Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, July 29
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » बाजार समित्यांमधील शेतमालावर अवकाळीचे ढग
कृषी

बाजार समित्यांमधील शेतमालावर अवकाळीचे ढग

समित्यांमधील शेडमध्ये शेतमाल कुणाचा ?
breakingvidarbhaBy breakingvidarbhaMarch 18, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वर्धा : शेतकऱ्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात भिजतो. ही नेहमीची समस्या सोडविण्यासाठी शेड देखील उभारण्यात आले. पण व्यापारी, दलाल आणि प्रशासकीय अतिक्रमनाने शेड देखील कमी पडू लागले आहे. सातत्याने शेतकऱ्यांसाठीचे शेड शेतकऱ्यांनाच मिळत नसल्याने बाजाराच्या यार्डातील शेती पिकावर अवकाळीचे संकट घोंगावत आहे.

वर्ध्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. काही ठिकाणी पाऊस देखील झाला. शेतकऱ्यांचा शेतातील शेतमाल वाचविण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या. तर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतपिकाची काळजी आधीच घेतलेली होती. पण शेतातील शेतीपिक हातून जाईल अशी भीती शेतकऱ्यांना आहेच. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आणलेल्या शेतमालाची देखील चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या शेतपिकावर अवकाळी पाऊस नेहमीच पाणी फिरवत आला आहे. पण शेतकऱ्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेहमीच उघड्यावर का राहतो ? असाच प्रश्न नेहमी शेतकरी विचारतात. विविध योजनांच्या निधीमधून हिंगणघाट, वर्धा, सेलू, देवळी, आर्वी आणि समुद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठे शेड उभारण्यात आले आहे. विक्रीसाठी आलेला शेतकऱ्यांचा शेतमाल हा या शेडखाली रहावा असाच या योजनेतील शेडचा उद्देश आहे. परंतु दरवर्षी व्यापारी आणि दलालांकडून या उद्देशाला हरताळ फासला जातो. शेडमध्ये शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचा माल ठेवण्यात येतो. पाऊस आला की मग मात्र धावपळ होते. शेतकरी शेतमाल ठेवण्यासाठी बाजारातील शेडमध्ये जागाही शोधण्याचा प्रयत्न करतो. पण व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाने हिरावलेली जागा शेतकऱ्याला मिळणे कठीण जाते आणि बऱ्याचदा शेतकऱ्याला आपला माल ओलाचिंब होताना पाहावे लागते.

 

बाजार समितीमध्ये आवक वाढली की व्यापाऱ्यांची देखील तारांबळ होते. पण यासाठी आधीच खरेदी करण्यात आलेला माल लवकरात लवकर उचल करण्यासाठीची सुविधा व्यापाऱ्यांकडून होणे आवश्यक आहे. पण ते होताना दिसत नाही. त्यामुळेच बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली तर शेतमाल यार्डात भरगच्च भरलेला असल्याने तो माल उचले पर्यत बाजार समितीमध्ये व्यवहार देखील ठप्प राहतो. ‘उद्या खरेदी बंद’ अशा सूचना लावल्या जातात. बऱ्याचदा आठवड्यातून एक-दोन दिवस बाजार समितीच्या आवारात लिलाव होत नाही.

याकडे शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरी मात्र डोळेझाक केली जाते. बाजारात भाव वाढत असताना अचानक एक – दोन दिवस बाजार बंद राहिल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फरक पडतो. चार दिवसावर गेलीली खरेदी योग्य भाव देऊ शकत नाही असाही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 15 ते 18 मार्च यादरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. काही ठिकाणी या पावसाने शेतमाल देखील भिजला. यार्डात आलेला माल घरी परत कसा न्यायचा या विवंचनेत शेतकरी नेहमी असतो. यावेळी देखील तेच झाले. त्यामुळेच वर्ध्यात वर्धा बाजार समिती प्रशासनाने गुरुवार पासून सोमवार पर्यत कृषी उत्पन्न बाजार समिती मधील लिलाव प्रक्रिया बंद ठेवली आहे.

शेतकरी संघटनेचे सचिन डाफे म्हणतात, 
‘ही समस्या वर्ध्याच्या सर्वच बाजार समितीमध्ये पाहायला मिळते. व्यापाऱ्यांचे वर्चस्व जास्त आहे त्यामुळे सामान्य शेतकरी जागा तरी कशी मागणार असा प्रश्न आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांचा हिरमोड होतो. व्यापारी मालाची उचल लवकर करीत नाही त्यामुळे लिलाव देखील बंद राहतात.’

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समीर पेंडके म्हणतात, ‘चार दिवसाचा अवकाळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे गुरुवार पासून लिलाव बंद ठेवण्यात आले आहे. सकाळी भाजी बाजार सुरू राहतो पण धण्याचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे.’

breakingvidarbha

Post Views: 124
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी

January 4, 2025

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

December 25, 2024

दीड किलो मीटरच्या लोटांगणातून ओला दुष्काळाची आर्त हाक

August 9, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (999)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (982)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (832)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (779)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.