Author: breakingvidarbha

 ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे यांची संवाद सभा सामाजिक सांस्कृतिक संस्थांचा सहभाग वर्धा : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे शासनाचे आणि समाजाचे लक्ष वेधणारा ‘तेरवं’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून वैदर्भीय पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे यांची संवाद सभा शुक्रवार, दि. १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील एकल महिलेच्या संघर्षाची आणि तिच्या सामर्थ्याची मांडणी करणाऱ्या ‘तेरवं’ या चित्रपटाचे कथानक नाट्यलेखक श्याम पेठकर यांचे असून रंगभूमीवर ‘तेरवं’ या नाटकाने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर आपली छाप यापूर्वी उमटवली आहे. ॲग्रो थिएटर या नवसंकल्पनेमुळे तसेच वैविध्यपूर्ण नाट्यनिर्मिती व सामाजिक…

Read More

श्रमिक पत्रकार संघाच्या मैफीलला उत्स्फुर्त प्रतिसाद वर्धा : वर्धेकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या विविध गीत-संगीताच्या मैफिलींच्या शृंखलेची आणखी एक कडी जोडत “ये शाम मस्तानी” या महामैफलीने वर्धेकरांना भुरळ घातली. वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या भव्य मैदानावर ही संगीत मैफल बहरली. वर्धेकरांना दर्जेदार आणि बहारदार संगीत कार्यक्रमांची मेजवानी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्याची परंपरा मध्यंतरी खंडित झाली होती. वर्धेकरांना पुन्हा त्याच मोडमध्ये आणण्यासाठी या मैफिलत सारेगम फेम व गौरव महाराष्ट्रचा अभिषेक मारोटकर, प्रसिद्ध पार्श्वगायक ऋषीकेश रानडे, लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या सुचित्रा भागवत व प्रसिद्ध गायिका मानसी परांजपे-दातार यांनी शब्दसुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. आकाशात पौर्णिमेचा चंद्र आणि सायंकाळच्या मंद प्रकाशात…

Read More

विकासासाठी आता ५ कोटीची तरतूद वारकरी बांधवांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मुंबई (ब्युरो) : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रा-जत्रांना भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्रांना वर्षभर भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील “ब” वर्ग तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने निधीची मर्यादा २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपये इतकी वाढविली आहे. राज्यातील आध्यात्मिक क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराजांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची आज भेट घेऊन त्यांचे आभार मानले. महाराष्ट्राला तीर्थक्षेत्रांची, संत-महात्म्यांची समृद्ध…

Read More

पाय धुवायला गेले आणि कॅनालमध्ये पडले वर्धा : आर्वी तालुक्यातील सालफळ येथील शेत शिवारात गव्हाला ओलित करण्यासाठी गेलेल्या पिता पुत्राचा कॅनलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओलित आटोपल्यावर पाय धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा तोल गेल्याने ही घटना घडली आहे. सालफळ येथील अरविंद मधुकर कोहळे वय 55 वर्ष आणि मुलगा चेतन अरविंद कोहळे वय 18 हे दोघे आपल्या शेतात गहू पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री दरम्यान शेतात ओलित केले. पाणी देऊन नेहमीप्रमाणे दोघेही घरी परतले नाही. पिता आणि पुत्र दोघेही घरी परतले नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. बुधवारी शेतातून परत घरी आले नसल्याने कुटुंबासह गावकऱ्यांनी शोधाशोध केली, तेव्हा कॅनेलच्या आजूबाजूला शोध…

Read More

‘ग्रेट बकॅयार्ड बर्ड काउटं’ ला वर्धेत 146 पक्षी प्रजातींच्या नोंदी   वर्धा : ग्रेट बकॅयार्ड बर्ड काउटंच्या निमित्याने वर्धा जिल्ह्यातील विविध अधिवासात पक्षी निरीक्षकांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात 146 पक्षी प्रजातींच्या नोंदी घेवून त्या ईबर्ड डॉट ओआरजी या संकेत स्थळावर नोंदवण्यात आल्या. वर्धा जिल्ह्यात आढळणाऱ्या एकूण प्रक्षी प्रजाती पैकी 48 टक्के प्रजातींचे दर्शन या चार दिवसीय पक्षी गणनेमध्ये झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या ग्रेट बकॅयार्ड बर्ड काऊंट मधील कॅम्पस बर्ड काऊंट सेवाग्रामच्या दवाखान्याच्या परिसरात पक्षी निरीक्षण करत 40 पक्षी प्रजाती नोंदविण्यात आल्या. यात पक्षी अभ्यासक राहुल वकारे आणि पवन दरणे यांना बोर धरणाच्या परिसरात टिकेलचा लीफ वार्बलर आढळला. याचे शास्त्रीय…

