Author: breakingvidarbha

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास सिंदी रेल्वे येथील मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन रेल्वे टर्मिनल सेवेच्या चाचणीला हिरवी झेंडी वर्धा : सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही. त्यामुळे नागपूरमधील उद्योगांना सिंदी ड्राय पोर्टशी जोडून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात नागपूर हे देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ म्हणून नावारुपाला आलेले असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. सिंदी रेल्वे येथे बहुप्रतीक्षित अशा मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कचे  नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सिंदी रेल्वे टर्मिनल सेवेच्या चाचणीलाही त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. केंद्रीय…

Read More

वर्ध्याच्या पुलगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई दहा ट्रक जप्त करीत  22 जणांना करण्यात आली अटक गेल्या सात दिवसात तीन मोठ्या कारवाया वर्धा : वर्ध्याच्या पुलगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करीत तब्बल 22 जणांना पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. सालफळ येथील रेती डेपोवर रात्री दरम्यान अवैध रेती भरलेले दहा ट्रक रेती वाहून नेत असताना जप्त करण्यात आले आहे. तर सोबत चार कार आणि एक जेसीबी देखील या मोठ्या कारवाईत पोलिसांना सापडला आहे. रात्रीमध्ये रेती वाहून नेण्यास बंदी असताना अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याने कारवाई करण्यात आली.  आय पी एस अधिकारी राहुल चव्हाण यांच्याकडे डी वाय एस पी…

Read More

महायुतीतील उमेदवारीचा वर्ध्याचा तिढा सुटला  रामदास तडस तिसऱ्यांदा लोकसभा लढणार वर्धा : वर्धा लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार यावर सर्वत्र चर्चा रंगली होती. वर्ध्यात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर, माजी खासदार सुरेश वाघमारे या शिवाय काही पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली होती. पण महायुतीत दुसरी यादी जाहिर होताच या नावाना विराम मिळाला आहे. लोकसभेसाठी दोन वेळा खासदार राहीलेले रामदास तडस यांचे तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आता तडस यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तडस यांना भारतीय जनता पार्टीने वर्धा लोकसभा मतदार संघात तिसर्‍यांदा लढण्याची संधी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसकडून कमलनयन बजाज व वसंत…

Read More

रात्रीच्या नाकाबंदीत सापडले टिप्पर वर्धा : वर्धा नदी पात्राच्या साती घाटातून अवैध वाळू उपसा जोरात सुरू असल्याचे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईवरून समोर आले आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या दहा रेती तस्करांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर चार जण पसार झाले आहे. अंदोरी रस्त्यावर असणाऱ्या अडेगाव येथे रात्रीच्या सुमारास नाकेबंदी केली असताना पोलिसांना वाळू भरलेले टिप्पर जातांना दिसले, यावरून ही कारवाई करण्यात आली. यातील विविध गुन्ह्यात आरोपी पुरुषोत्तम लक्ष्मण गोहाणे, रा. हल्दीपुरा, कळब जी. यवतमाळ , सय्यद लुकमान सय्यद रहमान रा. कुरेशीपुरा, जी.यवतमाळ, निलेश तिजारे देवळी, परशराम भास्कर कन्नाके, नितीन सुभाष जयस्वाल, धीरज बाबाराव ओरकर, यासह एकूण चौदा जनावर गुन्हा दाखल…

Read More

विकासकामे होतच राहील, दिव्यांगांसाठी काही करायची इच्छा होती आमदार रणजित कांबळे यांचे प्रतिपादन वर्धा (ब्युरो) :  दिव्यांगाना येजा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काहीकडे साधन नाहीय तर काहीनी तीनचाकी सायकल घेतल्या तर काही दिव्यांग बांधव हे पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीने प्रवास करतातं. पेट्रेल गाड्यांचा खर्च त्यांना परवडत नाहीय. माझ्याकडे अनेक दिव्यांग बांधवांनी वाहनाची मागणी केलीय. त्यामुळे मी स्वत: मला जिल्हा खनिज विकास निधीतून प्राप्त झालेले १० लाख रुपये दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्याचं ठरवलं. त्या निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांकरिता १० तीनचाकी ई-स्कूटर खरेदी केल्या. विकासकामांसाठी निधी मिळणारच आहे, विकासकामे हे नेहमीच होणार आहे. पण, दिव्यांगांसाठी काही करायची इच्छा होती, त्यामुळे दिव्यांगांसाठी ई-स्कूटर…

