Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
  • जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, April 16
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » ‘शेडनेट’ ठरले शेतकऱ्यांसाठी जाळे
कृषी

‘शेडनेट’ ठरले शेतकऱ्यांसाठी जाळे

चाचणीत अपयशी तरीही विदर्भात पॉलीहाऊसची अंमलबजावणी
breakingvidarbhaBy breakingvidarbhaNovember 30, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Agri Special # : वर्धा (विशेष प्रतिनिधी)– शेतकऱ्यांसाठी भरघोस उत्पन्नाचे साधन म्हणून पॉलिहाऊस आणि शेडनेटचा गाजावाजा करण्यात आला. लाखोंच्या सवलतीचे आमीष दाखविले गेले. चाचणीतच अपयशी ठरले असतानाही विदर्भात प्रयोग राबविण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना या तंत्रशुद्ध शेतीतून साधे उत्पादन खर्चही काढता आले नाही. लाखो रुपयांचे कर्ज थकल्याने शेतकरी अडचणीत सापडले. नेत्यांकडे दाद मागितली तरीही प्रश्न सुटला नाही. आता ३० नोव्हेंबरला या शेतकऱ्यांच्या गहाण मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

कृषी विभागाच्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमार्फत हायटेक शेतीकरण्यासाठी पॉलिहाऊस आणि शेडनेट उभारणी प्रकल्प राज्यात राबविण्यात आला. राज्यात तब्बल १,२०० शेतकरी या प्रकल्पाचे लाभधारक आहेत. विदर्भातील ३०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी विविध कृषी प्रयोगशाळा आणि शासकीय नर्सरीमध्ये चाचण्यादेखील घेण्यात आल्या. चाचण्या अपयशी ठरल्याचा अहवाल २०१४मध्ये तंत्रज्ञांनी दिला होता. याकडे दुर्लक्ष करीत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी प्रस्ताव दाखल केले. लाखो रुपयांचे कर्ज घेऊन उभारलेल्या या प्रकल्पात भाजीपाला व फुलशेती अपेक्षित फुललीच नाही. विदर्भातील विपरित वातावरण, स्ट्रक्चरची समस्या, उशिरा मिळणारी सबसिडी, चुकीचे विमा कवच, अतिवृष्टी, कर्जावरील अधिक व्याजदरामुळे शेतकऱ्यांना शेडनेट प्रकल्पातून लागवड खर्चही काढता आला नाही. वादळी पावसात अनेकांचे शेडनेट उडून गेले. प्रकल्प अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले. कर्ज वाढल्याने आता बँक खाते एनपीए झाले. त्यामुळे साधे पीक कर्जदेखील या शेतकऱ्यांना मिळाले नाही. मागील सात वर्षांपासून शेतकरी मंत्र्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. माजी कृषिमंत्री दादा भुसे आणि विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचीदेखील भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अनिल बोंडे, संदिपान भुमरे, समीर मेघे या नेत्यांनी दिलेली पत्रेही शेतकऱ्यांकडे पडून आहेत. मंत्रालयात बैठका झाल्या. पण, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. कर्जाचा तागादा वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जयपूर, गायमुख, मोर्चापूर, जाम, रसुलाबाद, घोराड, हिंगणी, बोर धरण, रेहकी, चारमंडळ येथील शेतकरी वाढत्या कर्जाने मेटाकुटीला आले आहेत. या प्रकल्पासाठीचे कर्जमाफ करावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

भूकंप, आगीसाठीच विम्याची सोय
पॉलिहाऊस आणि शेडनेटची उभारणी करताना नियमानुसार साहित्यांचा वापर करण्यात आला नाही. नैसर्गिक आपत्तीत विमा मिळणार नाही. केवळ भूकंप आणि आग या बाबींतच प्रकल्पाला विमा कवच मिळणार याविषयीची स्पष्टता शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. मुळात वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान हे अतिवृष्टी आणि वादळामुळे झाले आहे. त्यामुळे विम्याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला नाही. देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराने शेतांकडे पाठ फिरविली, असा आरोप घोराड येथील शेतकरी विठ्ठल वानोडे, रमेश उमाटे, अविनाश राऊत यांनी केला आहे.

breakingvidarbha

Post Views: 115
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी

January 4, 2025

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

December 25, 2024

दीड किलो मीटरच्या लोटांगणातून ओला दुष्काळाची आर्त हाक

August 9, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

By breakingvidarbhaMarch 13, 20250

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा :…

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!

January 14, 2025
Demo
Top Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (915)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (913)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (800)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (745)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (694)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.