Read More

सावंगी मेघे रुग्णालयाचे आयोजन     विशेष तपासणी शिबीर   वर्धा : सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे दि. २६ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोलॉजी, युरोलॉजी व इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी या विभागाद्वारे विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये न्यूरोलॉजी विभागात मेंदूसंबंधित विविध आजार, मिरगी अथवा फिट येणे, शरीराला झटके येणे याबाबत, गॅस्ट्रोलॉजी विभागात पोटाचे विविध विकार, अपचन, जळजळ होणे, बद्धकोष्ठता, कावीळची लक्षणे, लिव्हर म्हणजेच यकृतात चरबीचे प्रमाण वाढणे, युरोलॉजी विभागात किडनीबाबतचे विकार, मूतखडा, प्रॉस्टेट ग्रंथीत वाढ, पुरुषांच्या लैंगिक समस्या तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागात थ्रोम्बोसिस म्हणजेच शरीरातील रक्त घट्ट होणे, डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे पायांच्या रक्तवाहिन्यातील घट्टपणा वाढणे, व्हेरीकोस व्हेन्स याबाबत…

Read More

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर सन-२०२४ चे पदाधिकारी ठरले अध्यक्षपदी दिनेश थुल , महासचिव पराग धवन तर कोषाध्यक्ष पदी राजेश खडसे यांची अविरोध निवड महामानवांच्या १३३ व्या जयंतीला उत्साहात साजरे करण्याचा मानस वर्धा (ब्युरो) :  स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान वर्धा येथे दि.२५ फेब्रुवारी २०२४ (रविवार) रोजी सन-२०२३ च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पंकज लभाने तसेच पदाधिकारी व भीम सैनिकांनी वर्धा शहर सन-२०२४ ची विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ही परंपरेनुसार लोकशाही पद्धतीने गठित करण्याकरीता बैठकीचे आयोजन केले होते. रवी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी सन २०२३ च्या समितीने जमा – खर्चाची मांडणी…

Read More

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला  किसान मोर्चाचे समर्थन वर्धा : दिल्ली सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करुन आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये मदत देण्यात यावी ही मागणी करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने सेलू तालुका प्रशासनाला निवेदन दिले आहे. वर्धा जिल्हयातील २ लाख २७ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विम्याची नोंद केलेली आहे.  खरिप व रब्बी पिकाचे नुकसान झाले असतांना आज पर्यत नुकसान भरपाई मिळालेली नाही. सोयाबीन पिकाचे बुरशीजन्य येलो मोझेक रोगाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही सरकार  मोबदला न देता ऊद्योगपतींचे कर्ज माफ करीत असल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला. २०२३-२४ मध्ये केंद्र व राज्य सरकारने १० टक्के प्रिमियम म्हणजे जवळपास…

Read More

समुद्रपूर येथे युवक काँग्रेसतर्फे शिवजयंती साजरी कॉग्रेसमध्ये नवचेतना आणण्याचा होतोय प्रयत्न  वर्धा : आपल्या कृषिप्रधान देशातील बिघडत्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, नैतिक व राजकीय परिस्थितीची मूळ शेतीच्या तोट्यात गुंतून आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ ग्राम स्वराज्य आहे परंतु शेतीतील वाढत्या तोट्यामुळे ग्रामस्वराज्यच धोक्यात आले आहे. यावर पर्याय शोधण्यासाठी शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणांचा अभ्यास करणे व त्यांच्या आदर्शांवर देश चालविण्याची गरज आहे. येत्या पिढीला शिव चरित्र कळण्यासाठी व त्यांच्या मनावर महाराजांच्या अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील जीवन पद्धतीचा प्रभाव पडावा यासाठी त्यांच्यावर महाराजांच्या ऐतिहासिक यशोगाथा आणि जीवन चरित्र या उत्सवाच्या माध्यमातून बिंबवण्याचा उद्देश सर्वत्र आयोजकांनी अंगीकारणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश…

Read More

 तुळजापूर (दहेगाव) येथे जलद रेल्वे गाडीला थांबा गावकऱ्यांनी विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात केला जल्लोष वर्धा : वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या तुळजापूर (दहेगाव) येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नागरिक विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला बसले होते. शिक्षणासाठी दहेगाव येथून बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे थांबा अत्यावश्यक असल्याने शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी झाले. 27 जानेवारी पासून हे उपोषण सुरू करण्यात आले होते. 26 दिवसाच्या उपोषण आंदोलनानंतर 25 गावांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अखेर  उपोषण आंदोलनाला यश आले आणि दहेगाव (तुळजापूर) येथे इंटरसिटी या गाडीला थांबा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी इंटरसिटी ट्रेन या गावाच्या रेल्वे स्थानकावर थांबली.…

Read More