- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
पाच दिव्यांग बांधव उपोषणावर म्हाडा वसाहतीत घर देण्याची केली मागणी वर्धा : हिंगणघाट शहरात बांधण्यात आलेल्या म्हाडा वसाहतीत दिव्यांग बांधवांना घर द्यावे या मागणीसाठी कामगार नेते उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी हिंगणघाट येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. येथील दिव्यांग बांधवांनी गेल्या काही महिन्यांपासून अनेक निवेदने दिली. आंदोलन देखील केले,पण शासन दखल घेत नसल्याने दिव्यांग बांधवांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. प्रवीण कावळे, प्रफुल उके , आकाश भोपळे, मनोज कोटकेवार, अमरसिंह गंगवार या दिव्यांगानी उपोषण सुरू केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग उपोषणाला बसले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंगणघाट येथे बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या वसाहतीत घर देण्याची मागणी होत आहे.…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्धा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन निवडणुक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे या वेळी अधिक जबाबदारीने पालन करुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एक दिवसाचे प्रशिक्षण निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सभारंभात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, आर्वीचे उपविभागीय विश्वास शिरसाट, हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी वंदना संवरंगपते, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, सावनेरचे उपविभागीय अधिकारी संपट खलाटे,…
आमदार समीर कुणावार स्वतः मेळाव्यात लक्ष ठेऊन वर्धा : आपण लोकप्रतिनिधी असल्याने शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी करणारच. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने विरोधकांची पोटदुखी उमळून आली आहे आणि नैराश्येच्या भावनेतून खोटे आरोप करून लाभार्थ्यात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. असा घानाघाती आरोप आमदार समीर कुणावर यांनी केला. स्थानिक अनुसया सभागृहात इमारत बांधकाम कामगारांना किचन सेट व सुरक्षा किट वाटप कार्यक्रमा संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जनतेला व महिलांना काहीच मिळाले नाही. आमचे सरकार अनेक निर्णय घेत आहे. हा माझा पाचवा…
जेष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर वर्धा : गांधी-विनोबांचा वारसा लाभलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यानंतर बापूरावजी देशमुख, बाबासाहेब धांदे, संतोषराव गोडे, केशवराव झाडे अशी विधायक नेतृत्व करणारी पिढी तयार झाली. त्यांनी जिल्ह्यात राजकारणासोबत समाजकारण करीत विधायक कामाचा डोंगर उभा केला. याच विधायक कामातून शहर तसेच ग्रामीण भागाचा विकास झाला. यात शिक्षण क्षेत्रात झालेले काम महत्वाचे ठरले. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले. वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगता सामारोह कार्यक्रमात बोलत होते.यावेळी मंचावर सुरेश देशमुख यांच्या पत्नी स्वातीताई देशमुख यांच्यासह या सांगता समारोहाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री…
मतदार नोंदणीसाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे -विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक वर्धा : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून 6 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीच्या कामांना गती द्यावी. नवमतदारांची नोंदणी करण्यासह मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुरदृष्य प्रणालीव्दारे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी छायाचित्रासहित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 चा बैठकीत आढावा घेण्यात…
