वर्धा – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एअर रायफल स्पर्धेत वर्ध्यातील दोन विद्यार्थ्यांनी नागपूर विभागात बाजी मारली आहे. वर्ध्यात जिल्हा स्तरावर आयोजित एअर रायफल स्पर्धेमध्ये जिल्हा स्टेडियमवर चुरशीचे सामने रंगले. यात 14 वर्षे वयोगटात न्यु इंग्लिश अकॅडमी चा विद्यार्थी ओजस रवींद्र देशमुख याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर 17 वर्षे वयोगटात सेंट अँथॉनी शाळेचा प्रथमेश विजय मेंढेवार याने पहिला क्रमांक पटकाविला. ओपन साईट रायफल प्रकारात सक्षम शाळेचा वीर जयस्वाल याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानंतर नागपूर मंडळात झालेल्या स्पर्धामध्ये ओजस रवींद्र देशमुख याने 14 वर्षे वयोगटात तर प्रथमेश विजय मेंढेवार याने 17 वर्षे वयोगटात बाजी मारत प्रथम क्रमांक घेत विजय मिळविला आहे. आता राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत ओजस देशमुख व प्रथमेश मेंढेवार हे दोघे खेळणार आहे. या यशाबद्धल सर्वत्र ओजसचे व प्रथमेशचे कौतूक होत आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एअर रायफल रेंज वर प्रशिक्षक सातपुते यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण सुरू आहे. वर्ध्यातील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Breaking News
- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी


