Author: breakingvidarbha

हिंगणघाट येथील  स्वीमिंग पूल येथील घटना हिंगणघाट :  वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील मोहता स्वीमिंग पूल  येथे 15 वर्षीय बालकाचा जलतरण तलावात पाण्यात बुडून मृत्यू झालाय.रेहान मेहनुद्दीन चौधरी असं मृत बालकाच नाव आहे.नवव्या वर्गात शिकणारा रेहान हा सायंकाळी आईसोबत स्विमिंग शिकायला हिंगणघाटच्या जलतरण तलाव येथे गेलाय. त्याचा स्विमिंगचा पहिलाच दिवस होता. या जलतरण तलावात असलेले पाणी हिरवे होते, त्यामुळे बुडालेल्या मुलाला शोधणे देखील कठीण झाले. मूळचे उत्तर प्रदेश येथील चौधरी कुटुंब तीन वर्षापासून हिंगणघाट शहरात राहायला आले आहे. मुजुमदार वॉर्ड येथे राहणाऱ्या रेहान चौधरी याच्या वडिलांचा येथे बेकरीचा व्यवसाय आहे. स्विमिंग शिकण्याची मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आई वडिलांनी धडपड केली. हिंगणघाट…

Read More

वि.सा. संघ आयोजित मुशायऱ्याला साहित्यप्रेमींची दाद सगळ्याच गजला या नसे लोकाश्रयासाठी… वर्धा : मरणापेक्षा मोठी हानी असते का हो, अश्रूंपेक्षा किमती पाणी असते का हो, झाले मजला प्रेम कधी हे पत्ता नाही, खबर एवढी कानोकानी असते का हो?’ ……’तशा सगळ्याच गजला या नसे लोकाश्रयासाठी, कुणाचा सूर आनंदी, कुणाचे दुःख बडबडते’ असे गझलकाराचे अंतरंग उलगडणारा बहारदार मराठी मुशायरा विदर्भ साहित्य संघ शाखेद्वारे स्थानिक रॉयल हेरिटेज येथे सादर झाला. कौटुंबिक वातावरणात रंगत गेलेल्या या मैफलीतील वैदर्भीय गझलकारांना वर्धेकर रसिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. वि.सा. संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांच्या निवासस्थानी आयोजित या गझल मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम गझलकार नितीन देशमुख (अमरावती) होते. मैफलीचे…

Read More

जखमी मध्ये चार लहान मुलांचा समावेश वर्धा : सेलू नजीकच्या चौकी येथील बृहस्पती मंदिराचे दर्शन करून अजनसरा येथे जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सची धडक वर्ध्याहून नागपूरला जाणाऱ्या एस टी बसला लागली. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहे. ही घटना केळझर येथील शहीद चौक येथे बुधवारी सकाळी घडली. ट्रॅव्हल्स ही नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथील प्रवासी घेऊन चौकी मार्गे आजनसरा येथे निघाली होती, केळझर मार्गे जात असलेल्या ट्रॅव्हल्सची केळझर येथे बसला धडक बसली. ट्रॅव्हल्स मधील  12 प्रवासी जखमी तर बसमधील चालकासह 4 प्रवासी जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमी मध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.जखमीना सेलू आणि सेवाग्राम येथील…

Read More

पाणस्थळावर वन्यजीव निरीक्षणासाठी मचाणी तयार वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प निसर्गानुभव उपक्रमासाठी सज्ज झाला असून वन्यजीव निरीक्षणासाठी अभ्यासक व निसर्गप्रेमी नागरिकांकरिता विविध पाणस्थळांवर तयार करण्यात आलेल्या मचाणींची बांधणी पूर्ण झाली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात दिवसा आणि रात्री निसर्गानुभव घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना बुधवार, दि. २२ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात उपस्थित रहायचे आहे. या उपक्रमासाठी जुने व नवीन वनक्षेत्र तसेच हिंगणी, बांगडापूर व कवडस बफर या वनपरिक्षेत्रात नैसर्गिक पाणस्थळे तसेच कृत्रिम पाणवठ्यांजवळ ३५ मचाणी निर्माण करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी न केलेल्या निसर्गप्रेमी नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होता यावे यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत बोर येथील कार्यालयात…

