Author: breakingvidarbha

किचन सेट वितरणाच्या योजनेत डी बी टी तत्वाला फासलाय हरताळ घोटाळे करण्यासाठी डीबीटी तत्व ठेवले जाते बाजूला आशिष इझनकर वर्धा  : वर्ध्यात बांधकाम कामगाराना किचन सेटचे वाटप इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून केले जात आहे. यासाठी पहाटे तीन वाजतापासून कामगार रांगा लावत किचन सेट मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. पण डी बी टी तत्वाला हरताळ फासत हे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप या वितरणात होताना दिसून येत आहे. पारदर्शक व्यवहारासाठी थेट कामगारांच्या खात्यावर लाभ देण्याचे निर्देश असताना डी बी टी तत्वालाच बाजूला सारले जात आहे. थेट बँक खात्यात लाभ या पद्धतीला हरताळ फासला जात आहे.ज्या देवळी तालुक्यातील इसापूर या ठिकाणाहून वाटप…

Read More

शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यातील सूर ‘घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना अभियान’  वर्धा (ब्युरो) : वर्ध्यात संपूर्ण कार्यक्षमतेने वाढणारा शिवसेना ठाकरे गट हा पक्ष वर्ध्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रामुख्याने कार्य करणार आहे. दहा वर्षात येथील सत्तेतील नेते मोठा उद्योग वर्ध्यात आणू शकले नाही.  ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या  वाढत चालली आहे.  आरोग्याची ही परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे. त्यामुळे रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम करून लोकांना आधार देण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकतीने करणार असा सूर वर्ध्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या झालेल्या संपर्क मेळाव्यात उमटला आहे. ‘घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना’ हे अभियान राबविण्यात येत आहे, यासाठी सम्पर्क प्रमुख निलेश धुमाळ,…

Read More

वर्धा ते कळंब रेल्वेगाडीत प्रवासी नाही प्रवाश्यांमध्ये अद्याप गाडीची माहितीच पोहचली नाही वर्धा (ब्युरो) : दहा रुपयांच्या तिकिटात वर्ध्याहून कळंब येथे रेल्वेने पोहचता येत असले तरी सध्या नव्याने सुरू झालेल्या या गाडीला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दोन लोको पायलट, एक गार्ड आणि गेटमनच्या साहाय्याने कळंबच्या दिशेने जाणारी ही ट्रेन रिकामीच धावत असल्याचे चित्र आहे. वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे, पण याच मार्गात वर्धा ते कळंब पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. याचे ई लोकार्पण 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून करण्यात आले. वर्धा ते कडंब दरम्यान पहिली लोकल रेल्वे गाडी सुरू…

Read More

 शहर झाले भाजपमय, संपुर्ण ठीकठीकाणी सजावट नागपुर (ब्युरो) : सोमवारी नागपूर येथे राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वीजी सुर्या, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप महानगराचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंडी कुकडे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, मोहन मते, विकास कुंभारे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो शहर अध्यक्ष बादल राऊत हे उपस्थित असतील. संमेलनासाठी…

Read More

जिल्हा गुंतवणूक परिषद 4 मार्चला वर्धा (ब्युरो) : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी दि. 4 मार्च रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद चरखा भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या गुंतवणूक परिषदेमध्ये राज्य शासनासोबत सामंजस्य करार होणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन होणार असून खासदार रामदास तडस,आ. रामदास आंबटकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. रणजित कांबळे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, विकास आयुक्त (उद्योग, निर्यात) तथा अध्यक्ष (मैत्री) दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य…

Read More

वर्धा लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार जाहीर संभाव्य उमेदवार जाहीर करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी हिरवी झेंडी दिल्याची जिल्हा कार्यकारीणीची पत्रकार परिषदेत माहिती प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची घोषणा वर्धा : वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीने वर्धा लोकसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत घोषणा केल्याने वंचित आणि महाआघाडी यांच्यातील तिढा चर्चेत आला आहे.वर्धा जिल्हा कार्यकारिणीत ठराव घेऊन प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्ह्णून घोषणा करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांचे नाव उमेदवारीबाबत पक्के करण्यात आले असून याची जाहीर घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा तिढा सुटला नाही, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा…

