
वर्धा : वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशनद्वारे वर्धा प्रिंट एक्सपो 2024 चे आयोजन सेवाग्राम स्थित चरखा घरात करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष जयवीर सिंह, महाराष्ट्र मुद्रण परिषदचे अध्यक्ष बालासाहेब आम्बेकर, रीसो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष रणजीत कदीरू, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे उपाध्यक्ष संजय घटवई, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे अध्यक्ष तुषारजी धोटे, स्क्रीन प्रिंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव जिग्नेश लापासिया हे उपस्थित होते.



