रवी येनोरकर
हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील हनुमान वॉर्ड, विरभगतसिंग व गौतम वॉर्ड येथील युवकांसह महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य अमोल बोरकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवकांनी पक्ष प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक युवकांसह महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते होते. यावेळी जिल्हा निरीक्षक सुरेखाताई देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष पवन तिजारे, माजी नगरसेवक प्रलयभाऊ तेलंग, अमोल बोरकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष रोशन तेलंग, माजी सरपंच प्रशांत घवघवे, ओबीसी जिल्हाध्यक्ष हरीश काळे ,रोशन तेलंग,अमोल त्रिपाठी, सुशील घोडे, राजू मुडे आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पक्षाचा दुप्पटा घालून पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवकांचे स्वागत केले.
यावेळी कमलाकर हिंगे, नंदूभाऊ वाघमारे राजूभाऊ वाढई, तुकारामजी मोहिजे, महादेवराव तुमसरे, रामुजी महाकाळकर, अशोक ढोकपांडे, सौ.सुलोचना हिंगे, सौ.ललिता मोहिजे, शोभाबाई सेलूरलर,सौ.बेबीताई मोहिजे, राहुल बोरकर, रोशन बावणे, दर्शन बोरकर, राम देवतळे, वैभव बोरकर, अप्रीत रेवतकर, रज्जत झाडे, शुभम बावणे, रितिक घवघवें, सागर राऊत, राहुल घवघवें, योगेश बालखांडे, आकाश पोटफोडे, दिपक पोटफोडे, कृष्णा हिवसे, प्रथनेश ढोकपांडे, रवी बोरकर, अरविंद ठाकरे,अंकित बावणे, रोशन बावणे, अविनाश वांदिले, अप्रित रेवतकर, रजत झाडे, शुभम बावणे, रितीक घवघवें, राहुल घवघवे, सागर राऊत, योगेश बालखाडे, राम देवतळे, कृष्णा हिवसे,निखिल शेडें , सौरभ लोंढे, करण बावणे, प्रथम मेश्राम, आर्यन मुडेवार, प्रणय खारकर, तुषार धनरेल, क्रिस धनरेल, राज जैन,संदीप झोंबाडे, मनोजभाऊ इतवारे, दत्तूभाऊ लिखार आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


