वर्धा – नागपूर येथून खाजगी ट्रॅव्हल्सने वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव फाट्यावर गांजा आणणाऱ्या दोन आरोपींना समुद्रपूर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पोलिसांनी कारवाईत तीन किलो गांजा जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार नागपूर येथून ट्रॅव्हल्सने शेडगाव चौरस्ता येथे गांजा आणला जात असल्याची गुप्त माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली. समुद्रपूर पोलिसांनी सापळा रचून सदर घटनेवर नजर ठेवली.
गुन्हे शोध पथकाचे पो. हवालदार अरविंद येनुरकर यांना रविंद्र मोहिते व शोभा जाधव असे दोघेही संगणमताने नागपुर येथुन खाजगी ट्रॅव्हल्सने समुद्रपुर येथे राहणारा करण खुरपडे नावाच्या ईसमास गांजा अमली पदार्थ देण्याकरीता मौजा शेडगाव चौरस्ता येथे येणार आहे. अशा खबरेवरून त्यांचेवर एन.डी.पी.एस. ॲक्ट अन्वये कार्यवाही करण्यासाठी पथक तयार करण्यात आले. गांजा अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन शासकिय पंचासह यातील नमुद आरोपीतांवर मौजा शेडगाव चौरस्ता येथे सापळा रचुन एन.डी.पि.एस. रेड केली. आरोपी करण खुरपडे यास पोलीस आल्याची चाहुल लागताच त्याने पळ काढला. पोलिसांनी आरोपिकडून 3 किलो 70 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ किं.61,400, रूपये, एक ओप्पो कंपनीचा मोबाईल किं 10,000 रूपये, एक रेडमी कंपनीचा मोबाईल किं. 9,000 रूपये व नगदी 3,400 रू. असा एकूण 83,800 रू. चा माल जप्त केला आहे.


