- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
तुळजापूरच्या शाळकरी विद्यार्थ्यांचा सवाल जलद गाड्यांना थांबा देण्याची चार वर्षांपासून होतेय मागणी साखळी उपोषणात शाळकरी विद्यार्थी देखील झाले सहभागी (आशिष इझनकर) वर्धा : जपानला एका विद्यार्थ्यासाठी ट्रेन थांबते, मग आमच्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी ट्रेन का थांबत नाही? असा सवाल शाळकरी विद्यार्थ्यांनी उपोषण मंडपात उपस्थित केला. दळणवळणाच्या मुबलक साधनापासून दूर असलेल्या आमच्या गावात किमान जलद ट्रेन तरी थांबावी अशी रास्त अपेक्षा बाळगून विद्यार्थ्यांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदविला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येमुळे रेल्वे थांब्यासाठी चाललेल्या उपोषणाच्या साखळीकडे लक्ष वेधले गेले आहे. वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या तुळजापूर (दहेगाव) येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नागरिक विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला बसले…
आधी लगीन कोंढाण्याचे… वर्धा : सेलू येथील ब्रिलिअंट शाळेत ऍन्युअल फंक्शन कार्यक्रमात आयोजित तानाजी ऍक्ट मध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी धमाल केलीय. तर जय श्री राम ऍक्ट हा देखील तेवढाच आकर्षक ठरला. सांस्कृतिक कार्यक्रमात विविध गाण्यावर चिमुकल्यानी ताल धरला आणि प्रेक्षकांमधूनही या सादरीकरणाला तेवढीच दाद मिळाली. तानाजी, छत्रपती शिवराय, उदयभान, मावळे यांच्या भूमिका आणि चिमुकल्याच्या नृत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
सेलू येथे ‘आरोग्याचे वाण ‘ या कार्यक्रमाचे आयोजन वर्धा – दत्ता मेघे फाऊंडेशन व वर्धा सोशल फोरमच्या वतीने तीळ संक्रांतीच्या निमित्ताने सेलू येथे ‘आरोग्याचे वाण ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. घोराड येथील भक्त निवास येथे शेकडो महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या. विशेषतः विधवा महिलांना वाण वाण देऊन आरोग्याचे वाण कार्यक्रम साजरा करण्यात आला. डॉ.अभ्युदय मेघे आणि सौ मनीषा मेघे यांनी यात पुढाकार घेतला.
सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांचा शहादत दिन वर्धा : प्रार्थना सभा ही महात्मा गांधी यांचा अद्वितीय आविष्कार आहे, प्रार्थनासभा ही समाजासाठी उपयुक्त ठरणारी आहे. राज्यघटनेतील जे मूल्य आहेत ते महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे प्रारूप लिहिले. पंडित नेहरु यांना संविधान समितीवर घ्यायचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यामुळेच आज जे संविधान आहे ते लोकशाहीत उपयुक्त ठरत आहे. संविधांनावर महात्मा गांधी यांची अमृतछाया आहे.लोकशाहीला आजच्या परिस्थिती मध्ये तुडवले जात आहे. हिंसा, हत्या, बलात्कार, खोटे, तिरस्कार या बाबी सतत पसरविले जात आहे. या बाबी सतत वाढत आहे, आमचे बहुमत आहे आम्ही काहीही करू शकतो अशी भावना निर्माण झाली आहे.…
रविकांत तुपकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन वर्ध्याच्या देवळी येथे शेतकरी संघर्ष सभा वर्धा : शेतकऱ्यांबाबत शासन तसेच विविध राजकीय पक्ष कसे उदासीन आहे, याचे उदाहरण देत रविकांत तुपकर यांनी राजकारण्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहेय.. आम्ही शेतीच्या प्रश्नासाठी जागृत झालो पाहिजे, आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत पण तुम्ही अमच्यासोबत आले पाहिजे. आता मराठा आरक्षणासाठी आणि ओबीसी आरक्षणासाठी लोकं लाखोच्या संख्येने एकत्र आले. मग जातीपातीसाठी तुम्ही सर्व एकत्र येता तर मातीसाठी एकत्र यायला काय अडचण आहे. असे सांगत शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. सोयाबीनचे बाजारभाव, कपाशीचे बाजारभाव आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याचे तुपकर यांनी सभेत शेतकऱ्यांना स्पष्ट…