Read More

वर्ध्यात आंबा महोत्सव वर्धा : पारंपरिक पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळले पाहिजे. गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंबा फळबागेची लागवड केल्यास बाजारपेठ, तांत्रिक सहाय्य, निर्यात आदी सहज उपलब्ध होईल. जिल्ह्यातील हवामान आंबा पिकाच्या फळबागेसाठी अनुकूल असून योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा फळबाग शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात एक दिवसीय आंबा महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते, या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, कृषि विभागीय सहसंचालक शंकरराव तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, आत्मा…

Read More

ग्रामीण भागातील स्त्रियांनाही मिळतो आहे लाभ सावंगी मेघे रुग्णालयात पहिली रोबोटिक हिस्टेरेक्टॉमी वर्धा : रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणजेच रोबोटिक उपकरणांच्या सहाय्याने पहिली हिस्टेरेक्टॉमी शस्त्रक्रिया सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. महानगरांमधील अत्याधुनिक रोबोटिक असिस्टेड हिस्टेरेक्टॉमी उपचार आता सावंगी रुग्णालयात उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील स्त्रियांनाही त्याचा लाभ घेता येतो आहे. देवळी तालुक्यातील भिडी येथील रहिवासी हेमलता भगत (६२) या बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीमुळे त्रस्त होत्या. त्यांना गंभीर दुखण्यामुळे सावंगी मेघे रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात भरती करण्यात आले. रुग्णाची सोनोग्राफी केली असता गर्भपिशवीत लहान आकाराच्या गाठी आढळून आल्या. त्यामुळे मेनोरॅजिया म्हणजेच गर्भपिशवीतून अतिरक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. संपूर्ण वैद्यकीय…

Read More

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव चौरस्त्यावर नियमित अपघाताचे सत्र सुरु असतांना याकडे संबंधितांकडून गांभीर्याने दखल घेतली जातं नसल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात आहे. मंगळवारी 7 मे रोजी सकाळच्या सुमारास एका ट्रॅकने दुचाकीला 20 फूट लांब फरफटत नेले. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. यावेळी अर्धा तास रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. कासवगतीने सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे रस्त्याच्या कडेच्या दोन्ही बाजू अरुंद आहे. त्यामुळे रस्त्याने वाहने नेतांना नियमित अपघात घडत आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास  ट्रकने जुपिटर गाडीला धडक दिली. जुपिटर वरील गाडीस्वाराला वीस फुटापर्यंत फरपटत नेले होते. यात दुचाकी चालक प्रविण डुकरे रा. शेडगाव हा गंभिर…

Read More

धावडी शिवारात घटना; शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान वर्धा : कारंजा  तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी मोतीराम गवारले यांचे शेत धावडी शिवारात आहे. बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास शेतात कोणी नसताना  अचानक गोठ्याला आग लागली या आगीत गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. मोतीराम गवारले यांना दोन मुली असून दोन्ही मुलांच्या शेतातील साहित्य या गोठ्यात ठेव ले होते आवडी येथील नागरिकांना गोठ्याला आग लागल्याची माहिती होतात शेतकरी मोतीराम गवारले यांना गावातील नागरिकांनी गोठ्याला आग लागली असल्याची माहिती देण्यात आली. आगीचे रौद्ररूप घेत गोठ्याला आगीने आपल्या कवेत घेतले , शेती उपयोगी साहित्य मोटार पंप स्प्रिंकलर शेती उपयोगी रासायनिक खत शेतीला लागणारे साहित्य यामध्ये आठ…

Read More

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण –  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले वर्धा : महाराष्ट्र ही समाजसुधारकांची व शूरवीरांची भूमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन अनेक समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केली असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा क्रिडा संकुल, वर्धा येथील मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना  कर्डीले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर…

Read More

अमित शहा यांच्या घरणेशाहीच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचे सडेतोड उत्तर वर्धा : अमित शहा हे आमच्या घरणेशाहीवर बोलतात, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून आम्ही युती केली,अशी टीका ते करतात, पण अमित शहा यांनी समजून घ्यावे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला यांच्या आशीर्वादाची गरज नाही आहे. मुख्यमंत्री पद म्हणजे काही क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्षपद नाही, ते काही जनतेतून निवडूण येत नाही. म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. या हिंगणघाट येथील टाका मैदानावर झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, आपचे खासदार संजय सिंह, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि भारत आघाडीचे स्थानिक नेते मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना…

Read More