Author: breakingvidarbha

शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याची केली मागणी पंचनामे लवकर झाले नाही तर आगामी निवडणुकांवर टाकणार बहिष्कार वर्धा: देवळीच्या विजायगोपाल परिसरातील तांबा या गावात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकावर शेतकऱ्यांना भिस्त होती, ही भिस्त देखील या अवकाळी पाऊस आणि गारांच्या तडाख्याने हिरावली गेली आहे. शेतकऱ्याचे हरबरा पीक काढणीला आले असताना गाराचा पाऊस झाल्याने हरबऱ्याचे गाठे शेतातच गळून पडले आहे. आधीच सोयाबीन पिकावरील येलो मोझ्याक रोगाची मदत मिळाली नाही, पीक विमा मिळाला नाही तर काहींना जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या रक्कमाच खात्यावर आल्या नाही, अशा परिस्थितीत गार पिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अद्याप कुठलाही कर्मचारी पंचनामे करायला गावात आले नसल्याने शेतकऱ्यांनी…

Read More

आचार्य विनोबा भावे गुरुदेव सेवा मंडळाचे आयोजन पुरुष, महिला व बाल भजन मंडळांना स्वतंत्र पुरस्कार वर्धा  : आचार्य विनोबा भावे श्रीगुरुदेव सेवा भजन मंडळाद्वारे सावंगी मेघे येथे दि. ९, १० व ११ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवांतर्गत विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष, महिला व बाल अशा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सावंगी टी पॉईंटजवळील साईबाबा मंदिर परिसरात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दि. ९ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित असून या कार्यक्रमाला दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, समाजसेवी मोहन अग्रवाल, सुनील बुरांडे, सुधीर…

Read More

जिल्हा सहसचिव पदी सुचिता सातपुते वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात महिला काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्षपदी शितल तिवारी, जिल्हा सहसचिव पदी सुचिता सातपुते, हिंगणघाट विधानसभा उपाध्यक्षपदी विद्या गिरी, शहर उपाध्यक्षपदी दिपाली रंगारी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यावेळी उपस्थित होते.  याशिवाय शहर सरचिटणीस पदी सविता गिरी, शहर पश्चिम उपाध्यक्ष अंकिता गहलोत, शहर सचिवपदी सोनल बाभुलकर, शहर सह सरचिटणीसपदी निता मेश्राम, कार्यकारी सदस्य सुवर्णा पेंदाम, पूजा कांबळे, मिनल मुन यांची नियुक्ती करण्यात आली.  शरद पवार गटाचे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या…

Read More

कापसाचे भाव घसरवण्यास जबाबदार कोण?  शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांशी वाद; दोन दिवसासाठी देवळी बाजार समिती बंद वर्धा: शासनाने हमीभाव ठरवून दिले असतानाही खरेदी ही हमीभावापेक्षाही कमी दरात केली जात आहे. व्यापाऱ्यांकडून तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला गेला. त्यामुळे देवळी येथील कृषी उत्पन्न समितीच्या यार्डात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मंगळवारी शाब्दिक वाद उफाळला होता. काही काळ लिलाव बंद राहिले, व्यापाऱ्यांची अडचण निर्माण होत असल्याने दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीमध्ये कापूस खरेदी शक्य नसल्याने गुणवत्तेच्या आधारावर देवळी कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआय खरेदी दरम्यान जाचक अटी लादल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला गेला.…

Read More

भागवत सप्ताहातून समाज प्रबोधन व्यसनाधीनता रोखण्यासाठी गावागावात जागृती गुरुशिष्य परंपरेला जपण्याचा गुल्हाने परिवाराने घेतला ध्यास आत्महत्येपेक्षा अध्यात्मातून आत्मशुद्धी महत्वाची – हभप खोडे महाराज वर्धा : आम्ही गावा गावात भागवत कथा करतो, भागवतामधून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यसनाधीनतेमुळे गावात आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे, यासाठी प्रबोधन हा महत्वाचा मार्ग आहे. आम्ही अनेकांना भागवत सप्ताहात येण्याचे आवाहन करतो, भागवत सप्ताहात श्रवण केलेल्या ज्ञानातून युवक व्यसना सारख्या दुर्धर आजारापासून परावृत्त होत आहे. आत्महत्या करून जीवन संपविण्यापेक्षा आत्मशुद्धी करून विचारात परिवर्तन करण्याची गरज आहे, तेच आम्ही भागवत सप्ताहाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यात महेश गुल्हाने यांच्यासारख्या समाजसेवकाचा देखील सिहाचा वाटा आहे.…

