Author: breakingvidarbha

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणाच्या मुद्रकांची उपस्थिती वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशनचे आयोजन वर्धा : वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशनद्वारे वर्धा प्रिंट एक्सपो 2024 चे आयोजन सेवाग्राम स्थित चरखा घरात करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष जयवीर सिंह, महाराष्ट्र मुद्रण परिषदचे अध्यक्ष बालासाहेब आम्बेकर, रीसो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष रणजीत कदीरू, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे उपाध्यक्ष संजय घटवई, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे अध्यक्ष तुषारजी धोटे, स्क्रीन प्रिंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव जिग्नेश लापासिया हे  उपस्थित होते. वर्धा जिल्हा मुद्रक संघटनेद्वारे  यावर्षीचे हे दुसरे आयोजन होते, यात सुमारे ६० स्टॉल्स ठेवण्यात आले. यात सॉफ्टवेअर, कलर प्रिंटर, लेझर प्रिंटर,…

Read More

 ट्रॅव्हल्स पलटल्याने एका विद्यर्थिनीचा मृत्यू तब्बल 52 विद्यार्थी प्रवास करीत असल्याची माहिती वर्धा : नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी – पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये ज्युनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन वर्ध्यातून परत नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला अपघात झालाय. येथे जंगल घाटामध्ये ट्रॅव्हल्स पलटी झाली आहे. यात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहे. ट्रॅव्हल्समध्ये 52 विद्यार्थी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. यातील विद्यार्थी हे सरस्वती विद्यालय नागपूर येथील असल्याची माहिती आहे. वर्ध्यात ट्रेंनिग साठी हे विद्यार्थी आले होते. चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे.

Read More

विविध सभांमध्ये आरोप प्रत्यारोप; अखेर कौल कुणाला वर्धा :  वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी झालेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सभा लक्षणीय ठरल्या आहे. कुठे भाजपच्या नेत्यांच्या सभा गाजल्या तर कुठे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा आकर्षण ठरल्या आहे. शरद पवार, नितीन गडकरी यांच्या सभा गाजल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली. आता प्रचार तोफा थंडावल्या आहे, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत कौल कुणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, वर्धा आणि देवळी या चार विधानसभा क्षेत्रात निवडणूक ज्वर हा अखेरच्या टप्प्यात दिसून आला. देवळी विधानसभा क्षेत्रात पुलगाव चित्रा वाघ यांची पदयात्रा, हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल वंदिले यांनी…

Read More

जवळपास दीड कोटींचे नुकसान वर्धा : वर्धा शहरातील पावडे चौक येथे असलेल्या एस मार्ट  मॉल आणि टायरच्या दुकानाला आग लागली आहे. एस मार्ट या मॉलच्या खाली तळघरात असलेल्या टायरच्या मोठ्या शो रूम  दुकानाला शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या  सुमारास अचानक आग लागली.  टायरच्या दुकानाला लागलेली आग सर्वत्र पसरली. टायर सतत जळत राहिले सोबतच एस मार्ट मध्ये असलेले तेलाचे पिंप देखील मोठ्या संख्येत जळाल्याने आग विझविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.  सकाळी 8 वाजता लागलेली आग सायंकाळी 4 वाजेपर्यंत धगधगत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी 60 ते 70 गाड्या पाण्याचा मारा केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली…

Read More

पक्षिनिरीक्षण मानवी जीवन उन्नत करणारे – जितीन रहमान शहरपक्षी फलक अनावरण – पक्षिचित्र प्रदर्शनीला प्रतिसाद वर्धा – आपल्या परिसरात असलेला पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला आनंद देतो. त्यातच पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर त्यातून आपले व्यक्तिमत्व अधिक प्रसन्न आणि उन्नत होत जाते, असे उद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी पक्षी सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. बहार नेचर फाउंडेशन, वनविभाग आणि बोर व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सप्ताहाचे उद्घाटन पक्ष्यांच्या सान्निध्यात शहरपक्षी नीलपंखाच्या फलक अनावरणाने करण्यात आले. बोर व्याघ्र प्रकल्प उपसंचालक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या उद्घाटन समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे उपवनसंरक्षक हरवीर सिंह लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहार…