Read More

पिकविम्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी झाल्या ! बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे सीईओ तपन सिंघेेेल यांचे वक्तव्य इन्शुरन्स समजासाठी फायद्याचा ! आशिष इझनकर वर्धा : क्रॉप इन्शुरन्स जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून शेतकरी आत्महत्या कमी झाल्या आहे. पीकविमा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरत आहे. पीकविमा आता शासनाने शंभर टक्के सबसिडीवर सुरू केला आहे. पीक विम्याचे सेटलमेंट देखील होत आहे, विमा कंपनीने लवकर सेटलमेंट केले नाही तर दंड देखील विमा कंपनीला आकारला जातो आहे, त्यामुळे अलीकडे सेटलमेंट लवकर होत असल्याचे वक्तव्य बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघेेेल यांनी केले. आर्वी रोडवर स्थित असलेल्या या कार्यालयातील कामकाजाला सुरुवात…

Read More

वर्धेकरांच्या कलेचे आणि कष्टाचे सर्वत्र कौतुक वर्धा : सुपरिचित नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या तेरवं या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असून पहिल्याच दिवशी हा चित्रपट हाऊसफुल्ल झाल्याने अनेक सिनेरसिकांना तिकीट न मिळाल्याने परत जावे लागले. प्रसिद्ध लेखक श्याम पेठकर यांच्या तेरवं या नाटकावर आधारित या सिनेमाचे चित्रीकरण प्रामुख्याने वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात झाले आहे. या चित्रपटात ख्यातनाम सिनेकलावंतांसह वैदर्भीय कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातही वर्धेकर कलावंतांचा सर्वाधिक सहभाग असून त्यांच्या कलेचे आणि कष्टाचे भरभरून कौतुक सध्या दर्शकांकडून होत आहे. शेतकरी कुटुंबातील एकल महिलेच्या संघर्षाची आणि सामर्थ्याची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेक्षणीय चित्रपटात कर्जमुक्ती, महिला बचत गट स्थापना, मुलींचे…

Read More

आर्वी विधानसभेतील शेतकर्‍यांसाठी 24 तास वीज; 16 नवीन सौर प्रकल्प आर्वी : आर्वी विधानसभा मतदार संघातील बहुतांश शेती जमीन जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा मोठा त्रास शेतकर्‍यांना होता. जंगली श्‍वापदांनी अनेक शेतकरी, शेतमजुरांना ठार मारले. अनेकांना जायबंदी केले. शेकडो जनावरांचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकर्‍यांना ओलीतासाठी रात्री 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांनी लोकसभा प्रमुख सुमीत वानखेडे यांच्याकडे केली होती. राज्य सरकारही शेतकरीहितार्थ असल्याने शेतकर्‍यांच्या मागणीचा विचार करून आता 24 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौरउर्जेच्या माध्यमातून आर्वी विधानसभा मतदार संघातील 21 हजार शेेतकर्‍यांना या संबंधात मुख्यमंत्री सौर उर्जा कृषी योजनेंतर्गत आर्वी उपविभागतील 16…

Read More

वर्धा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे ठेवा ! नेत्याचे शिष्टमंडळ दिल्ली, मुंबईला रवाना वर्धा लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही – नेते काँग्रेस श्रेष्ठींना घालणार साकळे वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी , आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेला वर्धा लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाने इतर मित्र पक्षासाठी सोडू नये , अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. हा लोकसभा मातदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले असून ते मुंबई, दिल्ली येथे जावून पक्षश्रेष्टीची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे माजी आ. अमर काळे, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष चारूलता टोकस, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे,…

Read More

स्थायी घरपट्टे मिळण्यासाठी  मोर्चात माहिलांचा सहभाग वर्धा : बोरगाव मेघे येथील गिट्टी खदान परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्थायी घरपट्टे मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत महिला सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यावर जिल्हाधिकारी भेटले नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांच्या चेंबर समोर ठिय्या मांडून काही वेळ ठिय्या आंदोलन केले. बोरगाव मेघे येथील गिट्टी खदान परिसरातील नागरिक कित्येक वर्षांपासून तेथे राहत आहे, त्याबाबतचा कर देखील त्यांच्याकडून भरला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढत नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहचलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी भेट न देताच कार्यालया बाहेर निघून गेल्याने मनसेच्या पदाधिकारी…

Read More