Read More

कामगारांचे नेते डॉ. उमेश वावरे यांच्या प्रयत्नांना यश आर्थिक मदतीसाठी बी आर एस कडून करण्यात आला होता पाठपुरावा वर्धा : हिंगणघाट च्या गिमाटेक्स्ट कंपनीत अचानक झालेल्या स्फोटात वणी येथील प्रमोद फुलझेले हे कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर त्यांना त्वरित सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे मदतीची मागणी रेटून धरली होती. कंपनी व्यवस्थापनाशी बैठकी करून सदर मागणीवर विचार करण्यात आला.  आर्थिक मदतीसह कुटुंबाला पेन्शन देण्याची मदतीची मागणी यावेळी रेटून धरण्यात आली. अखेर उमेश वावरे यांच्या प्रयत्नाला यश आले. मृतकाच्या वारसाला स्थायी नोकरी, पत्नीला…

Read More

593 हेक्टर तुती लागवडीसाठी 550 शेतकऱ्यांची नोंदणी वर्धा (ब्युरो) : रेशीम शेती कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती आहे. या शेतीकडे अधिकाधिक शेतकऱ्यांनी वळावे यासाठी राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्याने उत्तम काम केले आहे. अभियान कालावधीत 593 हेक्टर तुती लागवडीसाठी 550 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून विभागात ही सर्वाधिक नोंदणी आहे. पारंपारिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी इतर पिके सुध्दा घ्यावी, यासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने प्रयत्न केले जात आहे. रेशीम कोष उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी मनरेगा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 योजनेंतर्गत जमीन तयार करणे, तुती रोपे लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, ठिंबक सिंचन व पाणी…

Read More

भारतरत्न पुरस्काराबद्दल ज्येष्ठ नेते यांचे अभिनंदन मुंबई (ब्युरो) : उत्कृष्ट संसदपटू… समाजकारणातील समर्पित नेतृत्व असणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात भारताचे उपपंतप्रधान, गृहमंत्री म्हणून लालकृष्ण अडवाणी यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या हिताच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत बेधडक आणि ठामपणे आपली मते मांडली. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. असेही म्हटले आहे.

Read More

विदर्भातील सात जिल्ह्यात फिरणार ओबीसी जनगणना संकल्प यात्रा वर्धा :  ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी जनगणना संकल्प यात्रा वर्ध्याच्या सेवाग्राम येथून प्रारंभ झाली आहे. दहा दिवस एक हजार किलोमीटरचा प्रवास करत ओबीसी जनगणना यात्रा सात जिल्ह्यात पोहचणार आहे. गावागावात कॉर्नर सभा घेऊन  ओबीसींना  जागृत केले जात आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी ओबीसी समाज तसेच शासनाला अवगत करण्याच्या उद्देशाने ओबीसी जनगणना संकल्प यात्रा गावागावात पोहचत आहे. उमेश कोराम यांच्या नेतृत्वात ओबीसी युवा अधिकार मंच आणि संघर्ष वाहिनीच्या प्रयत्नात ही यात्रा पुढे सरकत आहे. बिहार राज्याच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना महाराष्ट्र राज्यात व्हावी यासाठी…

Read More

ओबीसी जनगणना यात्रा शनिवारी वर्धा : ओबीसींची जनगणना व्हावी यासाठी ओबीसी युवा अधिकार मंचाकडून विदर्भातील सात जिल्ह्यात ओबीसी जनगणना यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात वर्ध्याच्या सेवाग्राम येथील बापू कुटी येथून होणार असून 1 हजार किलोमीटर ची ही यात्रा आहे. सात जिल्ह्याच्या 200 गावातून ही यात्रा जाणार आहे. याची सुरवात शनिवारी सकाळी सेवाग्राम येथून होणार आहे.ओबीसी युवा अधिकार मंचाकडून विदर्भातील सात जिल्ह्यात ओबीसी जनगणना यात्रा काढण्यात येणार आहे.  बिहार राज्याच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना महाराष्ट्र राज्यात व्हावी यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसींची देखील जनगणना व्हावी या मागणीसाठी ही यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती  यात्रा संयोजक उमेश कोराम…

Read More