Author: breakingvidarbha

दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह एक हजार ७२१  विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून दीक्षा  वर्धा :  ज्या मार्गाने आपण जात आहात तो मार्ग आव्हानात्मक आहे, मात्र तेवढाच सन्मान देणाराही आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानार्जन करतानाच नवे शिकण्याची प्रबळ इच्छा कायम ठेवा, असे आवाहन भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या १५व्या दीक्षांत समारोहात विद्यार्थ्यांना केले. समारोहाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे होते. विद्यापीठ सभागृहात आयोजित दीक्षांत समारोहात वैद्यकीय, दंतविज्ञान, आयुर्वेद, भौतिकोपचार, परिचर्या, औषध निर्माणशास्त्र, परावैद्यकीय शाखा आणि अन्य विद्याशाखेतील एक…

Read More

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन काँग्रेस आक्रमक वर्धा : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, एम एस पी लागू करा, शेतकऱ्यांना जीएसटीतून सूट देण्याच्या मागणी सह विविध मागण्यांसाठी काँग्रेसने वर्ध्यात  शुक्रवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहे. https://youtu.be/OYe17AEFplM?si=fpakbxJ7qQ0ZIdcG महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांचे हाल आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी त्रस्त आहे. आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, बी बियाणे आणि खते यावरील जी एस टी मध्ये सूट द्यावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली आहे. वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार…

Read More

म्हसाळा ते दत्तपूर टी पॉईंट बायपास रोडवरील वाहतुकीच्या मार्गात बदल वर्धा : युथ फेस्टीवल अंतर्गत वर्धा येथे रेड रन स्पर्धा आयोजित केलेली असून ही स्पर्धा म्हसाळा ते दत्तपूर टी पाँईट या बायपास रोडवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी रहदारी सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) नुसार जिल्हा पोलीस अधिक्षकांनी म्हसाळा ते दत्तपूर टी पॉईंट बायपास पर्यंतच्या वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. दि. 19 जुलै 2024 रोजी म्हसाळा ते दत्तपूर टी पॉईंट बायपास पर्यंतची सर्व प्रकारची वाहतुक सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद करण्यात येत असून दत्तपूर टी पाँईट कडून सेवाग्रामकडे जाणारी वाहतुक…

Read More

 ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत केले वृक्षारोपण वर्धा: पब्लिक रिलेशन्स सोसाइटी ऑफ इंडिया, स्वतंत्रता सेनानी उत्तराधिकारी समिती, इंटेलेक्चुअल सोसाइटी ऑफ मीडिया प्रोमोटर्स, विधिज्ञ मंच इत्यादी संस्थांचे पदाधिकारी यांनी ‘एक पेड मा के  नाम’ या मोहिमेअंतर्गत बुधवार, 17 जुलै रोजी वर्धा शहरातील पिपरी मेघे ग्राम पंचायत अधिन सम्राट नगर परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी कडूनिंब, जांभूळ, केशिया, गुलमोहर व करंजी या प्रजातींची झाडे लावण्यात आली. वर्धेतील स्वातंत्र्य सैनानी उत्तराधिकारी समिती (सातारा) चे यशवंत भांडेकर यांनी त्यांच्या शेतातील नर्सरीमधील झाडे उपलब्ध करुन दिली.‌ या अभियानात पब्लिक रिलेशन्स सोसाइटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. राजेश लेहकपुरे, सचिव बी. एस. मिरगे, वर्धा जिल्हा…

Read More

गिरड येथे वृक्ष दिंडीचे आयोजन : हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग आशिष इझनकर वर्धा : गिरड येथे संकल्प एक लाख वृक्ष उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड व बीज रोपण मोहीमेचा समारोप वृक्ष दिंडीच्या आयोजनातून सोमवार ता.१५ रोजी करण्यात आला. वृक्ष दिंडीच्या कार्यक्रमात गिरड येथील ६ शाळेतील हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. मगन संग्रहालय समिती व वनविभागाच्या वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले . या वृक्ष दिंडीत विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष पालखी काढून दिंडीत सहभागी केली. तर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाविषयी संदेश देणारे फलक सर्वांचे आकर्षण ठरले होते. गुरुकुल विद्या निकेतन येथून वृक्ष दिंडी काढण्यात आली. वृक्ष दिंडीचे संचालन विकास विद्यालयाच्या बँड पथकाने केले.…

Read More

अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचा प्रयत्न वर्धा:  वर्ध्याच्या बॅचलर रोडवरील वंजारी चौक परिसरात मुंग पकोड्याच्या हातगाडीला रात्री आग लागल्याची घटना घडलीय. गॅस गळती झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच हातगाडीचालकाने बर्नर बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. वर्धा नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने आग विझविण्यासाठी प्रयत्न करून   आगीवर नियंत्रण नियंत्रण मिळविले. येथे मोठी गर्दी जमली होती, रामनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक नियंत्रित केलीय. 

Read More

सेलूच्या कोटंबा शिवारातील घटना वर्धा : सेलू तालुक्यातील कोटंबा येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर नागठाणा येथे वीज पडून बैलजोडी चा मृत्यू झाला आहे. कोटंबा येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू  झाला. मोरेश्वर देविदास वांदिले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी शिवारातील शेतात गेला असताना अंगावर वीज पडली, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.  शेतकऱ्याच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे. तरनागठाणा शिवारात वीज पडून बैलजोडी दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Read More

जपानमध्ये केलाय हसणे बंधनकारक करणारा कायदा! दिल्ली ब्युरो : जपान हा सर्वात आनंदी देश मानला जातो. या देशात यामागाता प्रांत आहे, यामागाता प्रांतात एक अनोखा कायदाच करण्यात आला आहे. ज्यामध्ये नागरिकांना दिवसातून एकदा हसणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामागाता युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन ने यावर अभ्यास केला. अभ्यासातून हसणे आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याचा निष्कर्ष निघाला. नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून दिवसातून एकदा हसणे बंधनकारक करण्यात आले आहे. हसण्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होते आणि आयुष्य देखील वाढते.

Read More

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सालोड हिरापूरला भेट देऊन पाहणी वर्धा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सालोड हिरापूर येथील ग्रामपंचायतला भेट देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी या समितीचे संयोजक ग्रामसेवक व सचिव अंगणवाडी सेविका राहतील. या समितीने गाव पातळीवर शिबिर आयोजित करून ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंद करावी तसेच ऑफलाइन अर्ज ॲप किंवा पोर्टलवर भरावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवार व आवश्यकतेनुसार गावपातळीवर…

Read More

जिल्ह्यात 21 हजार 912 महिलांनी केले ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज वर्धा : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. जिल्ह्यात दि.13 जुलै पर्यंत एकूण 21 हजार 912 महिलांनी अर्ज केले आहेत. 10 हजार 623 महिलांनी ऑनलाइन तर 11 हजार 289 महिलांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत. यामध्ये वर्धा तालुक्यातील 4 हजार 226, सेलू तालुक्यातील 2 हजार 570, देवळी तालुक्यातील 1 हजार 865, समुद्रपूर तालुक्यातील 2 हजार 21, हिंगणघाट तालुक्यातील 1 हजार 951, आर्वी तालुक्यातील 2 हजार 886, आष्टी तालुक्यातील…

Read More