Author: breakingvidarbha

वर्धेतून दुचाकी चोरायचे अन वाशिमला विकायचे   आर्वी पोलिसांनी केला दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश  4 आरोपी व दोन विधिसंघर्षित बालकांना घेतले ताब्यात  पोलीस अधीक्षकांनकडून आर्वी पोलिसांना बक्षीस जाहीर  वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीची चोरी होत असल्याने पोलिसांनी दुचाकी चोरांना जेरबंद करण्याची व्यूहरचना आखली होती. अश्यातच आर्वी पोलिसांनी एका दुचाकी चोरीचा तपास करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे तर दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. हे चोरटे वर्धा जिल्ह्यातून दुचाकी चोरून वाशीम जिल्ह्यात विक्री करत होते. या टोळीचा पर्दाफाश केल्याने आता दुचाकी चोरीवर अंकुश बसणार आहे.  आर्वी पोलीस स्टेशन…

Read More

बुलढाणा ट्रॅव्हल्स अपघाताला वर्ष उलटले पीडित कुटुंबाची मदतीची मागणी अजूनही अपूर्ण वर्धा : 1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्ग वर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात 25 निष्पाप जीवांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला,ज्यात 2 वर्षीय चिमुकलीचा सुद्धा समावेश होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण आले आहे. या अपघाताची झळ संपूर्ण महाराष्ट्राला बसली होती.या मध्ये बहुतांश मृतक हे वर्धा तथा नागपूर जिल्ह्यातील होते.सदर अपघात भीषण आणि दुर्दैवी असल्याने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी वित्तमंत्री तथा पालकमंत्री पदावर असतानाच प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने केल्याची तथा अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची…

Read More

अमृतच्या योजना सर्वच दुर्बल घटकांसाठी.. वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेची बैठक दिनांक 22 जून 2024 रोजी वर्धा येथे संपन्न झाली. या अमृतच्या विविध योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉ. राम लोकरे यांनी केले आहे.  सदर बैठकीस वर्धा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील   माधवराव पंडित,  नरेंद्र खरे, अटल पांडे,  मकरंद उमळकर,  प्रफुल्ल व्यास,  अमोल गाढवकर हे उपस्थित होते. वर्धा येथील ब्राह्मण सभा अध्यक्ष  विलास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अमृतचे नागपूर विभागाचे समन्वयक  देवदत्त पंडित यांनी  बैठकीचा हेतू विशद केला. अमृतच्या मुख्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राम लोकरे यांनी अमृतच्या स्थापनेचा उद्देश सविस्तरपणे सांगितला. राज्यातील खुल्या प्रवर्गातील…

Read More

नभास माझं एक मागणं कधी भाग बदलत पडतोस कधी एकाच ठिकाणी ढगफुटीसारखा उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी झाला आज तुझ्याविना पोरका काळ्या आईच्या कुशीत बीज निजली रे दमानं रुसवा फुगवा सोडून रे राजा येरे तू गुमाणं पहिल्यासारखा तू आता का वागत नाहीस काय हवं तुला तू तू स्वतः का मागत नाहीस काय गुन्हा केला मी तू इतका निष्ठुर झाला वेशीवर येउनी पुन्हा परत निघूनी गेला मी रोवलेली बीजं आता शहाणी झाली आहेत तुझ्या रोजच्या लपंडावाची कहाणी झाली आहेत रडतात ती रोपं आता टकटक तुला पाहून नभास माझं एक मागणं येरे राजा धावून                  …

Read More

अनेक पिढ्यांसाठी रूग्णालय संजीवनी ठरेल – आमदार समीर कुणावार  ४०० खाटांच्या रुग्णालयाच्या संकल्प चित्रफीतचे सादरीकरण हिंगणघाट : सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ४०० खाटांच्या शासकीय रुग्णालय बांधकामकरिता १५१ कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे. येणाऱ्या काळात कोणत्याही रुग्णालात उपचाराकरिता बाहेरगावी जावे लागणार नाही,हे रुग्णालय अनेक पिढ्यांसाठी संजीवनी ठरेल,असा विश्वास आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केला. शहरात प्रस्तावित ४०० खाटांच्या शासकीय रुग्णालय बांधकामाच्या संकल्प चित्रफीतचे येथील अनुसया सभागृहात सादरीकरण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आरोग्य उप संचालक डॉ.कांचन वानोरे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता  अंबोरे,आर्किटेक्ट सालंकर,माजी आमदार वसंत बोंडे,माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,राजेंद्र डागा, आयएमए…

