Author: breakingvidarbha

वर्धा – भारतीय लोकशाही मोर्चा वर्धा द्वारा आयोजित संविधान सन्मान पदयात्रेचे खरांगणाच्या स्वावलंबी विद्यालयात सोमवारी सकाळी आगमन झाले. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजवून सांगताना निखिल जवादे म्हणाले कि संविधान नीट समजून घेतले तरच स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ येईल. ” देश ना राजाचा ना एका धर्माचा, आता हा सर्वांचा सर्वांसाठी” म्हणून भारताचा प्राण आहे संविधान या कथनाचे महत्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे त्यांनी आवाहन केले. सेवाग्राम ते आष्टी या टप्याचे संयोजक अतुल शर्मा यांनी यात्रेची संकल्पना समजवून सांगितली.या प्रसंगी सरपंच निर्मलाताई अक्कलवार यांनी मूलभूत कर्तव्यांचे वाचन केले. कार्यक्रमाला उपसरपंच राजू अवथळे, ग्राम पंचायत सदस्य अनिताताई, इंदूताई आणि विनोद भाऊ तसेच शाळेचे…

Read More

वर्धा – नागपूर येथून खाजगी ट्रॅव्हल्सने वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव फाट्यावर गांजा आणणाऱ्या दोन आरोपींना समुद्रपूर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पोलिसांनी कारवाईत तीन किलो गांजा जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार नागपूर येथून ट्रॅव्हल्सने शेडगाव चौरस्ता येथे गांजा आणला जात असल्याची गुप्त माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली. समुद्रपूर पोलिसांनी सापळा रचून सदर घटनेवर नजर ठेवली. गुन्हे शोध पथकाचे पो. हवालदार अरविंद येनुरकर यांना रविंद्र मोहिते व शोभा जाधव असे दोघेही संगणमताने नागपुर येथुन खाजगी ट्रॅव्हल्सने समुद्रपुर येथे राहणारा करण खुरपडे नावाच्या ईसमास गांजा अमली पदार्थ देण्याकरीता मौजा शेडगाव चौरस्ता येथे येणार आहे. अशा खबरेवरून त्यांचेवर एन.डी.पी.एस. ॲक्ट अन्वये कार्यवाही करण्यासाठी पथक…

Read More

हिंगणघाट – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व अनिकेत कांबळे यांनी संविधान दिना निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती हार घालून अभिवादन केले. भारतीय सविधानाने स्वातंत्र्य ,समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्य प्रदान केली.या मूल्याची जपवणूक करत समाजातील उत्कर्षासाठी कटीबद्ध राहण्याचा निश्चय करू असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.तसेच कार्यक्रम स्थळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित फोटो प्रदर्शनीला भेट दिली. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत कांबळे, नितीन भुते, किशोर चांभारे, गजू महाकाळकर,अजय परबत,राहुल जाधव, सुशील घोडे, प्रशांत मेश्राम,पंकज…

Read More

वर्धा (प्रतिनिधी) –  नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून “वॉक फॉर कॉन्स्टिट्युशन” संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून सहायक आयुक्त पी.जी. कुलकर्णी यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, समाज कल्याणचे विशेष अधिकारी अनिल वाळके, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिनेश बारई, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंदू पोपटकर, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. लोकेश नंदेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. मिलींद सवाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचे मुख्याध्यापक रमेश अजमिरे, गृहपाल वाडेकर, सुजाता पाटील…

Read More

वर्धा – वंचितांना सन्मानाने जगण्याचा हक्क देण्यासाठी राष्ट्रनिर्मात्यांनी विचारपूर्वक निर्धारानी विधान तयार केला. हे करतांना प्रस्थापितांचा परंपरेने आलेल्या विषम आर्थिक व्यवस्था जाणिवपूर्वक तोडून समतेच्या दिशेने नियोजन केले. राजकीय ,आर्थिक आणि सामाजिक समतेतून देश बळकट होईल असे स्वप्न पाहिले,असे ऍड.अशोक पावडे यांनी सांगितले.भारतीय लोकशाही मोर्चा वर्धाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान पदयात्रेच्या दहाव्या टप्याच्या सुरवातीला नई तालीम परिसरात ते संबोधित करीत होते. सेवाग्राम येथून विविध दहा टप्प्यात ही संविधान यात्रा सर्वत्र पोहचली. गेल्या महिनाभरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात आली. पुढे बोलताना पावडे म्हणाले, देशाच्या धर्मनिरपेक्ष, समाजवादी संरचनेसाठी देशाच्या प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंच्या महत्वाच्या योगदानाचा उल्लेख करून आज प्रस्थापितांपासूनच संविधान वाचण्याचे मोठेच आव्हान देशाच्या सर्वसामान्यासमोर…

Read More

शेगाव, 18 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद उफाळला आहे. मनसेसह भाजपच्या अनेक नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला जात होता. दरम्यान आज शेगावमध्ये त्यांच्या जोडो भारत यात्रेचं शेवटचं भाषण होतं. यावेळी ते सावरकरांबद्दल काही बोलणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. दरम्यान यावेळी त्यांनी सावरकरांबद्दल काहीही बोलणं टाळलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात सावरकरांचा उल्लेख केलेला नाही. मात्र यंदा त्यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. काय म्हणाले राहुल गांधी?  शिवाजी महाराजांबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला रस्ता दाखवला. ते शिवाजी महाराज बनले यामागे त्यांच्या आई जिजामातांचा…

Read More

आरोपी आफताबनं गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या केल्याची कबुली तर दिली आहे. मात्र, तोच खुनी असल्याचं सिद्ध करणं, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. यासाठी काही व्यक्ती पोलिसांना मदत करू शकताLAST UPDATED : NOVEMBER 18, 2022, 11:01 ISTDELHI, INDIAनवी दिल्ली 18 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक भयानक हत्याकांड उघडकीस आलं आहे. आफताब पूनावाला नावाच्या व्यक्तीनं आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची भयानक घटना समोर आली आहे. श्रद्धाच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची कसून चौकशी सुरू आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबनं तिच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. पोलीस मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी जंगलात फिरत…

Read More

Rohit Sharma BCCI : भारतीय संघाचे टी-20 विश्‍वकरंडकातील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आणि 2013 नंतर आयसीसी करंडक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले. या अपयशानंतर बीसीसीआयने शुक्रवारी निवड समिती सदस्यांना डच्चू दिला आहे. तसेच नव्या नियुक्तीसाठी अर्जही मागवले आहेत. भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत टी-20 विश्वचषक-2022 मध्ये खेळला आणि उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला होता.

Read More

वर्धा – माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीनुसार मुंबई मंत्रालयात दिव्यांग मंत्रालय सुरू होत असल्याने वर्ध्यात प्रहार कडून आंबेडकर चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दोन दिवसा पूर्वी बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई मंत्रालय येथे याबाबत बैठक पार पडली. यात दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयची मान्यता मुख्यमंत्री यांनी दिली. येत्या 3 डिसेंबर ला जागतिक दिव्यांग दिनी याची घोषणा करण्यात येणार आहे. देशात महाराष्ट्र प्रथम राज्य आहे की जिथे हे स्वतंत्र खात होणार आहे. त्याचाच आनंद म्हणून ढोल ताशा च्या गजरात मिठाई खाऊन हा आनंद एकत्रितपणे साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांति आंदोलनचे विदर्भ प्रमुख हनुमंतराव झोटिंग,जिल्हा प्रमुख प्रमोद कुरटकर,हरिभाऊ…

Read More