Read More

पांधन रस्ते शोधू कुठे? वर्धा –  वर्धा जिल्ह्यातील वर्धा विधानसभा मतदार संघ हा पारंपारिक काँग्रेसचा मतदार संघ आहे. याठिकाणी पाहिले तर काँग्रेसचे स्वर्गीय प्रमोडबाबू शेंडे यांनी अनेक वर्षे सत्ता भोगली आहे. त्यांच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर येथील जनता प्रमोद शेंडे यांच्या पाठीशी या भागातील मतदार खंबीरपणे उभे राहत असल्याचे पाहायला मिळत होते. वर्धा विधानसभा क्षेत्रात वर्धा आणि सेलू हे दोन तालुके येतात. ग्रामीण भागातील रस्ते आणि पांधण रस्ते यासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सर्वाधिक भर राहत होता. प्रमोद शेंडे यांनी शेतशिवारात जाणारे पांधण रस्ते बांधण्यावर भर दिला. त्यामुळेच आजही ग्रामीण भागात थोडेफार रस्ते पाहायला मिळतात. गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी नेमके पांधण रस्ते…

Read More

आर्वी शहरात रॅली काढून करण्यात आले शक्ति प्रदर्शन वर्धा : आर्वी मतदार संघात भाजपचे  विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारल्याने दादाराव केचे अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आर्वी शहरात रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.मोठ्या संख्येत नागरिक येथे सहभागी झाले. भाजपने केचे यांना उमेदवारी नाकारत सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. दादाराव केचे यांच्या बंडखोरीमुळे आता आर्वी विधनसभेत नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात दादाराव केचे हे दोनदा भाजपच्या तिकिटावर निवडून आले. भाजपने यावेळी उमेदवार बदलविला आणि सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप आर्वी येथे…

Read More

सोमवारी 23 उमेदवारांनी 35 नामनिर्देशनपत्र केले दाखल आर्वी चार, देवळी आठ, हिंगणघाट चार व वर्धा येथे सात अर्ज दाखल वर्धा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा या विधानसभा मतदारसंघातून 23 नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले.  उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये आर्वी विधानसभा मतदार संघात माधुरी अरविंद सुरोशे (अपक्ष) एक अर्ज, सचिन युवराज मानमोडे (अपक्ष) एक अर्ज, दादाराव यादवराव केचे (भाजपा) दोन अर्ज व (अपक्ष) एक अर्ज असे एकुण तीन अर्ज, कमलेश धनराज कामडी (अपक्ष) एक अर्ज दाखल केला. देवळी विधानसभा मतदारसंघात राजेश बकाने (भारतीय जनता पार्टी) यांनी एक अर्ज, निलेश सुभाषराव मसराम (गोंडवाना गणतंत्र…

Read More

खुल्या कराटे स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचा गुणगौरव वर्धा : कधी नव्हे ते खेळाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने नेत्रदीपक कामगिरी केल्याचे अलीकडे आढळून येत आहे.  सर्व स्तरातून खेळांना शासन व सामाजिक स्तरावर प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा अनेक संस्था या कार्यात अग्रेसर आहेत. वर्धा जिल्ह्यात स्पोर्ट कराटे असोसिएशन ही संस्था सुद्धा कराटेच्या क्षेत्रातील खेळाडूसाठी एक अशास्थान बनले असून केवळ यशस्वी कराटेपटू घडवणे हेच या संस्थेचे ध्येय नसून एक उत्कृष्ट नागरिक म्हणून उमलत्या पिढीला मार्गदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. असे विचार स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धेचे संरक्षक इमरान राही यांनी व्यक्त केले. ते नुकतेच वर्धा येथील संपन्न झालेल्या…

Read More

सावंगी मेघे रुग्णालयात महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया वर्धा – धारदार काचेमुळे हाताच्या नसा पूर्णतः कापल्या गेल्याने तरुणाचा हात कापण्याशिवाय पर्याय नसताना केवळ मायक्रोव्हस्क्युलर प्लास्टिक सर्जरीव्दारे रुग्णाला अपंगत्वापासून वाचविणारी शस्त्रक्रिया सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. यवत‌माळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी शांती चोटपेल्लीवार (३५) हा दुकानात साफसफाई करत असताना अचानक काच फुटून त्या काचेचा मोठा तुकडा त्याच्या उजव्या हातात घुसला. त्या धारदार काचेमुळे शांतीच्या हाताच्या रक्तवाहिन्या कापल्या गेल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो बेशुद्धावस्थेत गेला. या आकस्मिक प्रसंगामुळे घरातील सर्व सदस्य घाबरले. पांढरकवडा येथील माजी नगराध्यक्ष श्री. नहाने व सामाजिक कार्यकर्ते सोनू उप्पलवार यांनी चोटपेल्लीवार कुटुंबियांची भेट घेऊन…

Read More