- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
दिघी व बोपापूर येथे खरीप मेळाव्या दरम्यान शेतकरी प्रशिक्षण वर्धा : सोयाबीन हे तेलबियावर्गीय पीक असून यात प्रथिने ४० टक्के तर तेलाचे प्रमाण २० टक्के असते. व्यवस्थापनातील सर्व बाबींचा अंगीकार योग्य प्रकारे म्हणजेच काटेकोर केल्यास पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास निश्चित मदत होईल. असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र सेलसुराचे वरीष्ठ शास्त्रज्ञ जीवन कतोरे यांनी खरीप मेळाव्या दरम्यान शेतकरी प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना केले. देवळी तालुक्यातील दिघी बोपापूर येथे खरीप मेळाव्या दरम्यान शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास तलाठी डोंगरे, सरपंच संदीप दिघीकर, विनोद दांदळे (बोपापुर), माजी उपसरपंच वडतकर, पोलीस पाटील भोपटे, सचिन वडतकर, प्रतिभा फुलमाळी, प्रगतिशील…
पावसाळ्यात उद्भवणा-या आजाराबाबत आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिल्या सूचना वर्धा : पावसाळा हा विविध आजारांना निमंत्रण देणारा ऋतु म्हणुन ओळखला जातो. पावसाळ्यात हवेतील आद्रतेमुळे विषाणु वाढतात त्यामुळे पाणी, अन्न पदार्थ दुषीत होण्याची शक्यता अधिक असते. तसेच गढूळ पाणी, पाला पाचोळा कुजल्यामुळे डासासह विविध प्रकारचे जिवाणू सुध्दा निर्माण होतात. त्यामुळे मानवाला पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे किटकजन्य आजार डेंगु, हिवताप, चिकुण गुण्या सारखे आजार तसेच दुषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारखे आजार उद्भवतात. तसेच पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरा या जंतुची जखमेवाटे लागण होऊन लेप्टोस्पायरोसीस हा आजार होतो. सारखे आजारापासुन खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. …
कृषिकवी रंगनाथ तालवटकर ग्रामीण भागात पावसाला शब्दातून शोधताना.. तू ऐक हाक माझी… वर्धा : शोधू कुठे तुला मी अंधारली ही वाट आगमनात तुझ्या रे कित्येक गेल्या पहाट स्वप्नात येतो माझ्या बघतो तुला मी रोज ढग जमले आकाशी मनास झाले बोझ भर तू कुस आता अतृप्त धरणीची अंकुरणाऱ्या बीजांना भीती रे मरणाची पेरणी ही नव्याने नको दुबार आता कष्टाच्या भाकरीचे उघड तू दार आता संसार मांडला मी जुगारापरी शिवारी लेकरास काय सांगू कोण माझा कैवारी दुःखात आहे माझी काळी माय मेघराजा तू ऐक हाक माझी विनवितो बळीराजा – रंगनाथ तालवटकर ( कृषिकवी) 7387439312
पुलगाव येथे वर्धा नदीच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू वर्धा : पुलगाव येथे मजुरी काम करणाऱ्या दोघांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुलगाव बॅरेज परिसरात ही घटना घडली असून त्यांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले आहे. पुलगाव येथे घुबड टोली येथे राहणारे पंचावन्न वर्षीय सुरेश लक्ष्मण लाडेकर आणि गणेश बन्सी चाचने हे दोघे मजुरीच्या कामासाठी घराबाहेर पडले, पण घरी परतले नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता पुलगाव येथील वर्धा नदीवरील पुलगाव बॅरेज डॅम परिसरात पाण्यात मृतदेह आढळून आले आहे. सुरेश लक्ष्मण लाडेकर, वय 57 वर्ष रा. घुबडटोली,पुलगाव आणि गणेश बन्सी चचाणे वय 55 वर्ष रा. घुबडटोली, पुलगाव हे दोघे…
संतप्त गावकऱ्याकडून रोठा ग्रामपंचायतीच्या आवारातच मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न सरपंच व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर गावकरी शांत वर्धा : गावात स्मशानभूमी नसल्याने मृतदेह दफन कुठे करायचा? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांनी चक्क ग्राम पंचायतीच्या आवारातच मृतदेह दफन करायला आणतो म्हणत गड्डा खोदण्यासाठी टीकास सुद्धा मारली. पण सरपंचाकडून पोलिसांना पाचारण करून गावकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न झाला. रोठा येथे घडलेल्या या प्रकारामुळे गावातील स्मशानभुमीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. वर्ध्याच्या नजीक असलेल्या रोठा ग्राम पंचायय अंतर्गत येणाऱ्या नागठाना येथे गावकऱ्यांनी पाच वर्षापासून स्मशानभूमीची मागणी केली आहे. मंगळवारी गावातीलच एक व्यक्ती मय्यत झाला, पण आधी ज्या शेतात अंत्यसंस्कार केले जात होते, त्या…
