वर्धा – वंचितांना सन्मानाने जगण्याचा हक्क देण्यासाठी राष्ट्रनिर्मात्यांनी विचारपूर्वक निर्धारानी विधान तयार केला. हे करतांना प्रस्थापितांचा परंपरेने आलेल्या विषम आर्थिक व्यवस्था जाणिवपूर्वक तोडून समतेच्या दिशेने नियोजन केले. राजकीय ,आर्थिक

आणि सामाजिक समतेतून देश बळकट होईल असे स्वप्न पाहिले,असे ऍड.अशोक पावडे यांनी सांगितले.भारतीय लोकशाही मोर्चा वर्धाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान पदयात्रेच्या दहाव्या टप्याच्या सुरवातीला नई तालीम परिसरात ते संबोधित करीत होते. सेवाग्राम येथून विविध दहा टप्प्यात ही संविधान यात्रा सर्वत्र पोहचली. गेल्या महिनाभरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात आली.
पुढे बोलताना पावडे म्हणाले, देशाच्या धर्मनिरपेक्ष, समाजवादी संरचनेसाठी देशाच्या प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंच्या महत्वाच्या योगदानाचा उल्लेख करून आज प्रस्थापितांपासूनच संविधान वाचण्याचे मोठेच आव्हान देशाच्या सर्वसामान्यासमोर उभे ठाकले आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने आपण लोकांपर्यंत संविधानाचे शब्द आणि अभिप्रेत असलेले भाव पोहचण्याचे काम करीत आहात. त्यामुळे संविधानविरोधी धोरणं आणि निर्णया बद्दल लोकांत जागृती होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी भारतीय लोकशाही मोर्चा वर्धा तर्फे प्रा. नूतन माळवी यांनी या आयोजनाची संकल्पना मांडली. सेवाग्राम ते आष्टी या दहाव्या पदयात्रेचे संयोजक अतुल शर्मा यांनी ” गलत मत कदम ऊठाओ सोच कर चलो” हे प्रेरणा गीत म्हटले. त्यां नंतर अॅड. अशोक पावडे यांनी ध्वज अतुल शर्मा यांना सोपवून यात्रेला सुरवात केली. या प्रसंगी पदयात्री चंद्रशेखर मडावी, कांचन पंधरे, किशोर वानखडे,ममता भारतकर,रीना जगताप,शीतल, नागोराव नेहारे, मिलींद नागपुरे,मनीषाताई, शुभांगीताई, शीतलताई यांच्यासह डॉ. प्रभाकर पुसदकर, डॉ. हाशम शेख, युवराज, प्रशांत नागोसे, मनोज ठाकरे, सुषमा शर्मा, जालंधरभाई, कि़शोर जगताप, विनेश काकडे, जगदीश,युगंधरा तसेच आनंदनिकेतनचे शिक्षक उपस्थित होते.

