Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, July 29
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी युवा शेतकऱ्याचे यांत्रिक जुगाड 
कृषी

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी युवा शेतकऱ्याचे यांत्रिक जुगाड 

अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतोय यंत्र निर्मितीचा प्रयोग
breakingvidarbhaBy breakingvidarbhaMarch 25, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वर्धा  –  आर्वी तालुक्यातील कासारखेडा या गावात एका शेतकऱ्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर, पॉवर विडर, पावर ट्रीलर यासारखी यंत्रे तयार केली आहे. आंतर मशागत आणि तण नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या यंत्राचा फायदा उत्पादनात वाढ होण्यासाठी होत आहे. शेतीमधील कामासाठी मजूर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतातील कामे वेळेवर पार पाडली जात नसल्याने शेतकऱ्याला नुकसान देखील सोसावे लागतंय. त्यासाठीच कासारखेड येथील शेतकऱ्याचा हा यंत्र निर्मितीचा प्रयोग शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरत आहे. यात स्क्रॅप मधील विविध पार्टचा देखील वापर करण्यात आला आहे. 

योगेश माणिकराव लीचडे हे खरांगणा नजीकच्या कासारखेड या गावात राहतात.   त्यांच्याकडील तीन एकर शेतीवर वारंवार ट्रॅक्टर सारख्या मोठ्या यंत्राचा वापर करणे शक्य नव्हते. याशिवाय कमी शेती असल्याने लवकर ट्रॅक्टर किरायाने देखील उपलब्ध होत नव्हता. मजूर देखील वेळेवर उपलब्ध होत नसल्याने वेल्डिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या युवा शेतकऱ्याच्या कल्पकतेतून आंतर मशागतीसाठी छोट्या यंत्रांची निर्मिती झाली. सुरवातीला आपल्याच अल्पशा शेतीसाठी शेतकऱ्याने पायी चालत वापरला जाणारा छोटा पावर विडर तयार केला. त्याचा वापर देखील आपल्या शेतात केला. त्यात सुधारणा करीत आंतर मशागतीला उपयुक्त ठरेल असे यंत्र बनविले. त्याचा आपल्या शेतात वापर देखील केला. त्याचा फायदा झाला आणि उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनातही भर पडली. हेच हेरून या शेतकऱ्याने या पावर  विडरमध्ये मॉडीफिकेशन केले. त्याचा आकार आणि क्षमता वाढविली. तीन प्रकारचे यंत्र त्याने विकसित केले आहे.

आपल्या या कार्यात योगेश यांना घरच्यांची देखील साथ मिळाली आहे. त्याने  मिनी ट्रॅक्टर देखील तयार केला आहे. पाच हॉर्स पावर इतक्या क्षमतेचे इंजिन यात वापरण्यात आले आहे. हा मिनी ट्रॅक्टर तीन लिटर डिझेलमध्ये सहा तास काम करू शकतो. त्याला कल्टी वेटर आणि वखर पास जोडून कामे केली जाऊ शकतात. ट्रॅक्टर मध्ये इंजिन आणि गिअर विभाग स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी या यंत्राचा फायदा घेतला आहे.

पैसा, वेळ आणि मजुरीचा खर्च वाचविणारे हे यंत्र शेतकरी हिताचे  ठरते आहे. बैलजोडीने चार एकर शेतीची आंतरमशागत केली तर दोन दिवस लागतात. एकरी 1 हजार याप्रमाणे चार हजार रुपयांचा खर्च येतो. तर हेच काम मिनी ट्रॅक्टर ने केले तर एकराला 100 रुपयांचे डीझेल याप्रमाणे चार एकराला 400 रुपयांचे डिझेल लागते आणि एका मजुराची 600 रुपये मजुरी असे 1 हजार रुपयात एकाच दिवसात चार एकर शेतीची मशागत शक्य होते. यात शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांची बचत होते आहे. आणि वेळही वाचतो आहे. याशिवाय ट्रॅक्टर किरायाने घेत हीच कामे करण्याचा प्रयत्न केला तर वेळेवर किरायाचा ट्रॅक्टर  उपलब्ध होत नाही आणि किरायाची रक्कम देखील जास्त असते. मिनी ट्रॅक्टर तयार करायला योगेश लीचडे या शेतकऱ्याला 75 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर पावर विडर तयार करायला या शेतकऱ्याला 50 हजार रुपयांचा खर्च आला आहे.

शेतकऱ्याची गरज आणि कल्पकता याची सांगड घालून शेतकरी स्वतःच आपल्या उत्पादनात भर पाडतो आहे. अशा शेतकऱ्याला मात्र कृषी विभागाच्या प्रोत्साहनाची गरज आहे.

 

breakingvidarbha

Post Views: 118
वर्ध्याच्या गावखेड्यातील शेतकऱ्याने तयार केला मिनी ट्रॅक्टर
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी

January 4, 2025

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

December 25, 2024

दीड किलो मीटरच्या लोटांगणातून ओला दुष्काळाची आर्त हाक

August 9, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (999)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (982)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (832)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (779)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.