- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
सुब्रतो मुखर्जी फुटबाॅल स्पर्धा वर्धा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा यांच्याकडून जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे दि. ८ ते १० जुलै २०२४ या कालावधी मध्ये आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धे मध्ये अल्फोन्सा सिनियर सेंकडरी स्कूल सावंगी मेघे येथील १५ वर्षाखालील विद्यार्थ्याच्या फुटबॉल संघाने सहभाग नोंदवून अग्रगामी स्कूल, मसाळा, येथील संघावर मात केली. फुटबॉलचा हा सामना चांगलाच रमला, अशा प्रकारच्या आयोजनाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. ग्रामीण भागात देखील असे आयोजन होणे आवश्यक आहे. या स्पर्धेत अथांग ताकसांडे (गोल किपर ),सक्षम पाटील,…
हिंगणघाटच्या तुकडोजी वॉर्ड परिसरात कारवाई वर्धा : हिंगणघाट शहरातील मुख्य वस्तीत एका व्यक्तीच्या घरात 532 ग्रॅम गांजा आढळून आला. हिंगणघाट पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला आहे तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने संत चोखोबा वार्ड हिंगणघाट येथील टाका ग्राउंड जवळ राहणारा शेख युसुफ शेख करीम वय 58 वर्ष याचे घरी गांजा च्या माहितीवरून रेड केला. दरम्यान आरोपीच्या घराच्या घरझडती मध्ये अंदाजे क 15,960 रूपये किंमतीचा ओलसर गांजा 532 ग्रॅम या सापडला.सदर गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. सदरचा गांजा मौका जप्त पंचनामा कारवाई प्रामणे जप्त करून आरोपीविरूध्द एन डी पी एस कायदयान्वे गुन्हा नेांद…
हिंगणघाट शहरात आभारी रॅली आणि सभेचे आयोजन वर्धा: वर्धा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे हे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच हिंगणघाट शहरात आले. त्यामुळे शहरातील कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. सर्वप्रथम त्यांनी शहालंगडी देवस्थान येथे दर्शन करून उपजिल्हा रुग्णालयात लगत असलेल्या शासकीय जागेची वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाहणी केली. जागा पाहत असताना आरक्षित काही जागा आढळून आल्या असून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आभार रॅलीला सुरुवात करण्यात आली. आभार रॅलीत खासदार अमर काळे प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांनी दिलेल्या शुभेच्छा स्विकारून सर्वांचे आभार मानत होते. शहरातील प्रमुख मार्गाने ही आभार रॅली काढत समारोह…
आमदार पंकज भोयर नावाचं पोस्टर लावून केला निषेध वर्धा ते सावंगी रस्त्यावर केले शिवसेनेच्या उबाठा गटाने आंदोलन वर्धा : सावंगी कडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहे. या खड्डयात पावसाचे पाणी साचले जात आहे. दहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या आमदार पंकज भोयर यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही अवस्था झाली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना उबाठा गटाने आमदार पंकज भोयर यांचे फोटोचे आणि भाजप पक्षाच्या चिन्हाचे बॅनर लावून निषेध व्यक्त केला आहे. सावंगी हा मार्ग हॉस्पिटलकडे जाणारा असल्याने रुग्णांना या रस्त्यातून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आमदारांचे असे पोस्टर लावून आंदोलन केल्याने या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.…
प्रधानमंत्री विमा कवच ठरले फायद्याचे वर्धा : वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील बोरखेडी येथील प्रतीक्षा राजेश कुंभरे वय 27 वर्ष या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेच्या कुटुंबाला बँक ऑफ इंडिया कडून दोन लाखाचा धनादेश देण्यात आला. गेल्या काही दिवसाआधी बोरखेडी येथील रहिवासी प्रतीक्षा राजेश कुंभरे मजुरी करून घर संसार चालवत होते. दरम्यान प्रतीक्षा राजेश कुभरे ही गर्भवती होती. प्रसूती दरम्यान तिचा मृत्यू झाल्याने कुटुंब रस्त्यावर आले. या महिलेला लावण्य नामक चार वर्षाची एक मुलगी आहे. मृत्यूपूर्वी प्रतीक्षा राजेश कुभरे हिने बँक ऑफ इंडिया शाखा आष्टी येथे खाते काढते वेळी जीवन ज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढला असल्याने या…