Read More

बैलगाडीला  कारची धडक अपघातातील कार सीसीटीव्हीत कैद सेलू :  मजूर घेऊन जाणाऱ्या बैलगाडीला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या विचीत्र अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वडगांव रस्त्यावरील खरडा कारखान्याजवळ घडली. यातील जखमींना सेलूच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघातानंतर पसार झालेली भरधाव कार सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेलू येथील नऊ महिला मजूर  गुरुवारी पंकज कामडी यांच्या शेतात शेतमजूरीसाठी गेल्या होत्या. कामडी हे दररोज त्या मजूरांना आपल्या चारचाकी वाहनाने ने-आण करीत होते. परंतु सायंकाळच्या सुमारास त्यांनी नऊही महिला मजूर बैलगाडीतून घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. धनराज आदमने हे त्या नऊही महिलांना बैलगाडीत बसवून घराच्या दिशेने…

Read More

हातचलाखी ने  16 हजारावर चोरट्याने केला हात साफ वर्धा : बँकेमध्ये हातचलाखी करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. देवळीच्या बाभूळगाव बोबडे येथील रंजना वाघाडे या महिलेने पुलगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 40 हजार रुपये काढले होते, बँकेत खुर्चीवर बसून पैसे मोजणाऱ्या रंजना यांच्याकडे एका व्यक्तीने मोजून देत असल्याचा आग्रह धरला. आणि शिताफीने 40 हजार रुपयांच्या रक्कमेतील 16 हजार लंपास करून पळ काढला. पैसे कमी भरल्यावर रंजना वाघाडे यांनी तक्रार केली, स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपी नासिर अली आमिर अली याला अटक करण्यात आली आहे.

Read More

‘लग्नासाठी मुलगी पाहिजे’… च्या जाहिरातीची समाजमाध्यमात चर्चा भन्नाट पोस्टरने निखिल आला चर्चेत पुणे (ब्युरो) : आपण म्हणतोय शेतकऱ्यांच्या मुलाला आणि शेती करणाऱ्याला लग्नासाठी मुली मिळत नाही, पण पुण्यातलं जे चित्र सतत व्हायरल होत आहे, त्याने तर तरुणांची अवस्थाच समोर आणली आहे. पुण्याच्या रशियन चौकात वर्ध्यातील हिंगणघाटच्या एका उच्चशिक्षित तरुणाने चक्क हातात पोस्टर घेत ‘लग्नाला मुलगी पाहिजे, रशियन देखील चालेल’ अशीच जाहिरात केली आहे. हिंगणघाटच्या खापरी येथे राहणारा निखिल हा मूळचा हिंगणघाट येथील आहे. शिक्षण झालं आणि पुण्यात नोकरी शोधली. पण छोकरी मात्र मिळता मिळेना. जी स्थळं आली त्यांच्या अपेक्षाही लय भारी… कुणाला पुण्यात फ्लॅट पाहिजे आणि सोबत चारचाकी गाडीही मुलाजवळ…

Read More

सेलू येथील कृषी कार्यालयासमोर भजन सत्याग्रह कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याच्या मागणीसाठी भजन सत्याग्रह लोकप्रतिनिधींचे सतत झाले दुर्लक्ष वर्धा : वर्धेच्या सेलू येथील कृषी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात भजन सत्याग्रह करण्यात आला. जीर्ण झालेले सेलू येथील कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याच्या मागणीसाठी भजन सत्याग्रह करण्यात आला आहे. राजकीय लोकप्रतिनिधी चे येथे सतत दुर्लक्ष होत आले आहे.  अनेक दिवसापासून जीर्ण झालेल्या गोडाऊनमध्ये सेलू येथे कृषी कार्यालय सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागत आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत सुरू असलेले कार्यालय हे बंद करून सुसज्ज असे कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी किसान अधिकार अभियान च्या कार्यकर्त्यांनी कृषी…

Read More