- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
माजी आमदार अमर काळे महाविकास आघाडीतून लढणार महाविकास आघाडीत वर्ध्याची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे वर्धा : महाविकास आघाडीच्या जगावर तिढा आता सुटत आला आहे. काही जागावर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. महाविकास आघाडीकडून वर्धा लोकसभेत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे लढणार यावर गेल्या काही दिवसात चर्चा रंगत होती. माजी आमदार अमर काळे हे शरद पवार यांच्या भेटीला देखील गेले होते. मुंबई येथे तळ ठोकून बसलेले अमर काळे यांना जागा वाटपात उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आहे. जवळपास अमर काळे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निश्चित झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसात पाच विधानसभा मतदार संघात माजी…
निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचना वर्धा (ब्युरो): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार असून भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी व देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकीच्या कालावधीत मोठ्या रक्कमेच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्च विषयक नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सुरज बारापात्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बँकेमधून दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास बँकांनी तात्काळ…
पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप मुंबई (ब्युरो) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली…
जिल्ह्यातील संगणक टायपिंग संस्थाचालकांना दिली मतदान जनजागृतीची शपथ वर्धा : मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयात जिल्ह्यातील संगणक टायपिंग संस्थाचालकांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये जिल्ह्यातील एकूण 25 शासनमान्य संगणक टायपिंग इन्स्टिट्यूट संस्थाचालकांना मतदान जनजागृती विषयी शपथ देण्यात आली. भय व भितीमुक्त वातावरणात तसेच कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करणे तसेच वंश, जात, धर्म, पंथ इत्यादीचा भेदभाव न करता आम्ही लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान करू अशा आशयाची शपथ सर्व संस्थाचालकांनी घेतली. यावेळी नोडल अधिकारी उत्तम खरात, विज्ञान पर्यवेक्षक उषा तळवेकर, टायपिंग इन्स्टिट्यूटचे शेख व संस्थाचालक उपस्थित होते. यावेळी संगणक टायपिंग इन्स्टिट्यूट मधील सर्व…
शरद पवार गटाकडून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना ऑफर? शरद पवार यांची आर्विचे माजी आमदार अमर काळे यांनी घेतली भेट सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली चर्चा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत अमर काळे यांनी निर्णय कळविण्यास मागितला वेळ कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळविणार – अमर काळे वर्धा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा यासाठी काँग्रेस नेत्यांचाही आग्रह वर्धा : महाविकास आघाडीत वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहण्यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढण्याची ऑफर अमर काळे यांना आली आहे. आज मंगळवारी सकाळी सिल्व्हर ओकवर अमर काळे यांची शरद पवार यांच्यासोबत भेट झाली तर काल सोमवारी सायंकाळी…
आर्वी वनपरिक्षेत्रात रानकुत्र्याचा कळप वर्धा : आर्वी वनपरीक्षेत्र भागात भ्रमंती करतांना वर्धेतील वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकारे आणि पक्षी निरीक्षण प्रतिक पाल यांना तलावावर आपली तहान भागविण्याकरिता आलेला रानकुत्र्यांचा कळप दिसला. जवळच असलेल्या मंदिरात भाविक पूजा पाठ व आरती करण्यात दंग होते तर दुसरीकडे रानकुत्रांचा कळप तलावाकाठी दिसला. मानव आणि वन्यजीव यांच्या सहजीवनाचे हे उत्तम उदाहरण आहे. या मोठ्या संख्येत रान कुत्र्यांचा कळप दिसल्याने आर्वी येथील प्रादेशिक जंगलाचे महत्व अधोरेखित होत आहे.
विदर्भात नागपूरच्या बाहेर सावंगीत पहिले लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयात यशस्वी ठरले प्रत्यारोपण नागपूरच्या बाहेरील विदर्भातील पहिली लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नागपूर येथील मृत युवकाचे लिव्हर आणण्यात आले वर्ध्यात लिव्हर प्रत्यारोपनासाठी उभारला ग्रीन कोरिडॉर वर्धा : एकाच वेळी लिव्हर आणि किडणी प्रत्यारोपण करून वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम केला आहेय. पहिले लिव्हर ट्रान्सप्लांट वर्ध्याच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुगणालयालात यशस्वी ठरले आहे. याच रुग्णालयात आजवर 107 वेळा गरजू रुग्णांना किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष पूर्ण करण्यात आले आहे. विदर्भातले पाहिले लीव्हर प्रत्यारोपण करून सावंगी येथील रुग्णालयाने विक्रम केला आहे. नागपूर येथे उंचावरून खाली पडलेल्या एका 24 वर्षीय…
लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी वर्धा : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. देशभरात ४ जून २०२४ रोजी एकाच दिवशी मतमोजणी होईल. लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 8-वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुक जाहिर झाल्याच्या अनुषंगाने 16 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे…
वर्ध्यासाठी महाविकास आघाडीकडून सक्षम उमेदवार जाहीर करावा इंडिया अलंयन्सचे वरिष्ठ नेत्यांना पत्रातून घातले साकडे इंडीया अलायंसच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वरीष्ठ नेत्यांना पत्र इंडीया अलायंसच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती वर्धा : वर्धा लोकसभेमध्ये इंडिया अलायंसने एक सक्षम उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी इंडीया अलायंसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसे पत्रच इंडिया अलंयन्स मधील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वरिष्ठाना पाठविण्यात आले आहे. वर्ध्यात वरदा वर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला नाही. महायुतीने प्रचार देखील सुरू केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने लवकर सक्षम उमेदवार जाहीर करावा अशी…
महाविकास आघाडीत अग्रवाल, कराळे यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच वर्धा : महाविकास आघाडीत उमेदवार कोण? याबाबत अनिश्चितता कायम असताना शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, खदखद मास्तर नितेश कराळे आणि हर्षवर्धन देशमुख ही नावे चर्चेत आली आहे. देशमुख हे पूर्वीपासून निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जात आहे तर नितेश कराळे आणि शैलेश अग्रवाल यांच्यात आता उमेदवारीसाठीची स्पर्धा सुरू आहे. मतविभाजनात तेली – कुणबी असा तिढा वर्ध्यात असताना जर शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली तर या संघर्षाला विराम मिळू शकतो. शैलेश अग्रवाल हे सर्वसमावेशक उमेदवार ठरू शकतात. विधानसभेत भाजपच्या बाबतीत हिंगणघाट येथे हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. समीर कुणावार यांना जातीय आधार नसताना मतदारांनी…