2016 पासून दरवर्षी केल्या जाते पारायण सुसज्ज व्यवस्था व स्वयंसेवकांचे अमूल्य योगदान सुमारे चार हजार सहाशे गजानन भक्त बसले पारायणासाठी वर्धा : जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने वर्ध्यात गजानन भक्तांची मांदियाळी दिसून आली. वर्ध्यातील सर्कस ग्राउंड वर बनवलेल्या मोठ्या मंडपामध्ये जवळपास चार हजार सहाशे गजानन भक्त पारायणाला बसलेत. यामध्ये महिलांची संख्या कमालीची दिसून आली, गेल्या आठ वर्षापासून जागतिक पारायण दिन सोहळा हा वर्ध्यात उत्साहात पार पाडला जातो. येथे अपंग वयोवृध्द यांच्यासाठी सुद्धा बसण्याची व्यवस्था करण्यात आलीय. स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे मोठे सेवेचे योगदान दिले. विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने वर्धा येथे केले गेले आहे. यावेळी जय गजानन च्या गजराने…
वर्धेत जोरदार झाला महायुतीचा पदाधिकारी मेळावा आशिष इझनकर वर्धा : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी आय. ,राकाँ महायुतीच्या पदाधिकार्यांचा मेळावा स्थानिक हॅरिटेज सभागृहात आज 14 रोजी आयोजित करण्यात आला होता. चारही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर वर्धेत पहिल्यांदाच आल्याने अनेकांना अवघडल्याचे चित्र असले तरी मेळावा जोरदार झाला. अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, शिवसेना नेते अशोक शिंदे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, आमदार डॉ. रामदास आंबटकर, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा नेते राजेश बकाने, भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेेडे, भाजपा ओबीसी आघाडी भाजपा प्रदेश अध्यक्ष संजय गाते, आरपीआयचे विदर्भ अध्यक्ष विजय…
जिल्हा बँकेच्या सक्षमीकरणाबाबत सूचना जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक तीन आठवड्यात 1 कोटी 50 लाखाच्या ठेवी वर्धा : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनाकरीता बँकेच्या ठेवी वाढीसाठी अभियान राबविण्यात येत आहे. मागील तीन आठवड्यात 1 कोटी 50 रुपयाच्या ठेवी जमा झाल्या आहे. यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी लोकप्रतिनिधी, संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्याचबरोबर बँकेचे संगणकीकरण, आधुनिकीकरण, ग्राहक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सक्षमीकरण व कामकाजाच्या नियमित सनियंत्रणासाठी शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीला समिती सदस्य…
कारंजा येथे फार्मर कप कार्यशाळेस सरपंच, ग्रामसेवकांचा सहभाग वर्धा : पानी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आयोजनाबाबत कारंजा येथे पंचायत समितीच्या सभागृहात स्पर्धेच्या नियोजनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, उमेदच्या समूह संसाधन व्यक्ती, कृषीसखी, पशुसखी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून पानी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ उपस्थित होते. तहसीलदार ऐश्वर्या गिरी, गटविकास अधिकारी प्रविण देशमुख, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री.पंधरे, पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक भूषण कडू उपस्थित होते. तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी मनोगत व्यक्त करताना गटशेती हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वांनी यामध्ये सहभागी झाले…
सर्वशाखीय तेली समाज मेळाव्याचे वर्ध्यात आयोजन वर्धा : वर्धा शहरात संत तुकाराम महाराज आणि त्यांचे शिष्य संत जगनाडे महाराज यांचे गुरुशिष्य स्मारक उभारण्यात यावे. यासाठी नगर परिषद, समाज बांधवासह आपण सर्वतोपरी सहकार्य करू! मात्र सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ते वर्ध्याच्या नालवाडी स्थित अनुसया मंगल कार्यालयात झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय सर्वशाखीय तेली समाज मेळाव्यात बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रामदास आंबटकर,नागपूरचे अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, काँग्रेस नेते शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्याधिकारी राजेश भगत, शिवसेनेचे रविकांत बालपांडे, अनिल देवतारे, सेलू नगराध्यक्ष…

