- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
वर्धा : वर्धा पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात ग्रामपंचायतीच्या करवसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीची करवसुली करण्यात येणार असून बुधवार दि.15 मार्च रोजी एकाच दिवशी करवसुली महाअभियान राबविले जाणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी शशिकांत अर्जुन शिंदे यांनी दिली. तालुक्यात चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत 60 टक्के करवसुली झाली असुन माहे मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के करवसुली पुर्ण करण्याकरिता अभियान राबविण्यात येणार आहे. करवसुली करिता विविध विभागाशी समन्वय साधुन वसुली अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शंभर टक्के करवसुली करिता ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी कंबर कसली असुन करवसुली मोहिमे दरम्यान तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीमध्ये थकीत करवसुली बरोबरच प्रलंबित करबाकी, वादग्रस्त…
वर्धा : सर्वोदय समाजाचे 48 वे संमेलन वर्ध्याच्या सेवाग्राम येथे होत आहे. 14 मार्च रोजी या संमेलनाचे उदघाटन तिबेटचे माजी पंतप्रधान प्राध्यापक रिंनपोछे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सर्व सेवा संघाचे पूर्व अध्यक्ष अमरनाथ भाई यांच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी संग्रहालय दिल्ली येथील अध्यक्ष श्रीमती तारा गांधी भट्टाचार्य उपस्थित राहणार आहे. ‘ न युद्ध न हिंसा, आम्हाला हवी शांती आणि अहिंसा ‘ असे या संमेलनाचे घोषवाक्य आहे. यावेळी स्वागताध्यक्ष माजी पालकमंत्री सुनील केदार असणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल यांनी दिली आहे. स्थानिक विश्राम गृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत…
वर्धा : बारावी परिक्षेच्या गणित विषयाचा पेपर सुरु असतांना परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यांजवळ मोबाईल आढळून आला. भरारी पथकाच्या ही बाब निदर्शनास आल्याने मोबाईल जप्त करुन विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली तसेच केंद्र रद्द करण्याची सिफारस करण्यात आली आहे. इयत्ता १२ वी बोर्ड परिक्षेचा गणित विषयाच्या पेपरसाठी जिल्ह्यामध्ये ५५ केंद्रावर ६ हजार २२७ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी ६ हजार १४५ हजर होते व ८२ विद्यार्थी गैरहजर होते. अतिसंवेदनशील व संवेदनशील असे एकूण ४४ केंद्रावर बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये ८ विभाग प्रमुखांची ८ विशेष भरारी पथके तसेच विभागीय मंडळानी नियुक्त केलेले ६ भरारी पथके यांनी वेगवेगळ्या केंद्रास भेटी दिल्या. यावेळेस…
वर्धा – सेवाग्राम नजीकच्या पुजई येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात मेक्सिकन पेपरिका मिरचीचे पीक घेतले आहेय. मिरची म्हटले की तोंडाला तिखट झोंबतं… पण या मिरचीच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर चवीच्या बाबतीत या मिरचीत वेगळेपणा आहेय. चवीला अत्यंत सौम्य तिखट असणाऱ्या या मिरचीचा उपयोग विदेशात मोठ्या प्रमाणात होतो. आरोग्यासाठी महत्वाची मिरची समजली जाणारी ही मिरची फास्ट फूड मध्ये देखील वापरली जाते. पूजई येथील मिलिंद भाणसे या शेतकऱ्याच्या दोन एकर शेतात बहरलेल्या या मिरची मधून साडेसात लाख रुपयांचे उत्पादन होईल अशी आशा शेतकऱ्याला आहे. त्याच गणित देखील हा शेतकरी मांडतो आहे. पुजई येथील शेतकरी मिलिंद भाणसे.. त्यांनी आपल्या दोन एकर शेतात पेपरिका…
वर्धा : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे 2023 हे वर्ष राज्यात आंतररराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त कृषि विभागाच्यावतीने मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले असून या दौडमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवार दि.4 मार्च रोजी सकाळी 7 वाजता मिलेट दौड आयोजित करण्यात आली आहे. या दौडच्या शुभारंभाप्रसंगी खा.रामदास तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहे. यामध्ये 16 ते 18 वर्ष आतील मुले व 18 वर्षावरील पुरुष यांच्या स्पर्धा घेतली जातील. मिलेट दौडचा मार्ग 16 ते 18 वय वर्ष मुलासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडांगण येथे सुरुवात…