Read More

देवळीत झालेल्या हत्येच्या घटनेचा रास्ता रोको करून केलाय निषेध बसपाच्या कार्यकर्त्यांनी केला देवळीत रास्ता रोको वर्धा : वर्ध्याच्या देवळी येथे सोमवारी दिवसाढवळ्या  इसमाची दगळाने ठेचून हत्या करण्यात आली. दारूच्या नशेत असणाऱ्या युवकाने ही हत्या केली, या विरोधात बहुजन समाज पक्षाकडून आज देवळीच्या आंबेडकर चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. घोषणाबाजी करीत आंदोलनातून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.  तसेच देवळी येथील दारू व गांजा सारखे अवैध धंदे बंद करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. सोमवारी देवळी येथे सोनेगाव रस्त्यावर दिवसा सायंकाळी सोनेगाव येथील 58 वर्षीय विनोद डोमाजी भरणे याला…

Read More

देवळी येथे दिवसाढवळ्या रस्त्यावर हत्येचा थरार हत्येच्या थराराने देवळी शहर हादरल वर्धा : देवळी शहरात सोनेगाव रस्त्यावर पोलीस वसाहतीच्या समोर भर दिवसा एका इसमाची दगळाने ठेचून हत्या करण्यात आली. मद्यधुंद असलेल्या एका तरुणाने सोनेगाव आबाजी येथील इसमास दगळाने ठेचून हत्या केली. रस्त्यावर लोकांना पैसे मागत असताना उभ्या असलेल्या महिलेसोबत वाद झाला, महिलेला होत असलेली शिवीगाळ पाहून वाद थांबविण्यासाठी मध्ये आलेल्या सोनेगाव आबाजी येथील 45 वर्षीय इसमाला दगळाने ठेचून ठार केले. रस्त्यावर घडणारा हा थरार लोकांच्या कॅमेरात कैद झाला. याचे विडीओ देखील व्हायरल झाले. पाच ते सहा वेळा दगळाने पडलेल्या इसमावर वार केले गेले. यावेळी आजूबाजूला नागरिकांची गर्दी होती पण कुणीही…

Read More

सेवाग्राम आश्रम येथे अभिनेता अमीर खान यांची भेट  पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला आले असता आश्रम परिसरात भेट देऊन घेतली माहिती  वर्धा : आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणारा बॉलिवूड अभिनेता अमीर खान याने सेवाग्राम आश्रमात भेट दिली. सेवाग्राम आश्रमात काही वेळ थांबून तेथील स्वयंसेवकांशी चर्चा केली. बापूच्या कुटीमधील विविध वस्तू आणि सेवाग्राम आश्रमाचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत असणारे स्थान याबाबत समजून घेण्याचा प्रयत्न आज अमीर खान याच्याकडून झाला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अमिरने आपण आधीपासूनच बापूंचे फॉलोअर आहोत, आणि आज सेवाग्राम येथे आल्यावर या स्थळाची ऊर्जा काय आहे हे कळले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.  अभिनेता अमीर खान याने वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम येथे…

Read More

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी वर्धा:  विज ग्राहकांना स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीला स्थगिती देण्याऐवजी प्रीपेड मीटरला कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हिंगणघाट येथे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी याबाबतचे निवेदन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. विज ही सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज आहे, आणि सरकारने ती माफक दरात पुरवणे आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये २०० युनिटपर्यंत विज मोफत दिली जात आहे. मात्र महाराष्ट्रात विज दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. वीज बिलात समाविष्ट असलेल्या विविध कर आणि शुल्क हे दरवाढीचे प्रमुख घटक आहेत. शासनाच्या नवीन वीज कर…

Read More

वर्ध्यातून पंढरपूर साठी 45 जादा बसेस पंढरपूर यात्रेकरीता भाविकांसाठी विशेष बस वर्धा : श्री क्षेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशी यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या वतीने 13 जुलै पासून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे. वर्धा आगारातून 25, आर्वी आगारातून 07, हिंगणघाट 10, तळेगाव 2 व पुलगाव आगारातून 1 अशा 45 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. वर्धा ते पंढरपूर करीता पूर्ण तिकीट 905 रुपये तर जेष्ठ नागरिकासाठी 455 रुपये आहे. आर्वी ते पंढरपूर पुर्ण तिकीट 895 रुपये तर जेष्ठ नागरिकासाठी 450 रुपये, हिंगणघाट ते…

Read More