बुरशीजन्य रोगांना ठेवता येते लांब वर्धा : विदर्भामध्ये कापूस पिकानंतर सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, चक्रीभुंगा, उंटअळी तसेच मागील वर्षी चारकोल रॉट, शेंगेवरील करपा व पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे सोयाबीन पिकावर येणाऱ्या कीड व रोग टाळण्याकरिता तसेच त्यांचे प्राथमिक अवस्थेत व्यवस्थापन होण्याकरिता पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्वाची ठरू शकते. खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, जास्त पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक असते. तसेच सोयाबीन पिकाच्या रोपावस्थेत जास्त पाऊस, जास्त आर्द्रता आणि शेतात पाणी साचल्यामुळे मुळकुज व खोडकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. जमिनीमध्ये वास्तव्य करणार्या बुरशीमुळे पिकांवर…
आरोग्य विभागाचा उपक्रम वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव अंतर्गत येणाऱ्या विविध गावात हत्तीरोग रुग्ण यांना पायाची देखभाल कशी करावी तसेच इजा झाल्यास हत्ती रुग्णांनी पाय कसे धुवावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेशमा बोरघरे, डॉ. महिमा डेविड, आरोग्य सहाय्यक दिलीप उटाणे ,श्याम जोशी, सिंधू रोकडे, स्वाती धोंगडे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावागावात हत्तीपाय रुग्णांना देण्यात आलेल्या किटचा वापर योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याबाबत पडताळणी करण्यात आली. तसेच एमएमडीपी क्लिनिक बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक संजय पिंपळकर, मदन हातगावकर, विकी राठोड, रवींद्र भोगे, आरोग्य सेविका सुनीता मगर, नलिनी नेवारे ,भारती जुनघरे, उज्वला…
सावंगी मेघे येथील विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेद्वारे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सावंगी येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित या विद्यार्थी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देतानाच संस्थांतर्गत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शुल्कातील सवलतींबाबत माहिती दिली. शिक्षणासाठी असलेल्या सर्व शासकीय व संस्थांतर्गत योजनांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन अभ्युदय मेघे यांनी…
वर्ध्यात वाळू घाटावर मोठी कारवाई वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये साती घाटावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रात्रीत अवैध उत्खनन करणाऱ्या रेती माफियावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. साती घाटामधून पोलीस आणि महसूलने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत 23 टिप्पर 2 पोकलंड, 3 बोट जप्त करण्यात आल्या. लिलाव नसलेल्या रेती घाटातून रेतीमाफीया राजरोसपणे अवैध रेतीचे उत्खनन करीत असल्याने ही कारवाई झाली. हिंगणघाट तालुक्यातील साती येथील रेती घाटाचा लिलाव झाला नाही, पण येथे मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. महसूल प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मध्यरात्री धाड टाकली. येथे बोटीच्या सहाय्याने रेती उत्खनन सुरू होते. दोन…
शरद पवार यांची ही पहिली रॅलीच ठरली विजयाची रॅली वर्धा: शरद पवार यांच्या कुस्तीगीर परिषदेतील अध्यक्ष पदाला आव्हान दिले गेले. राजकारणाच्या कुस्तीतल्या या पैलवाणाची खेळी कुस्तीच्या फळात हुकली पण राजकारणाच्या फळात हुकणार तरी कशी, त्यामुळेच की काय परिषदेत आपल्याला धूळ चारणाऱ्या पहिलवाणाला चित करण्याचा आखलेला डाव वर्ध्यात रामदास तडस यांच्या पराभवाने देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडत शरद पवार यांनी फडणवीसांना मात दिली आहे. वर्ध्यातून काँग्रेस हद्दपार केली,अशी टीका शरद पवार यांच्यावर झाली, पण अमर काळे यांच्या विजयानंतर नेमके हद्दपार कोण झाले? असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विचारू लागले आहे. वर्धा लोकसभेची उमेदवारी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेसला? या संघर्षातून…