वर्धा- वर्ध्याच्या सिंदी रेल्वे नजीक गौळ भोसा शेतात विहिरीचे काम सुरू असताना दोन मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना घडली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविन्यात येत आहे. दबलेल्या मजुरांमध्ये 40 वर्षीय अमोल दशरथ टेंभरे व 28 वर्षाच्या पंकज प्रभाकर खडतकर याचा समावेश आहे. अद्याप दबलेल्या मजुरांना काढणे शक्य झाले नाही, त्यामुळे महसूल विभागाने एन डी आर एफ च्या चमुला पाचारण केले आहे. सिंदी रेल्वे येथील शेतकरी सर्जेराव वरभे यांच्या शेतामध्ये विहिरीचे काम सुरू होते. यावेळी पाच मजूर कामावर कार्यरत होते. विहिरीत उतरलेल्या अमोल टेंभरे व पंकज खडतकर हे दोन मजुर विहिरीचा भाग खचल्याने खाली कोसळले.…
मुंबईत आदिवासी विकास केंद्र स्थापन करणार – खा. शरद पवार सामूहिक वनहक्क धारक वनवासी व इतर पारंपरिक निवासी गावांची राज्यस्तरीय परिषद वर्धा – जमीन जग जंगल या तिघांचं एक नातं आहे. या तिघांचे संरक्षण करणारा आदिवासी आहे. जंगलाचा खरा मालक हा आदिवसी आहे. या देशात जंगल शिल्लक आहे ते आदिवासीमुळे…म्हणून ग्रामसभा अधिक शक्तिशाली केली पाहिजे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आदिवासी विकास केंद्र तत्काळ सुरु करू, अशी घोषणा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सेवाग्राम येथील शांती भवनमध्ये केली. ते रविवार, १२ फेब्रुवारी रोजी सामुहिक वनहक्क धारक आदिवासी व इतर पारंपारीक वननिवासी गावांच्या राज्यस्तरीय परिषदेला संबोधित करत होते. यावेळी…
वर्धा : सत्तेचा सतत गैरवापर होत आहे, रोज हे दैनंदिन जीवनात पाहायला मिळत आहे. लोक अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, सरकारमधील कुणी याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. पंतप्रधान म्हणतात माझ्याशी कुणी संघर्ष करू शकत नाही, माझ्याशी कुणी लढू शकत नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. वर्ध्याच्या सर्कस मैदानावर अयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री प्राजक्त तानपुरे, युवक आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष सक्षना सलगर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, आशा मिरगे, सुरेश देशमुख उपस्थित होते. निर्धार मेळाव्यात वर्ध्यातील राजकीय परिस्थिती बदलण्याचा…
गांधी – विनोबांच्या दर्शनाने होणार महात्मा गांधी साहित्य नगरीत प्रवे वर्धा – वर्ध्यातील साहित्य संमेलनात प्रवेश करताना बारकावे टिपत साहित्यासोबतच कला – कुसर देखील अनुभवायला मिळणार आहे. संमेलन स्थळ असणाऱ्या महात्मा गांधी साहित्य नगरीत प्रवेश करताना महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वैचारिक दर्शनाने साहित्य प्रेमी पुढे सरकणार आहे. वर्ध्यात 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन वर्ध्यात होत आहे त्यामुळे संमेलन स्थळ जाहीर झाल्यापासून या संमेलनाबाबतची उत्सुकता महाराष्ट्रातील साहित्य प्रेमींपासूनच वर्धेकरांना देखील लागली आहे. संमेलनाला गांधी-विनोबांच्या साहित्याचा स्पर्श असावा असाच आग्रह वर्ध्यातील साहित्यिकांसह वर्धेकरांनी देखील धरला होता. वर्धा ही…
वर्धा : वर्ध्यातील एस टी आगारातून निघालेल्या शिवशाही बसचा नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नजीक आसोला येथे अपघात झाला होता. या अपघातात बसला वाचविण्याच्या प्रयत्नात वर्ध्याच्या अरूण नेहारे नामक चालकाचा मृत्यू झाला. वर्ध्याच्या आगारातील बसेस नादुरुस्त असल्याने बसगाड्याचे अपघात होत असल्याचा आरोप वाहक व चालक संघटनांनी केला आहे. रविवारी चालक व वाहकांनी एकत्र येत विभागीय नियंत्रकांना याबाबत जाब विचारला आहे. वर्ध्याच्या राम नगर येथील बस डेपोमध्ये चालक व वाहक एकत्र झाले, गाडी दुरुस्तीसाठी टाकली असताना देखील तीच गाडी चालकाला दिली जातेय असा आरोप यावेळी चालकांनी केला आहे. चालक अरुण नेहारे आणि वाहक प्रशांत भुषणवार यांनी शनिवारी शिवशाही ही गाडी वर्धा येथून नागपूरला…

