वर्धा : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे 2023 हे वर्ष राज्यात आंतररराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त कृषि विभागाच्यावतीने मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले असून या दौडमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवार दि.4 मार्च रोजी सकाळी 7 वाजता मिलेट दौड आयोजित करण्यात आली आहे. या दौडच्या शुभारंभाप्रसंगी खा.रामदास तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहे. यामध्ये 16 ते 18 वर्ष आतील मुले व 18 वर्षावरील पुरुष यांच्या स्पर्धा घेतली जातील.
मिलेट दौडचा मार्ग 16 ते 18 वय वर्ष मुलासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडांगण येथे सुरुवात होऊन जिल्हा परिषद, शिवाजी चौक, बजाज चौक, पोष्ट ऑफिस, जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडांगण येथे शेवट होईल. 18 वर्षावरील मुलासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडांगण येथे सुरुवात होऊन पोष्ट ऑफिस, जीए कॉमर्स कॉलेज, गांधी पुतळा, विश्राम गृह, आरती टॉकीज, शिवाजी चौक, बजाज चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे शेवट होईल. दौड मध्ये 16 ते 18 वर्ष आतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार रोख 2 हजार, द्वितीय पुरस्कार 1 हजार 500, तृतीय पुरस्कार 1 हजार, चतुर्थ पुरस्कार 750 व पाचवा पुरस्कार 500 रुपये रोख व प्रशस्तिपत्र तसेच इतर स्पर्धकांना प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
वय 18 वर्षावरील पुरुष विजेत्यांना प्रथम 2000, द्वितीय 1 हजार 500, तृतीय 1 हजार, चतुर्थ 750 व पाचवा पुरस्कार 500 रुपये रोख प्रशस्तिपत्र इतर स्पर्धकांना प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सदर मिलेट दौड मध्ये 16 ते 18 वर्ष आतील व 18 वर्षावरील पुरुष यांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दौडमध्ये भाग घेवू इच्छिणाऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क मो.न.९४०३०१४४४८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.विद्या मानकर यांनी कळविले आहे. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचे मुळप्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
Breaking News
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
- शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
- जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती

