Author: breakingvidarbha

देशी वाणाच्या संरक्षणासाठी बिजोत्सव सेवाग्रामच्या बिजोत्सवात नऊ राज्यातून शेतकरी प्रतिनिधी दाखल वर्धा : जे पेरलं जातं तेच उगवतं… आणि त्यामुळेच चांगले पेराल तरच चांगलं उगवेल हे सत्य नाकारता येत नाही. उन्हाळा ,हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत लागणाऱ्या देशी बियांचे ऋतुचक्र माहीत असणे तेवढेच आवश्यक आहे. पालेभाज्या , तृणधान्य, कडधान्य आणि वनस्पतीच्या देशी बियाण्यासाठी ऋतुचक्राची ओळख सध्या सेवाग्राम येथील शांती भवनात करून दिली जाते आहे. हेच ऋतुचक्र अनुभवायचं असेल तर मग सेवाग्राम गाठावे लागेल. येथील ऋतुचक्राची काढण्यात आलेली रांगोळी आकर्षण ठरते आहे, त्यामुळेच येथे पोहचलेल्यांना या ऋतुचक्राला आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यात अथवा सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम परिसरातील…

Read More

सोनेगाव रेती घाटातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई बोटीच्या साहाय्याने सुरू होते उत्खनन वर्धा :  देवळी तालुक्यात येणाऱ्या चना टाकळी येथे सोनेगाव बाई घाटामधून रात्री अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार टिप्पर, एक ट्रक, दोन ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलँड आणि इलेक्ट्रिक बोट जप्त करण्यात आली आहे. दोन कोटींपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तब्बल 21 जाणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी शुक्रवारी मध्यरात्रीत संयुक्त धाड टाकत ही कारवाई केली आहे. सोनेगाव बाई येथे घाटावरून रेती उत्खनन केल्यावर ती रेती डेपो…

Read More

कारंजा येथे अपघातात एक ठार , तिघे जखमी बाजार समितीचे सभापती राजेंद्र खवशी गंभीर जखमी वर्धा : कारंजा घाडगे येथे नागपूर अमरावती महामार्गवर आज सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान दुचाकीला ओव्हरटेक करताना कारचा व दुचाकींचा अपघात घडला.अपघात इतका भयंकर होता की दुचाकीला काही अंतरावर घासत नेले. कारचा टायर फुटल्याने कार पलटी झाली.यात दुचाकीवरील राजू किंनकर व सभापती राजेंद्र खवशी गंभीर जखमी झाले. यात कार पलटी झाल्याने त्यातील महिला व पुरुष जखमी झाले आहेय.त्यांचे नाव कळू शकले नसले तरी त्यांना तात्काळ नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.दुचाकीवरील राजू किंनकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र खवशी यांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

Read More

दोन एप्रिल रोजी अमर काळे भरणार उमेदवारी अर्ज का निवडली दोन एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख? वर्धा : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. ही म्हण सर्वच मानव प्राण्याला लागू आहे. देशात आईचा आशीर्वाद घेत येत्या लोकशाहीच्या उत्सवात अनेक उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. आईचा आशीर्वाद घेत अमर काळे हे देखील उमेदवारी अर्ज भरू शकतात… त्यासाठीच दोन एप्रिल ही तारीख त्यांच्यासाठी योग्य मानली जात आहे. आर्वी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी मिळणार ही शक्यता केवळ शक्यताच आजवर राहिली होती. अमर काळे यांनी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले होते. पण इच्छुकांच्या नाराज्या आणि अधांतरी असलेले उमेदवारीचे आश्वासन या बाबी…

Read More

काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश वर्धा : काँग्रेसचे माजी आमदार आर्वी येथील अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश झाला आहे. आज सायंकाळी झालेल्या बैठकीत हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, अनिल देशमुख हे उपस्थित होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या हस्ते दुपट्टा खांद्यावर घालत  प्रवेश करण्यात आला. तुतारीच्या चिन्हावर माजी आमदार अमर काळे  वर्धा लोकसभेच्या जागेवर लढणार आहे. 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत यांनी दिली आहे. सिल्व्हर ओक येथे पक्ष प्रवेश कार्यक्रमात वर्ध्यातील स्थानिक राष्ट्रवादी…

Read More

जिल्ह्यातील 1 लाख 4 हजार विद्यार्थ्यांनी लिहिले नातेवाईकांना पत्र मतदार जागृती साठी शाळकरी विद्यार्थ्यांचा पुढाकार वर्धा : लोकशाहीच्या उत्सवात मतदान करा!  आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराच्या बाहेर पडण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पत्रातून आई वडील ,दादा ताई यांना भावनिक साद घातली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना व नातेवाईकांना तसे पत्रच लिहिले आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या 1 लाख 4 हजार 634 विद्यार्थ्यांनी नातेवाईकांना स्वत:च्या हस्त अक्षरात पत्र लिहिले असून त्यावरती पालकांची स्वाक्षरी घेवून…

Read More

महात्मा गांधींच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पोहचला आर्वीचा टिटू मोटवानी अन खासदार बनून करणार मच्छरांचा नायनाट  शेतकऱ्यांच्या समस्यांसह बेरोजगारांच्या समस्यांकडे वेधले गांधींच्या वेशभूषेतल्या टीटूनी लक्ष गांधींच्या वेषभूशेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचत घेतला उमेदवारी अर्ज आर्वीच्या गांधी प्रकाश उर्फ टिटू मोटवानी याने वेधले सर्वांचे लक्ष निवडून आल्यास तीन वर्षात करणार मच्छरांचा नायनाट – उमेदवारी साठी नागरिकांकडून जुळवली राशी वर्धा : सामान्य माणसांचे प्रश्न आणि वेगवेगळ्या समस्या निवडणूकीचे मुद्दे ठरतात. पण महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या वर्धा जिल्ह्यात गांधींच्या वेशभूषेत लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी चक्क गांधींच्या वेषभुशेत आर्वीचा गांधी म्हणून ओळख असलेला प्रकाश उर्फ टिटू मोटवानी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर पोहचलाय. उमेदवारी…

Read More

 उमेदवारी अर्ज भरायला होणार सुरुवात वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार उद्या गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत उपस्थित होते. यावेळी श्री. कर्डिले म्हणाले की, 08 वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सेवाग्राम रोड, सिव्हील लाईन्स वर्धा येथे दिनांक 28 मार्च 2024 पासून 4 एप्रिल 2024 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी नामनिर्देशन पत्र मिळतील व स्वीकारले…

Read More

निवडणूक विषयक  प्रशिक्षण आज  8683 अधिकारी, कर्मचारी घेणार प्रशिक्षण वर्धा :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पुर्वतयारीला वेग आला असून  निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दि. 27 मार्च रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात दि. 27 मार्च रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये आर्वी विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्वी येथील गांधी विद्यालय व रोशन सेलिब्रेशन हॉल, देवळी विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे देवळी येथील भोंग सभागृह व जनता विद्यालय, हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हिंगणघाट येथील बिडकर कॉलेज व फक्त वर्धा विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन दिवस दोन टप्प्यात…

Read More

पडलेल्या दुचाकीस्वाराला उचलायला जाणाऱ्याना टिप्परने चिरडले तीन ठार; तर दोन गंभीर जखमी दुचाकीवरून पडलेल्याला वाचवायला धावले पण स्वतःच अपघाताला बळी पडले विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी वर्धा(ब्युरो):  वडनेर नजीकच्या मानकापूर चौरस्त्यावर गंभीर अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या नादुरुस्त टिप्परला धडकलेल्या दुचाकीवरील एकाला उचलण्यासाठी पोहचलेल्या कार चालक व बाईक स्वाराला मागावून वेगात येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. मानकापूर जवळ वडनेर पासून अडीच किमी अंतरावर हा अपघात घडला. वडनेर शिरसगाव रोडवर सुरकार यांचे शेताजवळ एक टिप्पर सकाळपासूनच उभा होता.या उभ्या टिप्परला एक मोटर सायकलस्वार येउन…

Read More