सोसायटी ऑफ अनास्थेसियोलॉजिस्ट्स व मेघे अभिमत विद्यापीठाचे आयोजन वर्धा : सोसायटी ऑफ अनास्थेसियोलॉजिस्ट्स, वर्धा शाखा आणि जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने बधिरीकरणशास्त्राच्या स्नातकोत्तर विद्यार्थ्यांसाठी पीजीकॉन २०२४ राज्य परिषद दि. १० व ११ ऑगस्ट रोजी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ, सावंगी येथे आयोजित करण्यात आली आहे. सोसायटी ऑफ अनास्थेसियोलॉजिस्ट्स, महाराष्ट्र राज्यअंतर्गत आयोजित या परिषदेला महाराष्ट्रातील विविध भागातून स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि भूलतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या सहभागींना त्यांचे शोधनिबंध आणि पोस्टर्सचे सादरीकरण करण्याची संधी या परिषदेत प्राप्त होईल. याशिवाय, ज्येष्ठ व अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना पदव्युत्तर परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे बधिरीकरण शास्त्रातील अद्ययावत वैद्यकीय…
काका – पुतण्याच्या राजकीय डावात काँग्रेसमध्ये खळबळ दत्ता मेघे यांचे पुतणे काँग्रेसमध्ये ; वर्ध्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट वर्धा : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार यांच्या निमित्ताने महाराष्ट्राने काका – पुतण्याच्या राजकारण पाहिले आहे. आता काका पुतण्याचे हेच वारे विदर्भात देखील वाहू लागले आहे. आतापर्यंत राजकारणापासून अलिप्त राहणारे अभ्युदय मेघे राजकारणात सक्रिय झाले आहे. दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे सक्रिय झाल्याने वर्ध्याच्या राजकारणात आता नवीन काका – पुतण्याच्या राजकीय चर्चाना पेव फुटला आहे. वर्ध्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. वर्ध्यात एकेकाळी काँग्रेसमध्ये दबदबा असलेले माजी खासदार दत्ता मेघे यांनी सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात प्रवेश करून मोठा…
वर्ध्याच्या देवळी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लोटांगण तब्बल दीड किलोमीटर लोटांगण घालत केले आंदोलन देवळीत युवा संघर्ष मोर्चाचे लोटांगण आंदोलन वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे शेतकऱ्यांनी दीड किलो मीटर अंतरापर्यंतचे लोटांगण आंदोलन केले आहे. वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहे. देवळी शहराच्या बसस्टॉपपासून ते तहसील कार्यालयापर्यंत लोटांगण घेत हे आंदोलनकर्ते तहसील कार्यालय येथे पोहचले आहे. वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पांधन रस्ते तयार करावे या मागणीसाठी हे लोटांगण आंदोलन आहे. युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. शेतकऱ्यांसाठी केलेल्या…
भ्रूणविज्ञान दिनानिमित्त गर्भवती मातांसाठी फॅशन शो हवाईसुंदरी श्वेता डवरे ठरली ‘मिसेस मदर अँजल वर्धा : सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभाग आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक भ्रूणविज्ञान दिनानिमित्त गर्भवती मातांसाठी आयोजित अभिनव फॅशन शोमध्ये विमान वाहतूक सेवेत हवाईसुंदरी राहिलेली श्वेता डवरे ‘मिसेस मदर अँजल’ विजेतेपदाची मानकरी ठरली. तर, सोनाली सागर रामधन आणि दुर्गा आशिष मिश्रा या उपविजेत्या ठरल्या. या स्पर्धेत तब्बल २३ गर्भवती माता सहभागी झाल्या होत्या. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गर्भवती मातांनी रॅम्प वॉक करीत लक्ष वेधून घेतले. तर, दुसऱ्या फेरीत स्त्रीत्व आणि मातृत्व…
आपला देश परिश्रम करणाऱ्याला संधी देतो ! – नुरुल हसन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंतांचा अभिनंदन सोहळा वर्धा : माझे वडील हे एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते परंतु त्यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे, पाठिंब्यामुळे व मी परिश्रमपुर्वक घेतलेल्या शिक्षणामुळे माझ्यासारखा एक दुर्बल, गरीब वर्गातून आलेला व्यक्ती आज जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक झाला आहे. आपला भारत देश इतका सुंदर देश आहे की, येथे परिश्रम करणारा गरिबातील गरीब व्यक्ती सुद्धा कोणत्याही मोठ्या पदावर जाऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न व परिश्रम करायला हवे. त्यांना यश नक्कीच मिळेल, असे प्रेरणादायी स्वानुभव वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी कथन केले. येथील यशवंत ग्रामीण शिक्षण…