सावंगी मेघे रुग्णालयात कर्मचारी वृंदासाठी आयोजन वर्धा : सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी वृंदाकरिता क्षयरोग संसर्ग निदान व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सावंगी रुग्णालयातील हिप्पोक्रेटस सभागृहात श्वसनरोग विभाग व सामाजिक वैद्यकीय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय गायधने यांनी केले. यावेळी भारत सरकारच्या केंद्रीय क्षयरोग विभागाचे माजी उपमहासंचालक डाॅ. सुनील खापर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत सीडीसीचे डॉ. राजेश देशमुख, शेयर इंडियाच्या डॉ. संपदा भिडे, श्वसनरोग विभाग प्रमुख डॉ. बाबाजी घेवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतात दरवर्षी साडेतीन लाख रुग्ण आजही…
हिंगणघाटच्या नेहाला राष्ट्रीय विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेशाची संधी वर्धा : हिंगणघाट येथील डॉ. नेहा आर्य हिने स्वामी विवेकानंद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग अँड रिसर्च (भारत सरकार) च्या प्रवेश परीक्षेत 9 वा क्रमांक पटकावला आहे. भारत सरकार संचलित स्वामी विवेकानंद रिसर्च नॅशनल निवासी ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षेत हिंगणघाट येथील डॉ. नेहा प्रदीप आर्य या विद्यार्थिनीने संपूर्ण देशात नववा क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत हिंगणघाट येथील डॉ. नेहा आर्य हिने स्थान मिळविले आहे. डॉ. नेहा आर्य हीने सावंगी येथील रवी नायर फिजिओथेरपी महाविद्यालयातून फिजिओथेरपीचा अभ्यास पूर्ण केला असून अखिल भारतीय परीक्षेत 9 वा क्रमांक मिळाल्यानंतर देशातील…
बसमध्ये 63 प्रवासी मुंबई : नेपाळ येथील मदन – आश्रित महामार्गावर प्रवासी घेऊन जाणारी बस नदीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळतात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस त्रिशूल नदीत कोसळली आहे. या बसमध्ये चालकासह एकूण 63 प्रवासी असल्याची सूत्रांची माहिती आहे. या मार्गावर दरड कोसळली त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सावंगी येथे चाळीस आशांचा सन्मान वर्धा : आशा सेविका गावाचा कणा आहेत. आशा सेविका या गावात केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. सरकारने त्यांच्या मानधनात देखील आता वाढ केली, त्याची अंमलबजावणी लवकरच जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार असल्याचे आश्वासन जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी आशा वर्कर यांना दिले. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित आशा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अभ्युदय मेघे,…
सावंगी (मेघे) रुग्णालयातील हृदय शल्यचिकित्सा विभाग वर्धा : कोरोना काळात उद्भवलेल्या आजाराने पुन्हा अचानक वेगळ्या स्वरूपात पस्तीस वर्षीय गृहिणीला बाधित केले. मात्र अत्यंत दुर्मिळ असलेल्या या आजारावर अतिजोखमीची शस्त्रक्रिया करीत रुग्णाला नवजीवन देणारे उपचार सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागात करण्यात आले. देवळी तालुक्यातील टाकळी (दरणे) येथील रहिवासी विद्या मुरलीधर सावरकर (३५) हिला साडेतीन वर्षांपूर्वी अचानक छातीत कळ येण्यासोबतच स्नायूंचे दुखणे सुरू झाले. त्यातच डोळ्यांच्या पापण्या आपोआप खाली येऊन मिटत असल्यामुळे तिला त्यावेळेस सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागातील डॉ. केदार यांना दाखविण्यात आले. डॉ. केदार यांनी एमआयआर व इतर तपासण्या करून औषधोपचार…

