Author: breakingvidarbha

दारूबंदी हटविण्याच्या मुद्द्याने वेधले लक्ष मतदार संघातील सर्वच मतदारांना समान न्याय देण्याचा प्रयत्न वर्धा : वर्ध्यात दारुबंदीकडे लक्ष वेधणाऱ्या उमेदवाराची चर्चा होते आहे ती उमेदवाराने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामधून… दारूबंदी रद्द करा असे सांगणारा जाहीरनामा एका उमेदवाराने जाहीर केला. तर एकाच लोकसभा क्षेत्रात जनतेला वेगळा न्याय कसा? याकडे देखील यातून लक्ष वेधले गेले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्रात दारू खुली आहे तर वर्ध्यातील चार विधानसभा क्षेत्रांत दारुबंद आहे. त्यामुळे न्यायाचे समान वाटप होत नसल्याचा दावा या उमेदवाराने केला आहे. वर्धा तसा दारूबंदी जिल्हा आहेय. दारूबंदी जिल्ह्यात दारू येईल तरी कुठून असे गांधीवादी नेहमीच म्हणत आले आहे.…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाभाचे दावे वर्धा: गुजरातसोबत वर्धा आणि अमरावतीचे विशेष नाते आहे. महात्मा गांधी गुजरातमध्ये जन्मले असले तरी त्यांची कर्मभूमी वर्धा आहे. आचार्य विनोबा भावे बराच काळ या भूमीत राहिले. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न बापूंनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची ही निवडणूक आहे. २०१४पूर्वी या देशात काही चांगले होऊ शकते हे कुणालाही शक्य वाटत नव्हते. सर्वत्र निराशा होती. गावांत रस्ते, पाणी, वीज येऊच शकत नाही यावर लोकांचा विश्वास बसला होता. गरीब, शेतकरी कुटुंबांना हेच आपले प्राक्तन वाटायचे. आपले दु:ख कुणी समजून घेणार नाही, असे महिलांना वाटायचे. पण, आम्ही दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. प्रत्येक…

Read More

केळी पिकाचे मोठे नुकसान वर्धा: सेलू तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळाच्या तळाख्यात परिसरात मोठे नुकसान झाले आहे. सेलूच्या जवळ असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात केळीचे उभे पीक खाली पडले आहे. झाडे  मोडल्याने मोठे नुकसान आहे. अनेक ठिकाणी गावातील घरांची पडझड झाली आहे. तर शेतातील गोठ्याचे देखील नुकसान झाले. शेडवरील उडाल्याने अनेकांचे मोठे नुकसान सेलू शहरात झाले. सेलू येथील अविनाश चांदणखेडे यांच्या दहा एकर शेतात केळी आहे. केळीचे पीक चांगले असताना अचानक झालेल्या वादळाने मोठे नुकसान केले आहे. बऱ्याच भागात गुरांचे देखील नुकसान झाले आहे. झाडे पडल्याने आणि इलेक्ट्रिक पोल खाली पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सेलू येथे संपूर्ण रात्र काळोखात गेली. खापरी…

Read More

वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानाची प्रक्रिया दि. 12 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे. वर्धा विधानसभा मतदार संघातील सिंदी मेघे येथील 85 वर्षावरील महिला मतदार नलीनी बाबाराव साळवे यांची प्रत्यक्ष गृहभेट घेवून टपाली मतदान प्रक्रियेची निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच नमुना 12 डी भरुन दिलेल्या 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना गृहभेटी द्वारे टपाली मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. 47-वर्धा विधानसभा मतदार संघात 85 वर्षावरील 261 मतदार व 34 दिव्यांग मतदार असे एकूण 295 मतदार गृहभेटीव्दारे मतदानास…

Read More

स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसचा उपक्रम वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरिता औद्योगिक भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भेटीत विद्यार्थ्यांना तांत्रिक माहितीसोबतच उत्पादन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या उपक्रमात नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआयटी) परिसरातील व्ही.आर. जामदार सीमेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स इंडस्ट्री येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील एमसीए, बीसीए व बीएस्सी द्वितीय सत्राच्या ५७ विद्यार्थ्यांनी भेट देऊन तेथील कार्यपद्धती समजून घेतली. यावेळी, सीमेन्समधील अनुभवी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत औद्योगिक क्षेत्रातील अनेक बाबी समजावून सांगितल्या. त्यांना सीमेन्स येथील विविध निर्मिती प्रक्रिया, पायाभूत सुविधा आणि…

