वर्ध्यासाठी महाविकास आघाडीकडून सक्षम उमेदवार जाहीर करावा
इंडिया अलंयन्सचे वरिष्ठ नेत्यांना पत्रातून घातले साकडे
इंडीया अलायंसच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वरीष्ठ नेत्यांना पत्र
इंडीया अलायंसच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती
वर्धा : वर्धा लोकसभेमध्ये इंडिया अलायंसने एक सक्षम उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी इंडीया अलायंसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसे पत्रच इंडिया अलंयन्स मधील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वरिष्ठाना पाठविण्यात आले आहे. वर्ध्यात वरदा वर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला नाही. महायुतीने प्रचार देखील सुरू केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने लवकर सक्षम उमेदवार जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सक्षम उमेदवार हा महायुतीच्या विद्यमान उमेदवाराला तोड देणारा ठरावा, यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. उमेदवार जाहीर करताना सगळे निकष तपासून तो एक प्रभावी उमेदवार असेल आणि बेस तयार करण्याचे कामाला अधिक उभारी देणारा उमेदवार असावा. महाविकास आघाडीचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरचे नेत्यांना पाठवलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. इंडीया अलायंसच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वरीष्ठ नेत्यांना पत्र पाठवले आहे. यापूर्वी हर्षवर्धन देशमुख यांच्या नावाची सतत चर्चा होत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नसल्याची बाब या पत्र परिषदेत इंडिया अलंयन्सने खोडून काढली आहे.
इंडीया अलायंसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत अविनाश काकडे, जिल्हा समन्वयक भारत जोडो अभियान यांच्यासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत उपस्थित होते.
Post Views: 220