Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
  • जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Saturday, April 18
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » वर्धेत 146 पक्षी प्रजातींच्या नोंदी  
Uncategorized

वर्धेत 146 पक्षी प्रजातींच्या नोंदी  

breakingvidarbhaBy breakingvidarbhaFebruary 28, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
‘ग्रेट बकॅयार्ड बर्ड काउटं’ ला वर्धेत 146 पक्षी प्रजातींच्या नोंदी  

वर्धा : ग्रेट बकॅयार्ड बर्ड काउटंच्या निमित्याने वर्धा जिल्ह्यातील विविध अधिवासात पक्षी निरीक्षकांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात 146 पक्षी प्रजातींच्या नोंदी घेवून त्या ईबर्ड डॉट ओआरजी या संकेत स्थळावर नोंदवण्यात आल्या. वर्धा जिल्ह्यात आढळणाऱ्या एकूण प्रक्षी प्रजाती पैकी 48 टक्के प्रजातींचे दर्शन या चार दिवसीय पक्षी गणनेमध्ये झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या ग्रेट बकॅयार्ड बर्ड काऊंट मधील कॅम्पस बर्ड काऊंट सेवाग्रामच्या दवाखान्याच्या परिसरात पक्षी निरीक्षण करत 40 पक्षी प्रजाती नोंदविण्यात आल्या.

यात पक्षी अभ्यासक राहुल वकारे आणि पवन दरणे यांना बोर धरणाच्या परिसरात टिकेलचा लीफ वार्बलर आढळला. याचे शास्त्रीय नाव फिलोस्कोपस ऍफिनिस असे आहे. ही वर्धा जिल्ह्यातील पहिलीच नोंद आहे. या नोंदीने वर्धेच्या आणि बोर व्याघ्र प्रकल्पाच्या पक्षी वैभवात भर पडली आहे.  

भारतामधील 37 राज्यांनी आपला सहभाग नोंदविला असून 389 पक्षी प्रजातींसह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांनी ग्रेट बकॅयार्ड बर्ड काउटंमध्ये आपला सहभाग नोंदविला. महाराष्ट्रात वर्धेचे स्थान तेराव्या क्रमांकावर आहे.

वर्धेत नोंदवण्यात आलेल्या पक्षी प्रजातींमध्ये जागतिक आययुसीएन या संघटनेद्वारे वर्गीकरण करण्यात आल्यानुसार असुरक्षित वर्गात मोडणारे नदी सुरय, संकट समीप वर्गातील मोठा करवानक, काळ्या शेपटीचा पाणटीवळा, तिरंदाज, काळा शराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा व करण पोपट हे आढळले.

वर्धा येथील रोठा तलाव, दिग्रस तलाव, बोर वाघ्र प्रकल्पाजवळील भाग, जामणी येथील मदन धरण, आर्वी येथील सारंगपुरी तलाव व शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, सेवाग्राम येथील दवाखान्याचा परिसर अश्या विविध परिसरात पक्षी निरीक्षणांनी पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या.


   
यात महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य दिलीप विरखडे, विदर्भ समन्वयक राहुल वकारे, डॉ. चेतना उगले, मनीष ठाकरे, सफल पाटील, श्रीकांत वाघ, पवन दरणे, शंतनू बोरवार, प्रियांका नेहेते, प्रकाश भोयर आणि विनोद साळवे यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या.  

महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ, किरण मोरे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, वनविभागाचे माजी वनपाल अशोक भानसे, प्रशांत काकडे, अविनाश भोळे तसेच अनेक पक्षीमित्रांनी अभिनंदन केले.

breakingvidarbha

Post Views: 192
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

December 25, 2024

प्रचारतोफा थंडावल्या…

November 19, 2024

सालोड हिरापूरच्या लाडकी बहीण केंद्रावर नजर

July 13, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

By breakingvidarbhaMarch 13, 20250

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा :…

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!

January 14, 2025
Demo
Top Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (917)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (915)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (801)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (746)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (696)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.