Read More

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर प्रश्न वाढविले जयंत पाटील यांची टीका वर्धा:  या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच काम केलं नाही तर प्रश्न वाढवले.श्वासावर टॅक्स लावण्याची कला आली तर तेही करतील. एक योजना दाखवा ज्यामध्ये लोकांचं समाधान झालं आणि धनिकाचे कर भरल्या गेल्या नाही. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास भाजप अपयशी ठरलं. सर्व प्रकारची भीती दाखवली पण अनिल देशमुख बधले नाही, असे असं जयंत पाटील म्हणाले. आर्वी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार अमर काळे उपस्थित होते. तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले…

Read More

 गारांच्या तडाख्याने टरबुज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे नुकसान  शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात  वर्धा : अवकाळी पाउस, गारपीटने अल्लीपूर शिवारात पीक उद्ध्वस्त झालं. गारांच्या तडाख्याने टरबुज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  अल्लीपूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर उगेमुगे यांनी तीन ते साडेतीन एकरमध्ये टरबुज पिकांची लागवड केली. जवळपास तीन लाख रुपये खर्च केला. पिकाचा थेट बांधावरून विक्रीचा सौदा झाला. सकाळी टरबुज तोडणार आणि व्यापारी घेऊन जाणार, चार पैसे पदरी पडतील, असं असताना मंगळवारी पहाटे गार झाली आणि पीक उध्दवस्त झालं. टरबुजाला अक्षरशः तडे गेले. दोन दिवसात रात्री गार झाली आणि त्यात पीक…

Read More

सर्वाधिक वेळ खासदार कोण? वर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्रात 1952 मध्ये खासदार म्हणून निवडून आलेले काँगेस चे श्रीमन नारायण अग्रवाल होते. त्यानंतर 1957 मध्ये कमलनयन बजाज निवडून आले. सलग तीनवेळा कमलनयन बजाज हे निवडणूक जिंकले. 1957, 1962 आणि 1967 साली ते निवडूण आले आहे. कमलनयन बजाज हे गांधीवादी त्यामुळे वर्ध्यात जनतेने गांधी विचारांना साथ दिली होती. जगजीवनराव कदम आणि संतोषराव गोडे यांच्या नंतर 1980 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वसंत साठे हे लोकसभा निवडणूक जिंकले. 1980, 1984 आणि 1989 असे सलग तीन टर्म वसंत साठे हे खासदार राहिले आहे. 1991 मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्ट पार्टीचे रामचंद्र घंगारे वर्ध्यात निवडून आले. तर 1996…

Read More

महामानवाच्या जयंतीला उत्सव समितीची आगळीवेगळी भेट ऐतिहासिक ठेवा जतण करण्यावरही भर वर्धा : वर्ध्यात सिव्हिल लाईन परिसरात होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला उत्सव समितीच्या जुन्या तब्बल २२ जिल्हाध्यक्षांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्यांनी जयंती उत्सव समितीत १९८० च्या आधीपासून योगदान दिले आणि जिल्हाध्यक्ष राहिले अशा बावीस सहकाऱ्यांचा सन्मान करून एक आगळीवेगळी भेट यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर हे देणार आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास रचू शकत नाही या महमानवाच्या शिकवणीनुसार वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरी होणारी जयंती इतिहासाला उजळणी देणारी ठरावी यासाठी हा प्रयत्न करीत असल्याची माहिती आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी…

Read More

अमर काळे दोन एप्रिल रोजी भरणार उमेदवारी अर्ज वर्ध्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात बैठक सर्वच मित्र पक्षातील नेते बैठकीत उपस्थित वर्धा : महाविकास आघाडीची वर्ध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठीची महत्वाची बैठक आज वर्ध्यात महात्मा लॉन येथे झाली. या बैठकीत सर्वच स्थानिक नेते सहभागी झाले आहे. अमर काळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर  ही पहिली बैठक असून या बैठकीत लोकांपर्यत पोहचण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. बैठकीला  माजी मंत्री अनिल देशमुख, नितेश कराळे, अमर काळे, शिरीष गोडे, सुधीर कोठारी, सुरेश देशमुख , अतुल वंदिले, मनोज चांदूरकर, सुनील राऊत हे सहभागी झाले होते. लोकशाही वाचविण्यासाठी ही उमेदवारी असून सर्वांनी एकत्र येत…

Read More