वर्धा : जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने वर्ध्यात गजानन भक्तांची मांदियाळी दिसून आली. वर्ध्यातील सर्कस ग्राउंड वर बनवलेल्या मोठ्या मंडपामध्ये जवळपास चार हजार सहाशे गजानन भक्त पारायणाला बसलेत. यामध्ये महिलांची संख्या कमालीची दिसून आली, गेल्या आठ वर्षापासून जागतिक पारायण दिन सोहळा हा वर्ध्यात उत्साहात पार पाडला जातो. येथे अपंग वयोवृध्द यांच्यासाठी सुद्धा बसण्याची व्यवस्था करण्यात आलीय. स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे मोठे सेवेचे योगदान दिले. विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने वर्धा येथे केले गेले आहे. यावेळी जय गजानन च्या गजराने वर्धा नगरी दुमदुमली होती. अविनाश वंजारी, चंद्रशेखर राठी, अखिलेश गव्हाणे यांच्यासारख्या असंख्य गजानन सेवकांनी सेवा करीत पारायण सोहळ्यात भर टाकली आहे.